Tuesday, November 16, 2021

सातारा जिल्ह्यामध्ये कलम 144 लागू

सातारा दि. 16 (जिमाका) : त्रिपुरा राज्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकारी सातारा यांनी क्रिमीनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त अधिकारास अधिन राहून संपूर्ण सातारा जिल्ह्यात दि. 17 नोव्हेंबर 2021 रोजीचे 00.00 वा. पासून ते दि. 22 नोव्हेंबर 2021 रोजीचे 24.00 पर्यंत जिल्ह्यामध्ये घेण्यात येणाऱ्या ग्रामसभा, शासकीय बैठका, शासकीय कार्यक्रम व पोलीस विभागाकडून परवानगी घेऊन करीत असलेले कार्यक्रम यांना वगळून या कालावधीत खालील कृत्ये करण्यास प्रतिबंधत्मक आदेश लागू केले आहेत. 

पाच किंवा पाच पेक्षा अधिक लोकांनी जमाव जमवुन सभा घेणे, मोर्चा काढणे. धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी महाआरती, नमाज पठण तसेच इतर धार्मिक विधी करणे, एकत्र येवून घोषणाबाजी, जल्लोष याबाबी सार्वजनिक ठिकाणी करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. कोणीही व्यक्ती इंस्टाग्राम, व्हॉटसॲप, ट्वीटर, फेसबूक इत्यादी समाज माध्यमांचा वापर करुन जातीय तणाव निर्माण करणाऱ्या अफवा, आक्षेपार्ह संदेश पसरविणे. अशा प्रकारच्या अफवा, आक्षेपार्ह मजकुराचा संदेश पसरविणार नाही, शेअर करणार नाही किंवा टाकणार नाहीत याबाबत सर्वस्वी जबाबदारी ग्रुप ॲडमीनची राहील. कोणत्याही प्रकारचे जातीय तणाव निर्माण करणारे मजकुराचे देखावे तसेच फ्लेक्स बोर्ड लावणे त्या प्रकारच्या प्रक्षोभक घोषणा देणे, पत्रके वाटणे. समाज माध्यमाअमध्ये चुकीची माहिती, अफवा जाणीवपूर्वक प्रसारीत अथवा प्रकाशित करणे. इत्यादी गोष्टींस या आदेशान्वये मनाई करण्यात आली आहे. 
0000

No comments:

Post a Comment