Friday, June 19, 2026

पृथ्वीराजबाबाबांचा अविनाश मोहितेना पाठिंबा...पण...।

वेध माझा ऑनलाईन।
नुकतीच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची पत्रकार परिषद पार पडली त्यांनी यावेळी कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत आपण अविनाश मोहितेंना सर्व ताकदीने पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले... खरतर निवडणुकीला फ़क्त 2 दिवस बाकी असताना सगळ्या ताकदीने पाठिंबा देणार म्हणजे... नेमकं काय करणार... हे त्यांनी सांगितलेच नाही...यावेळी त्यांनी भोसले यांच्यासह  भाजप व मोदिंवर टीका केली... लाडकी बहीण योजनेची देखील त्यांनी खिल्ली उडवली...पण ही पत्रकार परिषद  अविनाश मोहितेना पाठिंबा देण्यासाठी घेतली असताना केवळ राजकीय स्टेटमेंट व त्यांचा भाजप विरोध दिसून आला...पाठिंबा कशासाठी ? आपल्या पुढाकारात या पॅनलचे शेतकरी सभासदांसाठी काय नवीन प्लॅन्स आहेत?कारखान्याचे उत्पन्न वाढीसाठी काय  करणार?अशा कोणत्याही विषयावर त्यांचे भाष्य नव्हते...यावरून त्यांनी फक्त दोन दिवस अगोदर पाठिंबा दाखवत भोसले व भाजप ला विरोध करण्यासाठी ही एक संधी समजून अविनाश  मोहितेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजप व भोसलेंना निशाण्यावर घेतले आहे का  ?अशी यानिमित्ताने चर्चा सुरू झाली आहे...

या पत्रकार परिषदेत त्यांना पत्रकारांनी विचारले...
अविनाश मोहितेंच्या काळात त्यांनी कारखान्याची अवस्था बिकट करून ठेवली असा आरोप होतो... त्यांनी कामगार संख्या 1 हजार हुन अधिक दाखवून त्यांच्या पगारापोटीची दरमहा रक्कम ही 50 लाख दाखवली... मात्र हे कामगार मस्टरवरच नाहीत...मग ...हे पाच वर्षांचे पैसे गेले कुठे...हा घोटाळा करण्यासह...बोगस सह्या घोटाळा.. .तसेच कृषी कॉलेज बंद करून टाकले, अल्कोहोलचे प्रोडक्शन बंद करून टाकले, कोणतेच उत्पादन नसल्याने व अवाढव्य खर्च करत बसल्याने कारखाना अडचणीत येऊन बंद पडेल किंवा विकावा लागेल अशा परिस्थितीत आला...
अविनाश मोहिते तुरुंगात गेले...ते सध्या जामिनावर बाहेर आहेत...या भोसलेंच्या टिकेवर काय सांगाल ? या प्रश्नाचे काहीही उत्तर न देता त्यांनी हा विषय भाजपवर टीका करण्याकडे नेला..

डॉ सुरेश बाबा यांनी हा कारखाना त्यानंतर स्वतः ताब्यात घेऊन पुन्हा सुस्थितीत आणला... अविनाश मोहितेंच्या काळात बंद पडलेले सर्व बाय प्रोडक्टचे प्रोडक्शन पुन्हा सुरू झाले...विस्तारीकरण झाले...नुतनीकरण झाले...चांगला दर मिळू लागला... कारखाना राज्यात दोन नंबरवर गेला...पुरस्कार मिळाले... असेही भोसले सांगतात...  मग... या दोन्ही अध्यक्षांच्या कारकीर्दविषयी तुमचे मत काय ? असे विचारले असता...पृथ्वीराजबाबा म्हणाले... 
या कारखान्यात लिकेजेस करत भोसलेंनी आपल्या राजकारणासाठी याठिकाणच्या सत्तेचा उपयोग करून घेतला...याला चाप बसवण्यासाठी आपण अविनाश मोहितेना पाठिंबा देत आहोत...
पण अविनाश मोहितेंच्या वादग्रस्त कारकीर्दीवर कोणतेच मत त्यांनी व्यक्त केले नाही...

