शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी लोकसभा सभापती मनोहर जोशी यांचं आज पहाटे मुंबईत निधन झालं. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
राजकारणातील शालीन व्यक्तीमत्व म्हणून सुपरिचित असलेले गुरुजी तथा माजी लोकसभा सभापती मनोहर जोशी यांचं निधन झालं. हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज पहाटे 03.02 वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनोहर जोशी यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या राजकारणाची अपरिमित हानी झाली आहे.
लोकसभा माजी सभापती तथा शिवसेना भाजपा युतीचे पहिले माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना बुधवारी अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. हृदयविकाराचा झटका आल्याचं निदान हिंदुजा रुग्णालयातील डॉक्टरांनी केलं होतं. त्यामुळं त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यातच गुरुवारी पहाटे 03.02 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
No comments:
Post a Comment