Wednesday, June 24, 2026

कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग अचानक हिरवा झाल्याने परिसरात चिंतेचे वातावरण आहे याविषयी संबंधीत यंत्रणेशी बोलणे करून आपण लवकरच ही अडचण दूर करू... वेध माझा शी बोलताना दिले आश्वासन ; वेध माझाच्या बातमीची दखल ;

वेध माझा ऑनलाईन।
गेल्या काही दिवसांपासून कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग अचानक निळसर-हिरवा दिसू लागल्याने नदीकाठच्या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नदीच्या पाण्यात झालेल्या या अनपेक्षित बदलामुळे प्रदूषणाची शक्यता व्यक्त केली जात असून, संबंधित यंत्रणांनी तातडीने पाण्याचे नमुने तपासून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान आमदार अतुलबाबांनी वेध माझा च्या या बातमीची दखल घेत... याविषयी संबंधीत यंत्रणेशी बोलणे करून ही अडचण दूर करू... असे वेध माझा शी बोलताना त्यांनी सांगितले आहे.

कृष्णा कारखान्याची निवडणूक जिंकल्यानंतर कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आले असता त्याठिकाणी गर्दी असूनही त्यांनी हा पाण्याचा विषय जाणून घेत स्वतःहून याविषयी लक्ष घालून संबंधित यंत्रणेशी बोलून ही अडचण लवकर दूर करू असे आश्वासन वेध माझा ला दिले

दरम्यान नदीच्या विविध घाटांवर आणि किनारी भागांमध्ये पाण्याचा रंग पूर्वीपेक्षा वेगळा दिसतोय काही ठिकाणी पाण्याच्या पृष्ठभागावर हिरवट थरही दिसून येत असल्याने जलचरांवर तसेच पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान "कृष्णा नदी ही परिसरातील लाखो नागरिकांची जीवनवाहिनी आहे. पाण्याचा रंग अचानक बदलणे ही गंभीर बाब असून, प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे."
पर्यावरण अभ्यासकांच्या मते, पाण्यातील शैवालांची वाढ, औद्योगिक किंवा सांडपाण्याचे मिश्रण, तसेच पाण्याच्या गुणवत्तेतील बदल यांसारख्या कारणांमुळे नदीच्या पाण्याचा रंग बदलू शकतो. 
मात्र याबाबत अधिकृत तपासणी झाल्यानंतरच नेमके कारण स्पष्ट होऊ शकते.
दरम्यान, नदीकाठच्या नागरिकांनी संबंधित प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जलसंपदा विभागाने त्वरित पाहणी करून पाण्याची गुणवत्ता तपासावी व अहवाल जाहीर करावा, अशी मागणी केली आहे.
कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग निळसर-हिरवा होण्यामागील कारण काय, याबाबत आता प्रशासनाच्या तपासणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तपासणी अहवालानंतरच या रंगबदलामागील नेमके कारण आणि त्याचे संभाव्य परिणाम स्पष्ट होणार आहेत.


No comments:

Post a Comment