पत्रकारांनी 120 किलो साखर देण्याबाबत केलेल्या अश्वासनाबाबत विचारले असता...हो तेवढी साखर देता येते असे ते म्हणाले...पाणीपट्टी माफ केली...आणि बाहेर जाणारा ऊस थांबवला... तर ते शक्य असल्याचे ते म्हणाले ...पण टेक्निकली हे कसे इमलीमेण्ट होऊ शकते  हे  त्यांना सांगता आले नाही...ते सभेत बोलू असे सांगून त्यांनी यावेळी मोदी सरकारवर टीका करण्याकडे विषय फिरवला... लाडकी बहीण योजनेवर टीका करायला सुरुवात केली... चालू पत्रकार परिषदेशी या विषयाचा काहीही संबंध नव्हता...

कारखान्याचा उपयोग आमदार खासदार होण्यासाठीच होतोय... विचाराचे राजकारण आता राहिले नाही...असे सांगायला सुरुवात केल्यानंतर पत्रकारांनी त्यांना विचारले... असे असेल तर तुम्ही का कारखाना काढला नाही, पतसंस्था, बँका, शिक्षण संस्था असे काहीच तुम्ही एवढ्या वर्षात का काढू शकला नाही?यावर बोलताना त्यांनी पहिल्यांदा माझी चूक झाली...काढायला पाहिजे होता...असे म्हटले...आणि काही वेळातच... तसे नाही केलं तेच बर केलं..कारण त्यामुळे मी दिल्लीत राजकारण करू शकलो असेही ते म्हणाले... सहकारात राजकारण आणू नये...या इंद्रजित मोहितेंनी केलेल्या विधानाचे त्यांनी खंडन केले, कारखाना निवडणुकीच्या राजकारणात कोण राजकारणी भाग घेत नाहीत ते दाखवा असे ते म्हणाले...माझा अविनाश मोहितेना पाठिंबा आहे असे सांगत... 
कृष्णा कारखान्याचा मी सभासद नाही असेही ते म्हणाले ... मात्र कारखान्यात काही अडचण आली तर मी आहे असे ते म्हणाले...
यावर पत्रकारांनी... त्या पॅनेलचे पालकत्व तुम्ही घेता का ? असे विचारले असता.. नाही असे उत्तर त्यांनी दिले...

एकूणच..
त्यांच्या पाठिंबा देण्यामागे सभासद शेतकऱ्यांच्या भविषयासाठीचे कोणतेही भाष्य त्यांनी केले नाही... 
ही राजकीय विषयाबाबत पत्रकार परिषद नसताना या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर टीका केली,लाडकी बहीण या योजनेची खिल्ली उडवली भोसलेंवर  टीका केली... पण कारखान्याचे प्रश्न, शेतकरी सभासदांचे प्रश्न, त्यावरील तोडगा काय? किंवा आपला या निवडणुकीत शेतकऱ्यांच्या न्यायासाठी कसा सहभाग असणार ? यावर ते काहीही बोलले नाहीत...म्हणजेच त्यांनी अविनाश मोहितेंच्या खांद्याचा पुरेपूर वापर करत या निवडणुकीला संधी समजून भाजप व भोसलेंवर मात्र यावेळी संधान साधले आणि बऱ्याच मोठ्या गॅपनंतर पुन्हा आपण कराडच्या राजकारणात सक्रिय झालो असल्याचे त्यांनी प्रभावीपणे दाखवले... एवढेच या पत्रकार परिषदेचे फलित म्हणावे लागेल...बाकी काहीच नाही...अशी काही पत्रकारांच्यात चर्चा झाली...

No comments:

Post a Comment