वेध माझा ऑनलाइन। मलकापूरचे भाजप चे धडाडीचे कार्यकर्ते व डॉ अतुल भोसले यांचे खंदे समर्थक युवा नेते सूरज शेवाळे यांची भाजप युवा मोर्चाच्या कराड तालुका अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली त्यांना याबाबतचे नियुक्तीपत्र देखील देण्यात आले आहे त्यांचे यानिमित्ताने सर्वत्र अभिनंदन होत आहे
सूरज शेवाळे हे डॉ अतुल भोसले यांचे कट्टर समर्थक मानले जातात प्रत्येक निवडणुकीत ते अतुल भोसले यांचे कट्टरपणे समर्थन करताना दिसतात त्यांचा प्रचार व प्रसार करण्यात देखील ते प्रत्येकवेळी अग्रेसर असतात त्यांचे समाजकारण नेहमीच कासवाच्या चालीने सुरू असते समाजकारण करताना कोणतीही जाहिरातबाजी करताना ते कधीच दिसत नाहीत
कोरोना काळात त्यांनी मोठे काम केले आहे त्यांनी त्याकाळात पेशंटना मोलाची मदत केली आहे गरजू रुग्णांना घरोघरी जाऊन ऑक्सिजन मशीनद्वारे जीवदान देण्यासाठी त्यांनी खारीचा वाटा उचलून आपली समाजकार्याची बांधिलकी जपली आहे गोरगरीब जनतेला धान्य वाटप तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप,रुग्णांसाठी रक्तदान शिबीराचे आयोजन अशा अनेक प्रकारच्या सामाजिक कामाची त्याची मोठी लिस्ट आहे रात्री अपरात्री कशाचीही पर्वा न करता मदतीला धावून जाणारे म्हणून त्यांची ओळख आहे
मलकापूर मधील सर्व सामाजिक उपक्रमात त्यांचा हिरीरीने सहभाग दिसतो गरीबांच्या न्याय हक्कासाठी मलकापूर नगरपालिकेवर केलेलं त्यांचे आंदोलन आजही लोक विसरलेले नाहीत वेळप्रसंगी त्यांनी लोकांच्या प्रश्नासाठी उपोषण देखील केले आहे लोकांच्या मदतीला धावणाऱ्या या व्यक्तिमत्वाची नुकतीच भाजपा- युवा मोर्चा च्या कराड तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे सूरज शेवाळे यांच्या झालेल्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे
No comments:
Post a Comment