Saturday, June 27, 2026

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कराड शहरात पुराच्या पाण्याचा निचरा तसेच नालेसफाई व्यवस्थापन आतापासूनच चोख ; कृष्णा नदीच्या सध्याच्या प्रदूषण सदृश स्थितीचा शहराच्या पाणी व्यवस्थेशी संबंध नाही; नागरिकांनी घाबरू नये ; नगराध्यक्ष राजेंद्रसिह यादव यांची स्पष्टोक्ति ;

वेध माझा ऑनलाइन। 
पावसाळा सुरू झाला आहे त्या पार्श्वभूमीवर कराड शहरात जर भविष्यात पुर परिस्थिती निर्माण झाली तर पाण्याच्या निचऱ्याचे नियोजन केले आहे तसेच गटर, ओढे व नालेसफाई देखील करून शहराच्या दळणवळणाला कोणतीही अडचण येणार नाही अशी चोख व्यवस्था शहरासाठी आतापासूनच आम्ही करून ठेवली असल्याने शहरवासीयांना कसल्याही प्रकारच्या अडचणीला पावसाळ्यात तोंड द्यायची वेळ येणार नाही अशी ग्वाही शहराचे नगराध्यक्ष राजेंद्रसिह यादव यांनी वेध-माझा शी बोलताना दिली

तसेच कृष्णा नदीच्या पाण्यात सध्या प्रदूषण सदृश स्थिती निर्माण झाली आहे त्याचा शहरातील पाणी व्यवस्थापनेशी कसलाही संबंध नाही कारण शहरासाठी पिण्याचे पाणी कोयना नदीतून आणले जाते त्यामुळे "कृष्णे'च्या प्रदूषण स्तिथीचा शहराच्या पिण्याच्या पाण्यावर कोणताही परिणाम नाहीये त्यामुळे घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नाही अशी स्पष्टोक्तीही नगराध्यक्ष यादव यांनी यावेळी बोलताना दिली




No comments:

Post a Comment