आजपासून राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. आजच्या या अधिवेशनात 2023-24 च्या पुरवणी मागण्या मांडल्या जातील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता अर्थमंत्री अजित पवार 2024-25 चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी राज्य सरकार अर्थसंकल्प सादर करत असल्यामुळे या अंतरिम अर्थसंकल्पात कोणत्या घोषणांवर जास्त भर दिला जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या अर्थसंकल्पात रोजगार, कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते, शेतकऱ्यांच्या कर्जाचे हप्ते, बँकांचे व्याजदर अशा गोष्टींवर सरकार जास्त भर देईल असे म्हटले जात आहे. तसेच, निवासी डॉक्टरांच्या अनुदानात वाढ, शेतकऱ्यांना वेगवेगळ्या सवलती, आशा वर्कर्सला आर्थिक मदत, मराठा समाजासाठी घोषणा सरकार करेल असा अंदाज वर्तवला जात आहे. त्याचबरोबर, पायाभूत सुविधा क्षेत्र, ग्रामीण भागातील रस्ते, राज्यातील नागरिकांसाठी विविध योजनांचा समावेश देखील या अर्थसंकल्पात असेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक ते शेतकऱ्यांपर्यंत सर्वांच्याचे लक्ष या अर्थसंकल्पाकडे लागले आहे.
दरम्यान आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी शिंदे फडणवीस पवार सरकार अर्थसंकल्प सादर करत आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या हिताचा सरकार जास्त विचार करेल, असे म्हटले जात आहे. पाहूया काय होते ते...
No comments:
Post a Comment