Saturday, June 27, 2026

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कराड शहरात पुराच्या पाण्याचा निचरा तसेच नालेसफाई व्यवस्थापन आतापासूनच चोख ; कृष्णा नदीच्या सध्याच्या प्रदूषण सदृश स्थितीचा शहराच्या पाणी व्यवस्थेशी संबंध नाही; नागरिकांनी घाबरू नये ; नगराध्यक्ष राजेंद्रसिह यादव यांची स्पष्टोक्ति ;


वेध माझा ऑनलाइन। 
पावसाळा सुरू झाला आहे त्या पार्श्वभूमीवर कराड शहरात जर भविष्यात पुर परिस्थिती निर्माण झालीच तर त्या पाण्याच्या निचऱ्याचे नियोजन केले आहे तसेच गटर, ओढे व नालेसफाई करून शहराच्या दळणवळणाला कोणतीही अडचण येणार नाही अशी चोख व्यवस्था शहरासाठी आतापासूनच आम्ही करून ठेवली असल्याने शहरवासीयांना कसल्याही प्रकारच्या अडचणीला पावसाळ्यात तोंड द्यायची वेळ येणार नाही अशी ग्वाही शहराचे नगराध्यक्ष राजेंद्रसिह यादव यांनी वेध-माझा शी बोलताना दिली
तसेच कृष्णा नदीच्या पाण्यात सध्या प्रदूषण सदृश स्थिती निर्माण झाली आहे त्याचा शहरातील पाणी व्यवस्थापनेशी कसलाही संबंध नाही कारण शहरासाठी पिण्याचे पाणी कोयना नदीतून आणले जाते त्यामुळे "कृष्णे'च्या प्रदूषण स्थितीचा शहराच्या पिण्याच्या पाण्यावर कोणताही परिणाम नाहीये त्यामुळे घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नाही अशी स्पष्टोक्तीही नगराध्यक्ष यादव यांनी यावेळी बोलताना दिली

सध्या कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग गेल्या काही दिवसांपासून निळसर-हिरवा होत असल्याबाबत नागरिकांनी वारंवार चिंता व्यक्त केली असून  या गंभीर विषयाची अद्याप संबंधित प्रशासनाने दखल घेतलेली नसल्याचे चित्र आहे.
कृष्णा नदी ही नागरिकांच्या जीवनाशी जोडलेली आहे. पिण्याचे पाणी, शेती, पशुपालन आणि विविध उद्योगांसाठी या नदीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागते. अशा परिस्थितीत नदीच्या पाण्याचा रंग बदलल्याची बाब समोर आल्यानंतर तातडीने या पाण्याची तपासणी होणे अपेक्षित होते. परंतु याबाबतची अधिकृतरीत्या कोणतीही ठोस माहिती प्रशासनाने अजूनही जाहीर केलेली नाही 
त्यामुळे वेध-माझा ने हा विषय उचलून धरला आहे...
दरम्यान या संपूर्ण विषयावर बोलताना नगराध्यक्ष यादव यांनी कृष्णे'च्या प्रदूषण स्थितीचा शहराच्या पिण्याच्या पाण्यावर कोणताही परिणाम नाहीये कारण शहरासाठी पिण्याचे पाणी कोयना नदीतून आणले जाते
त्यामुळे घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नाही अशी स्पष्टोक्तीही याबाबत बोलताना दिली आहे


No comments:

Post a Comment