वेध माझा ऑनलाइन
कराड
जिल्ह्यातील नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत त्यामुळे आता कराड पालिकेच्या निवडणुकीचे काय ? याही चर्चा शहराच्या चौकाचौकात जोर धरू लागल्यात काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या येथील पालिका निवडणुकीत जाधव,यादव, जयवन्त पाटील यांच्यासह लोकशाही आघाडी गटाची भूमिका काय असेल, या बरोबरच शहरातील काँग्रेस आणि भाजपाची पक्ष म्हणून भूमिका काय असणार याही विषयी लोक आता तर्क लावू लागले आहेत लोकांना या निवडणुकीबाबत मोठी उत्सुकता आहे
पालिकेत सध्या लोकशाही आघाडी,जनशक्ती आघाडी,भाजपा,व आ पृथ्वीराज चव्हाण यांचे नेतृत्व मानणारे सदस्य आहेत नगराध्यक्षा भाजपा च्या आहेत दरम्यान,जनशक्ती आघाडीत जाधव गट जयवन्त पाटील गट व यादव याना मानणाऱ्या नगरसेवकांचा गट असे तीन गट आहेत मात्र होणाऱ्या येथील पालिका निवडणुकीचे चित्र यावेळी वेगळेच असेल अशी शक्यता गेल्या पाच वर्षाच्या राजकारणाचा विचार केल्यास निर्माण झाली आहे...
या निवडणुकीत यादव गट एकला चलो रे ची भूमिका घेईल असे समजते किंवा एखाद्या येथील राजकीय गटाबरोबरही हात मिळवणी करू शकतो अशीही चर्चा आहे... यापूर्वी हे लोक लोकशाही गटाशी जवळीक करून होते नंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्याजवळ जाऊन बसले भाजपाच्या सत्ताकाळात भाजपा नेत्यांच्या आजूबाजूलाही ते दिसत होते सध्या सहकारमंत्र्यांच्या लोकशाही गटाशी जवळीक करताना ते दिसत आहेत अशी चर्चा असली तरी त्यांचे जमेल की नाही हे लोकशाही गटाच्या भूमिकेवर सर्वस्वी अवलंबून आहे जिकडे आम्ही तिकडे गुलाल... असा यादव गटाचा विश्वास नेहमीच दिसला आहे दरम्यान, कोणाशी नाही जमले तर एकला चलो अशी भूमिका हा गट घेईल का ? हे पहावे लागणार आहे...
जाधव गटाने कित्येक महिने अगोदरच आपली भूमिका पृथ्वीराज चव्हाण गटाबरोबरच असल्याचे शहराला दाखवून देत स्पष्टपणे आपली दिशा व भूमिका उघड केली आहे झालेल्या विधानसभा निवडणुकीत या गटाने शहरात पृथ्वीराज चव्हाण यांची पाठराखण करत शहरातून त्यांना लीड देण्यात पुढाकार घेतला होता या पाच वर्षात जनशक्ती च्या पालिकेबाबतच्या बहुतांशी इव्हेंट मधून जाधव गटाचा सहभाग पहिल्यापासूनच फारसा दिसलेला नाही हे शहरानेही अधोरेखित केले आहे जाधव कुटुंबावर कराडकरांचे प्रेम व निष्ठा असल्याचे वारंवार दिसून येते त्याचा या निवडणुकीत सकारात्मक परिणाम दिसून येईल असा विश्वास जाणकार व्यक्त करताना दिसत आहेत
