सुरुवातीला जरांगे यांनी मराठवाड्यातील नऊ जिल्ह्यातील पूर्वजांच्या कुणबी नोंदी प्रमाणे प्रमाणपत्राची मागणी केली, सरकारने ती मागणी पूर्ण केली. परत त्यांनी हे सर्व महाराष्ट्रात लागू करा असे म्हणाले. तीही मागणी पूर्ण केली. मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी जस्टीस शिंदे समिती नेमली. समितीने अहवाल दिला. एक लाख कर्मचारी नेमून मागासवर्गीय आयोगाकडून सर्वेक्षण पूर्ण करुन मराठी समाज आर्थिक मागास असल्याचा डाटा जमवला आणि कोर्टात टीकणारे कॉंक्रीट आरक्षण दिल्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले. परंतू त्यांनी सतत भूमिका बदलली. काल त्यांनी कहर करीत फडणवीसांना अरेतुरेची भाषा केली. त्यामुळे मराठा समाज नाराज झाला आहे. काल ते म्हटले मी सागर बंगल्याकडे चाललो, नंतर पुन्हा माघारी परतले. सरकारने आता कठोर निर्णय घेतला. त्यांची सगळी वक्तव्ये तपासली जातील कायदा आणि पोलिस आपले काम करेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. जे द्यायचे होते ते दिले आहे आणि काही मागण्या असतील त्यावरही विचार केला जाईल असे शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे.
No comments:
Post a Comment