कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मतदान प्रक्रियेदरम्यान एक वेगळीच घटना घडली. मतदानासाठी आलेल्या एका सभासद मतदाराने आपले मत नोंदवल्यानंतर मतपेटीत कारखान्याचे माजी चेअरमन सुरेश भोसले अतुल भोसले यांच्यासाठी एक हस्तलिखित चिठ्ठी टाकल्याची माहिती मलकापूरचे भाजपचे नेते मनोहर शिंदेंनी पत्रकारांना दिली
त्यातील मचकूर वाचल्यानंतर पत्रकारांना चिट्ठीतील आशय समजला
सदर चिठ्ठीत मतदाराने आपले मत व्यक्त करताना, "कारखान्याच्या विकासात जुन्या संचालकांचे योगदान महत्त्वाचे असले तरी आता नवीन चेहऱ्यांना संधी देणे गरजेचे होते... भाकरी फिरवायला हवी होती... असा आशय व्यक्त केल्याचे समजले.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदाराने मतपेटीतूनच आपली भावना व्यक्त केल्याने हा विषय चर्चेचा ठरला आहे.
दरम्यान, संबंधित चिठ्ठीबाबत कोणतीही अधिकृत माहिती निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आलेली नसली, तरी मतदान केंद्रावर उपस्थित सभासद आणि कार्यकर्त्यांमध्ये या घटनेची जोरदार चर्चा रंगली.
दरम्यान मतमोजणी सुरू असताना अचानक मतपेटीत ही चिट्ठी डॉ अतुल भोसले व डॉ सुरेश भोसले यांच्या नावे लिहून ठेवल्याची त्याठिकाणी मलकापूरचे भाजप नेते मनोहर शिंदे यांना सापडली त्यांनी ती पत्रकारांना आणून दिली
त्यातील मजकूर वाचल्यानंतर पत्रकारांना आशय समजला
दरम्यान निवडणुकीतील निकाल काहीही लागला तरी मतदारांच्या मनातील बदलाची अपेक्षा या घटनेतून स्पष्ट झाल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.
No comments:
Post a Comment