Sunday, February 4, 2024

आजपासून मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेस प्रारंभ ; स्पर्धेत राज्यभरातील नामांकित संघांचा सहभाग ;

वेध माझा ऑनलाइन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांया वाढदिवसचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनाच्या मान्यतेने कराड येथे मुख्यमंत्री चषक भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांना लिबर्टी मजदूर मंडळाच्या क्रीडांगणावर रविवारी सायंकाळी प्रारंभ झाला. 35 किलो मुलांच्या वजनगटातील स्पर्धेला प्रारंभ झाला असून यात राज्यातील 22 संघ सहभागी झाले आहेत.    

कबड्डी स्पर्धांचे संयोजन लिबर्टी मजदूर मंडळ, रणजीत पाटील (नाना) यांनी केलेले आहे. लिबर्टी मैदानावर कबड्डी सामन्यासाठी चार मैदाने व भव्य प्रेक्षा गॅलरी उभारण्यात आली आहे. पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्या हस्ते रविवारी सायंकाळी स्पर्धांचे उद्घाटन झाले. लिबर्टीचे उपाध्यक्ष अरूण जाधव, सचिव रमेश जाधव, सहसचिव विजय गरूड, मुनीर बागवान, ऍड. मानसिंगराव पाटील, भास्कर पाटील, काशिनाथ चौगुले, रणजित पाटील, सचिन पाटील, राजेंद्र जाधव, दादासाहेब पाटील, विजय कुलकर्णी, किशोर शिंदे, प्रा. डॉ. चंद्रकांत माने आदी यावेळी उपस्थित होते.  

35 किलो वजनगटाच्या स्पर्धांना उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्या हस्ते प्रारंभ झाला. त्यांनी मैदानाचे पूजन केले. त्यानंतर खेळाडूंची ओळख करून घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच नाणेफेक करून सामना सुरू केला. आज आणि उद्या 35 किलो वजनगटातील मुलांचे सामने होणार आहेत. तर 70 किलो गटाया स्पर्धा 5 ते 6 फेब्रुवारी रोजी होणार आहेत. या गटातील विजेत्यांसाठी रोख रकमेची बक्षिसे व वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत.
पुरुष व्यावसायिक गटाच्या स्पर्धा 7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान होणार आहेत.  महिला खुला गटाच्या स्पर्धा 7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान होणार आहेत. विजेत्या संघांना 2 लाखांपासून रोख रकमेची बक्षिसे तसेच वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत. प्रेक्षकांचा या स्पर्धेस मोठा प्रतिसाद मिळाल्याचे आज पहिल्याच दिवशी पहायला मिळाले.

No comments:

Post a Comment