Thursday, November 11, 2021

ना. बाळासाहेब पाटील म्हणतात ...कराड पालिका निवडणुकीबाबत श्रेष्टींशी बोलून काय तो निर्णय घेणार...सुभासकाका म्हणतात... आम्ही आघाडी म्हणूनच लढणार ; लोकशाही गटाची नेमकी भूमिका काय...? शहरात चर्चा...

वेध माझा ऑनलाइन
कराड
होणाऱ्या शहरातील पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी म्हणून आपली भूमिका काय असेल असे पत्रकारांनी ना. पाटील यांना आज आयोजित पत्रकार परिषदेत विचारले असता...सध्या मी जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या गडबडीत आहे ही गडबड झाली की मग येथील पालिका निवडणुकीबाबत काय तो निर्णय वरिष्ठांशी बोलून घेणार आहे असे बाळासाहेब पाटील यांनी याबाबत बोलताना सांगितले
दरम्यान पालिकेतील लोकशाही गटाचे नेते सुभाशकाका पाटील यांनी काही दिवसांपूर्वी आमचा गट पालिका निवडणुकीत आघाडी म्हणूनच लढेल असे सांगून टाकले आहे त्यामुळे आता लोकशाही गटाच्या दोन वेगवेगळ्या भूमिका यानिमित्ताने लोकांसमोर आज आल्या आहेत त्यामुळे लोकशाही गटाची या निवडणुकीत नेमकी भूमिका काय असणार याबाबत शहरात चर्चा सुरू झाल्या आहेत... दरम्यान, साताऱ्यात पुढील वर्षीपासून बराच काळ प्रलंबित राहिलेले मेडिकल कॉलेज सुरू होत असल्याचे नामदार पाटील यांनी यावेळी सांगितले

ते म्हणाले,या मेडिकल कॉलेजसाठी नवी इमारत उपलब्ध होईपर्यंत जिल्हा रुग्णालय व आरोग्य यंत्रणेचा वापर करुन जून महिन्यापासून या मेडिकल कॉलेजचे कामकाज सुरू होणार आहे तशा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना आहेत. या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. जानेवारी 2012 मध्ये साताऱ्यासाठी 419 कोटी खर्चाचे, 100 खाटांचे वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न 500 खाटांचे रुग्णालय मंजूर होऊनही पुढील कार्यवाही झाली नव्हती. सातारा शहरवासियांची गरज लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. त्यानुसार सातारा शहरालगतची कृष्णा नगर येथील जलसंपदा विभागाची 64 एकर जागा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला देण्याचा व त्या बदल्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यातील खावली गावातील 70 एकर शासकीय जागा जलसंपदा विभागाला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशीही माहिती ना बाळासाहेब पाटील यांनी यावेळी दिली.

No comments:

Post a Comment