वेध माझा ऑनलाइन।
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी बुधवारी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून सहकार पॅनेलला ‘कप-बशी’ तर संस्थापक पॅनेलला ‘नारळ’ हे चिन्ह मिळाले आहे. कारखान्याच्या २१ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत दोन्ही प्रमुख पॅनेलचे उमेदवार निश्चित झाले असून आता प्रचाराच्या रणधुमाळीला वेग येणार आहे.
सहकार पॅनेलकडून गट क्रमांक १ मध्ये धोंडीराम जाधव, जगदीश जगताप व आनंद खबाले, गट क्रमांक २ मध्ये अरविंद पाटील, दयाराम पाटील व बाजीराव थोरात, तर गट क्रमांक ३ मध्ये दत्तात्रय देसाई, लिंबाजी पाटील व संभाजीराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गट क्रमांक ४ मध्ये जयवंत मोरे, सत्यजीत पाटील व सुनील पाटील, गट क्रमांक ५ मध्ये बाबासो शिंदे व संग्राम पाटील, तर गट क्रमांक ६ मध्ये सुरेश भोसले व बाजीराव निकम हे निवडणूक रिंगणात आहेत.
महिला राखीव गटातून सुजाता जाधव व सुनिता शेवाळे, अनुसूचित जाती-जमाती गटातून छबन कांबळे, भटक्या विमुक्त जाती-जमाती व विशेष मागास प्रवर्ग गटातून अविनाश खरात आणि इतर मागास प्रवर्ग गटातून बाळासो जगताप यांना सहकार पॅनेलने उमेदवारी दिली आहे.
संस्थापक पॅनेलकडून गट क्रमांक १ मध्ये आनंदा तुकाराम जगताप, प्रताप धोंडीराम जगताप व दुर्योधन खबाले, गट क्रमांक २ मध्ये संतोष थोरात, प्रतापराव पाटील व शांताराम पाटील, तर गट क्रमांक ३ मध्ये सुरेश बाबुराव पाटील, सुभाष पाटील व किरण पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
गट क्रमांक ४ मध्ये जयकर शिंदे, महेश पवार, महेश पाटील व उदयसिंह शिंदे, गट क्रमांक ५ मध्ये सुरेश पाटील व माणिकराव मोरे, तर गट क्रमांक ६ मध्ये अविनाश मोहिते व दीपक कणसे हे उमेदवार आहेत. महिला राखीव गटातून अर्चना मोहिते व विजया पाटील, अनुसूचित जाती-जमाती गटातून सुधीर रोकडे, भटक्या विमुक्त जाती-जमाती व विशेष मागास प्रवर्ग गटातून दिलीप गलांडे आणि इतर मागास प्रवर्ग गटातून प्रकाश श्रीखंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान, गट क्रमांक १ मधून विश्वास जाधव यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे.
No comments:
Post a Comment