वेध माझा ऑनलाइन। अजित पवार यांचे कनिष्ठ पुत्र जय पवार राजकारणात सक्रिय होत आहेत. अजित पवार यांचा मोठा मुलगा पार्थ पवार आधीच राजकारणात सक्रीय आहे. आता अजित पवार यांचा दुसरा मुलगा जय पवार राजकारणात पाऊल ठेवत आहे. बारामतीच्या राजकारणात लक्ष घालण्यासाठी अजित पवारांकडून जय पवार यांची संमती मिळाल्याचे बोलले जात आहे.
अजित पवार यांच्या बंडानंतर त्यांनी राज्यभरात पक्ष वाढीसाठी प्रयत्न सुरु केले आहे. यामुळे बारामतीच्या राजकारणात लक्ष घालण्यासाठी जय पवार सक्रीय होत आहे. गुरुवारी एका दिवसात बारामतीत 11 राष्ट्रवादी युवा शाखांच उद्घाटन त्यांनी केले. यापूर्वी कधीही ते राजकीय व्यासपीठावर आले नव्हते. गुरुवारी केलेल्या दौर्याच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीसाठी पक्ष संघटन मजबूत करायला जय पवार यांनीही सुरुवात केली आहे. यामुळे शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्याशी सामना करण्यासाठी अजित पवार यांना आणखी एक गडी मिळाला आहे.
No comments:
Post a Comment