Monday, February 26, 2024

मनोज जरांगे यांच्या अडचणी वाढणार ; जरांगेची एसआयटी चौकशी होणार ; त्यांच्या मागे कोण? हे तपासले जाणार ;

वेध माझा ऑनलाईन। आज विधिमंडळात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यानंतर मराठा आरक्षणावरून सभागृहात गोंधळ पाहायला मिळाला. यावेळी मनोज जरांगे पाटलांच्या विधानांमागे नेमका कोणाचा हात आहे? हे तपासण्यासाठी एसआयटी चौकशी करा, अशी मागणी विधानसभेत आमदार आशिष शेलार यांनी केली. त्यांनी केलेल्या या मागणीनंतरच जरांगे पाटलांच्या आंदोलनाची SIT चौकशी व्हावी, असे आदेश विधानसभा अध्यक्षांनी दिले आहेत. त्यामुळे मनोज पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली 
आहे

विधिमंडळात बोलताना आशिष शेलार म्हणाले की, “काल मी मनोज जरांगे-पाटील यांचा व्हिडिओ बघितला. यामध्ये महाराष्ट्र बेचिराख करण्याची भाषा जरांगे पाटील यांनी केली आहे. त्यांच्यामागे कटकारस्थानाची भाषा आहे. जरांगेंची भाषा त्यांना शोभत नाही. राज्यात पंतप्रधानांविरोधात कटकारस्थान सुरू आहे. तसेच आमच्या जीवाला देखील धोका आहे, त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हावी” त्यांनी केलेला या मागणीनंतरच विधानसभा अध्यक्ष यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.


No comments:

Post a Comment