Friday, June 26, 2026

कराडच्या समस्त ब्राह्मण समाज सामाजिक संस्थेच्या वतीने सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा उत्साहात ;


वेध माझा ऑनलाइन।
कराडच्या समस्त ब्राह्मण समाज सामाजिक संस्था यांच्या वतीने नुकताच सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा शास्त्रोक्त पद्धतीने पार पडला. या प्रसंगी बटूंना उपनयन संस्कार देण्यात आले.यावेळी उपस्थित ब्रह्मवृंदांनी बटूंना आशीर्वाद दिले. 

ब्राह्मण समाजात उपनयन संस्काराला अत्यंत महत्त्व असून हा संस्कार व्यक्तीच्या धार्मिक, सांस्कृतिक व वैदिक जीवनाचा प्रारंभ मानला जातो. वेदाध्ययनाची सुरुवात, शिस्त, संस्कार आणि कर्तव्यबुद्धी यांचा पाया या संस्कारातून घातला जातो. त्यामुळे उपनयन संस्कार हे समाजाच्या परंपरेचे आणि संस्कृतीचे जतन करणारे एक अत्यंत आवश्यक व महत्त्वपूर्ण संस्कार आहे.
समस्त ब्राह्मण समाज सामाजिक संस्था, कराड ही संस्था समाजोपयोगी विविध उपक्रम सातत्याने राबवत असून समाजातील सांस्कृतिक, धार्मिक व शैक्षणिक परंपरा जपण्यासाठी सक्रियपणे कार्यरत आहे. प्रतिवर्षी संस्था समाजहिताचे उपक्रम मोठ्या प्रमाणावर आयोजित करून समाजबांधवांना एकत्र आणण्याचे कार्य करत आहे.
संस्थेचे अध्यक्ष श्री. जयंत बेडेकर यांच्या मार्गदर्शनाने तसेच उपाध्यक्ष श्री. विकास देशपांडे, सचिव श्री. ओंकार आपटे गुरुजी खजिनदार श्री. प्रशांत कुलकर्णी या सर्व पदाधिकाऱ्यांच्या  योगदानाने विविध उपक्रम यशस्वीपणे पार पाडले जातात
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था कटिबद्ध असून भविष्यातही असेच उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवले जातील, असे यावेळी संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment