मनोज जरांगे पाटील यांच्या मागचा बोलवता धनी कोण आहे ? हे जर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहीती नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. हे सर्व घडविणारे कोण आहेत ? ते राज्य सरकारचा हिस्सा आहेत का ? त्यांना अस्थिरता निर्माण करुन काही वेगळे राजकारण करायचे आहे का? याची देवेंद्रना माहीती नसेल तर मग गृहमंत्री पद तुमच्याकडे गोट्या खेळायला आहे का ? अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. जरांगेबाबत काही माहीती हवी आहे तर जरांगे यांचे फोन टॅप केले असतीलच त्याबाबती डीजी रश्मी शुक्ला अनुभवी आहेत असाही टोला त्यांनी लगावला आहे. जरांगे हे साधे कार्यकर्ते आहेत. गावाकडील नेते आहेत. त्यांच्या भाषेकडे दुर्लक्ष करा. त्यांच्या भावना समजून घ्या असेही संजय राऊत म्हणाले. या राज्यात भाषेची संस्कृती आणि संस्कार जर कोणी बिघडवला असेल तर तो फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या एका टोळीने बिघडवला आहे असाही आरोप त्यांनी केला.
No comments:
Post a Comment