सामाजिक कार्यकर्ते संजय चन्ने यांच्या डोक्यात अचानकपणे कराड नगरपालिकेच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरच्या खिडकीचा वरचा भाग अचानक सुटून त्यांच्या डोक्यात पडल्याने ते जखमी झाले आहेत
आज दुपारी साडेचार च्या सुमारास ही घटना घडली आहे
येथील श्री हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे
संजय चन्ने हे आज दुपारी 4 च्या दरम्यान कराड पालिकेच्या आवारात असलेल्या तलाठी कार्यालयात कामानिमित्त आले होते त्यांचे काम आवरून बाहेर पडत असताना तलाठी ऑफिसच्या बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्याच्या खिडकीचा वरचा भाग अचानक खाली कोसळला तो नेमका त्यांच्याच डोक्यात पडला त्यामुळे त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे
त्याचवेळी पालिकेत हजर असलेल्या उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंखे,सौरभ पाटील, (तात्या)प्रसाद माने, नगरसेवक नरेंद्र लिबे, सिद्धार्थ संकपाळ आशिष रैनाक,अमोल पवार, युवराज सावंत, अमित होमकर यानी चन्ने यांना उपचारासाठी तात्काळ श्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले सध्या त्यांच्यावर त्याठिकाणी उपचार सुरू आहेत
No comments:
Post a Comment