उपनगराध्यक्ष जयवंत पाटील हे देखील जनशक्ती आघाडीचे नेते असूनही कित्येक महिन्यापासून पार्टीतील यादव गटापासून फारकत घेऊन बाजूला आहेत त्यांची ही या निवडणुकीत भूमिका काय?हे शहराला जाणून घ्यायच आहे त्यांनी मधल्या काळात आ पृथ्वीराज चव्हाण यांची एका कामानिमित्त भेट घेतली असता त्याची शहरात मोठी चर्चाही झाली होती जयवंतदादा आणि काँग्रेस त्यांची ताकद एकत्र यावी म्हणून काँग्रेस नेते शिवराज मोरे अनेक दिवसांपासून प्रयत्नात असल्याचे समजते नुकत्याच झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जयवन्तदादा नामदार बाळासाहेब पाटील यांच्या समर्थनार्थ भोसलेंच्या पहिल्या फळीतल्या नेत्यांबरोबर दिसले त्यामुळे त्यांची भूमिका या निवडणुकीत नेमकी काय असणार हेही कळणे तितकेच महत्वाचे आहे
लोकशाही गटाने ताक फुंकत आपली पाऊले उचलायला सुरू केल्याचे दिसतय त्यासाठी त्यांना त्यांचे पहिले अनुभव गाठीशी आहेतच त्यामुळे सत्ता असताना गर्दी करणार्यापेक्ष्या निष्ठवंतांच्या भावनांना महत्व देताना हा गट सध्यातरी दिसतोय आणि म्हणून पक्ष पातळीवर असो किंवा आघाडी म्हणून असो...या निवडणुकीत उतरताना या आघाडीच्या योग्य निर्णयाकडे सम्पूर्ण शहराचे लक्ष आहे कारण त्या निर्णयावरच लोकभावनेला हवा असलेला करेक्ट कार्यक्रम होण्यासाठी शहराची त्यांना मदत होणार आहे !
दुसरीकडे भाजपाने पक्षचिन्हवर ही निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे मात्र सुरेश भोसले यांनी नुकतेच आपण यापुढे नामदार पाटील यांना राजकीय मदत करणार आहोत असे जिल्हा बँकेत नामदार पाटील निवडून गेल्यानंतर त्यांच्या झालेल्या सत्कार सोहळ्यात जाहीर केले आहे त्याचा अर्थ अद्याप स्पष्ट झालेला नाही त्यामुळे भाजपा म्हणून भोसले गट कोणती भूमिका घेणार हा प्रश्न या निवडणुकीसाठी आहेच... दुसरीकडे भाजपाचे निष्ठावन्त मात्र पक्षचिन्ह घेऊन आपला किल्ला लढवताना या निवडणुकीत दिसतील यात शंका नाही...!
काँग्रेसचे प्रदेशचे नेते नाना पटोले यांनी नुकतेच काँग्रेस पक्षदेखील चिन्हावर स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुका लढणार आहे असे जाहीर केलय आणि कराडात देखील लोक भावना तशीच आहे अस कळतय...असे सांगत पृथ्वीराजबाबा यांनीही काही दिवसांपूर्वी याविषयी दुजोरा देणारे वक्तव्य केले होते... मात्र तशी कोणतीही अधिकृत घोषणा शहराच्या निवडणुकीसाठी झालेली नाही... कदाचित ऐनवेळी नामदार पाटील व पृथ्वीराजबाबा हे दोघे एकत्र येऊन ही निवडणूक महाआघाडी म्हणून लढतील का ? असा प्रश्नही जाणकाराना आहेच कारण संधीसाधू राजकारण हद्दपार करण्यासाठी हे पाऊल उचलले जाईल अशीही शक्यता आहे...! एकूणच ही निवडणूक आतापर्यंत झालेल्या निवडणुकीपेक्षा नक्कीच वेगळी असेल या निवडणुकीत कोणाला निवडून आणायचे यापेक्षा कोणाला पाडायचे याचे गणित मांडून समीकरणे आखली जाण्याची शक्यता आहे गेल्या पाच वर्षाच्या आपसात केलेल्या कुरघोड्याचे कारण यासाठी कारणीभूत मानल जातंय आणि या पाच वर्षात झालेल्या इतर निवडणुकांचे संदर्भदेखील त्याला कारणीभूत आहेत अशीही चर्चा आहे
No comments:
Post a Comment