वेध माझा ऑनलाइन
कराड
कराड विमानतळ अटी प्रकरणी शहरातील विकासावर नांगर फिरणार असेल तर प्रसंगी विमानतळाची धावपट्टी उखडून टाकू असा झणझणीत इशारा देत नियामवली नुसार कराड पालिकेतर्फे बांधकाम परवाने द्यावेत असा ठराव जनशक्तीचे गटनेते राजेंद्र यादव यांनी पालिकेच्या मासिक सभेत मांडला. ठरावाला एकमताने मंजरी देण्यात आली. उपाध्यक्ष जयवंत पाटील सभेच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी विठामाता विद्यालयापासून मार्केट यार्डाकडे गेलेल्या रस्त्याला स्व युनूस कच्छी यांचे नाव देण्याचा ठराव झाला. इदगाह मैदानात कमान उभी करून त्या कमानीला स्वातंत्र सैनिक स्व बादशाह अली मुल्ला यांचे नाव देण्याचाही ठराव करण्यात आला.
विमानतळ प्रकरणी जाचक अटीवरून पालिकेच्या काल पालिका सभेत जोरदार चर्चा झाली यावेळी यादव म्हणाले, विमानतळाच्या जाचक अटी मान्यच नाहीत त्या विरोधात आम्ही भुमिका घेत आहोत. विमानतळाचा दर्जा कोणत्या प्रकारचा आहे, विमानतळ धावपट्टीचा नकाशाच अद्याप अस्तीत्वात आहे का, तो कोणत्या साईटवर आहे. नकाशाच नसताना विमानतळ अटीची अंमलबाजवमी कोणासाठी सुरू आहे असा रोखठोक सवालही त्यांनी यावेळी केला
यावेळी विमानतळाच्या जाचक अटी रद्द करण्यावर एकमत झाले. यादव यांनी अटी रद्दचा ठराव मांडला. यावेळी यादव म्हणाले विमानतळाच्या अटीमुळे पालिकेने थांबवलेले बांधकाम परवाने उद्यापासून त्वरीत द्यावेत. विमानतळाची अट अंतीम करताना पालिकेला विश्वासात घ्यावे. जाचक अटीमुळे शहरावर नांगर फिरणार असेल तर विमानतळाची धावपट्टी जेसीबीने उखडून टाकणार असा झणझणीत इशाराही याप्रकरणी यादव यांनी यावेळी दिला
No comments:
Post a Comment