Tuesday, November 2, 2021

माजी गृहमंत्री अनिल देशमुख अटकेत ; निलेश राणेंचे खोचक ट्विट...अनिल देशमुखांना म्हणाले हॅप्पी दिवाली...


वेध माझा ऑनलाइन
100 कोटींच्या वसुली आदेश प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर अटक करण्यात आलीये. सोमवारी रात्री 12 वाजता त्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. अनिल देशमुखांना अटक केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून यावर अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. यातच रात्री 2 वाजता भाजप आमदार नितेश राणे यांनी खोचक टीका करणारं ट्विट केलं आहे.“अनिल देशमुख हॅपी दिवाली आणि अनिल परब मेरी ख्रिसमस, स्पेशल थँक्स टू नवाब मलिक आणि संजय राऊत”, असं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे.

 दरम्यान त्याचदिवशी अनिल देशमुख ईडी कार्यालयात पोहोचले. त्यापूर्वी त्यांनी व्हिडीओ ट्विट करत ईडीच्या कारवाईला सहकार्य करणार असल्याचं सांगितले. ईडी कार्यालयात गेल्यानंतर त्यांची चौकशी सुरु झाली. त्यानंतर तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर त्यांना वेगवेगळ्या कलमांनुसार अटक करण्यात आलीये. मनी लाँड्रिंगच्या अनुषंगानं ही सर्व कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. 

No comments:

Post a Comment