वेध माझा ऑनलाइन
कराड
कराड विमानतळाबाबतच्या जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या अटी व नियमावली जाचक आहेत त्यामुळे शहर व परिसराचे नुकसान आहे, हे टाळण्यासाठी या अटींविरोधात जनआंदोलन उभारणार असल्याचा इशारा नगरपालिकेचे गटनेते राजेंद्रसिंह यादव यांनी आज दिला.
आज पत्रकारांसाठी दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन त्यांच्या वतीने करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते
यावेळी नगरसेवक हणमंत पवार,गुंड्याभाऊ वाटेगावकर नगरसेविका स्मिता हुलवान, सुप्रिया खराडे, आशा मुळे, प्रियांका यादव, गजेंद्र कांबळे, किरण पाटील, बाळासाहेब यादव आदी उपस्थित होते.
ते म्हणाले, कराड विमानतळ परिसरात 20 किलोमीटर पर्यंत बांधकाम उभारणेस शासनाने निर्बंध लावले आहेत.त्यामुळे त्या परिसरात बांधकाम करण्यापूर्वी स्थानिक प्रशासनाचा ना हरकत दाखला घेणे बंधनकारक असणार आहे आणि या अटी जाचक व खूप अडचणीच्याही आहेत शहराच्या विकासावर त्याचा परिणाम होणार आहे याबाबत प्रशासनाशी बोलणार आहे आणि त्यानंतर सात दिवसात याबाबत योग्य तो निर्णय न झाल्यास तीव्र जनआंदोलन उभारणार असल्याचा इशारा जनशक्ती चे नेते राजेंद्र यादव यांनी आज दिला आहे
नगराध्यक्षांचे नाव काढताच हुलवान मेहेरबानांनी बोलायला माईकच मागितला...
याविषयी होणाऱ्या आंदोलनाच्या बाबतीत नगराध्यक्षा सौ रोहिणी शिंदे यांच्याशी बोलणे झाले का ? त्यांना याप्रश्नी बरोबर घेणार का? असे पत्रकारांनी विचारले असता राजेंद्र यादव म्हणाले आम्ही या लढ्यात सर्व राजकीय पक्षांना बरोबर घेणार आहोत हा गावाचा प्रश्न आहे आम्ही तो राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून हाताळणार आहोत..असे राजेंद्र यादव यांनी म्हणताच... सम्पूर्ण चर्चेत शांत असलेल्या नगरसेविका सौ हुलवान यांनी बोलण्यासाठी पटकन माईक मागून घेतला आणि या आंदोलनात कोणी आमच्या बरोबर येतील ते येतील जे येणार नाहीत त्यांच्या शिवाय आम्ही आंदोलन करू असे सांगून टाकले नगराध्यक्षा सौ शिंदे व नगरसेविका हुलवान यांचा अनेकदा वेगवेगळ्या प्रश्नबाबत कलगीतुरा शहराने पहिला आहे पालिकेच्या मासिक सभांमधून देखील त्यांचे एकमेकीवर झालेले आरोप शहरात चर्चेत राहिले आहेत आज नगराध्यक्षा सौ शिंदेबाबत प्रश्न विचारताच शांत असणाऱ्या हुलवान मेहेरबान एकदमच माईक घेऊन ज्या आवेशात बोलल्या ते पाहून पत्रकारांना या दोघींच्यात यापूर्वी झालेल्या आरोप प्रत्यारोपाची मालिकाच आठवली...
No comments:
Post a Comment