ब्राह्मणांना संपवण्याची भाषा करणाऱ्या व्यक्तीला तात्काळ अटक करून त्याच्यावर कारवाई करा अशी मागणी कराडमधील विविध ब्राम्हण संघटनांच्या वतीने आज निवेदनाद्वारे करण्यात आली कराडचे डीवायएसपी अमोल ठाकूर याना या मागणीबाबतचे निवेदन देण्यात आले
निवेदनात म्हटले आहे की गावरान विश्लेषक या चॅनेलवर मराठा आरक्षणाबाबत काही व्यक्तींनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्यामध्ये एका व्यक्तीने ब्राम्हण समाजाला तीन मिनिटात संपवू असे विधान केले या व्यक्तीच्या विधानामुळे ब्राम्हण समाजात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करून ब्राह्मण समाजाच्या कत्तली करण्याचे षडयंत्र यातून रचले जात आहे यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो मराठा आरक्षणाला ब्राम्हण समाजाने नेहमीच पाठिंबा दर्शवला आहे कधीही विरोध केलेला नाही असे असताना ब्राम्हण समाजाची नाहक बदनामी करण्याचे विनाकारण षडयंत्र सुरू आहे दरम्यान ब्राम्हणांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलेल्या या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक करा व त्याच्यावर कारवाई करा अशी मागणी यावेळी करण्यात आली जय परशूराम, जय श्रीराम अशी घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली
यावेळी समस्त ब्राम्हण समाज सामाजिक संस्था,चित्पावन ब्राम्हण संघ, बहुभाषिक ब्राह्मण संघ विद्यानगर, वेदशास्त्र विद्या संवर्धन मंडळ , ऋग्वेद स्वाहाकार समिती, आणि ब्राम्हण बहुद्देशीय चॅरिटेबल फाउंडेशन या संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच ब्राम्हण महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या
No comments:
Post a Comment