Sunday, November 14, 2021

महागाई विरोधात उद्या कराडात काँग्रेसच्या वतीने जनजागरण महारॅलीचे आयोजन...

वेध माझा ऑनलाइन
कराड
उदया सोमवार दिनाक 15 रोजी सकाळी 10:30 वाजता माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण  यांच्या नेतृत्वा खाली कराड शहरातून महागाई विरोधात  जनजागरण महारॅली निघणार आहे याबाबतचे नियोजन आज काँग्रेस तालुका व जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत कराड येथे करण्यात आले या रॅलीस कराड दक्षिण व उत्तर मधून मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले

ही महारॅली कोल्हापूर नाक्यावरील महात्मा गांधी पुतळ्या पासुन निघणार असून दत्त चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन सदर रॅली आझाद चौक,चावडी चौक, मार्गे मंगळवार पेठेतुन जोतिबा मंदिरा समोरुन आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करुन तहसिल कार्यालयात निवेदन देण्यास जाणार आहे 
नागरिकानी बहुसंख्येने या रॅली मध्ये सामिल व्हावे अशी हाक काँग्रेस जनांनी दिली आहे

No comments:

Post a Comment