Sunday, November 7, 2021

कराडात गब्बर ग्रुपचा दिवाळी फराळ कार्यक्रम प्रचंड उत्साहात साजरा ; कार्यक्रमाच्या निमित्ताने उघड झाल्या राजकारण्यांच्या छुप्या भूमिका...? शहरात चर्चा...

वेध माझा ऑनलाइन
कराड 
 सामाजिक कार्यात अग्रेसर म्हणून राज्यात नावलौकिक मिळवलेल्या कराड शहरातील गब्बर या सामाजिक ग्रुपच्या वतीने नुकतेच दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात शहरातील बिविध क्षेत्रातील मान्यवरांसहित आजी माजी नगरसेवकांनी देखील हजेरी लावली होती कराड दक्षिण चे आमदार प्रिथ्वीराजबाबा यांचेही आगमन या कार्यक्रमासाठी खास आकर्षण ठरले...मात्र या कार्यक्रमावेळी कोण कुठे बसले...आणि कोणी कुठे बसायचे टाळले... यावरून शहरात चाललेला राजकारण्यांचा छुपा खेळ उघडपणे पहायला मिळाला त्यामुळे लोक आता होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर आपले तर्क वितर्क लावू लागले आहेत......

कराड शहरातील गब्बर हा सामाजिक कार्य करणारा ग्रुप म्हणून राज्यात परिचित आहे कोविड काळात या ग्रुपने अविस्मरणोय असे मोठे काम केले आहे वर्षभर वेगवेगळे सामाजीक उपक्रम या ग्रुपच्या माध्यमातून सातत्याने सुरूच असतात सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी या ग्रुपच्या कार्याचा गौरवदेखील केला आहे याच ग्रुपच्या वतीने दिवाळी फराळ कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते येथील सोमवार पेठेतील सारडा लॉन येथे हा कार्यक्रम पार पडला सदर कार्यक्रमामध्ये शहरातील विविध राजकीय पक्षाचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते तसेच शहराचे आजी माजी नगरसेवकही उपस्थित होते महत्वाचं म्हणजे कराड दक्षिण चे आमदार प्रिथ्वीराजबाबा चव्हाण व खासदार श्रीनिवास पाटील यांची उपस्थिती देखील कार्यक्रमाची उंची वाढवून गेली आणि या दोघांनीही त्याठिकाच्या उपस्थितांबरोबर दिलखुलास गप्पा मारत दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला

नुकतेच प्रिथ्वीराजबाबानी  येथील पालिकेची निवडणूक डिसेंबर एन्ड किंवा जानेवारी मध्ये होईल असे भाकीत केले आहे त्या अनुषंगाने शहरात चर्चेचे उधाण आलेले पहायला मिळत आहे... आणि त्याचाच एक भाग म्हणून आज गब्बर ग्रुपच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पालिका निवडणुकीत घडणारी गणिते अगोदरच पहायला मिळाली...

त्याचे झाले असे की...........
शहरातील गब्बर ग्रुपच्या या शानदार कार्यक्रमासाठी सारडा लॉन येथे अनेक मान्यवर तसेच नगरसेवक अगोदरच आपली उपस्थिती लावून बसले होते त्याचवेळी त्या ठिकाणी कराड दक्षिण चे आमदार प्रिथ्वीराजबाबा आले...ते आले तेव्हा अगोदरच ज्याठिकाणी नगरसेवक बसलेत त्याठिकाणी बाबांनी येऊन बसावे असा आग्रह नगरसेवक वाटेगावकर यांनी बाबांजवळ धरला...त्याचवेळी नगरसेवक अतुल शिंदे यांनी बाबांना त्याठिकाणी न बसता वेगळ्या ठिकाणी असलेल्या बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी बसण्याची विनंती केली...बाबांनी वाटेगावकर यांचे न ऐकता अतुल शिंदे यांच्या विनंतीला मान दिला...त्यानंतर बाबा गटाचे आजी माजी नगरसेवक व निष्ठावान कार्यकर्ते त्याठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले... अगोदरच हजर असलेल्या नगरसेवकांमध्ये लोकशाही गटाचे नेते सुभासकाका पाटील जनशक्तीचे गटनेते यादव मेहेरबान उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांच्यासह त्यांचे सहकारी देखील तिथे उपस्थित होते...त्याठिकाणी नगरसेविका श्रीमती शारदाताई जाधव व नगरसेवक फारुख पटवेकर हे देखील उपस्थित होते...बाबांना तेथे आलेले पाहताच शारदाताई जाधव व पटवेकर हे दोन्ही नगरसेवक त्याठिकाणच्या नगरसेवकांच्या बैठकीतून थेट उठून बाबांच्या जवळच्या आसनावर जाऊन बसले...तर राजेंद्र यादव हे  आपल्या सहकाऱ्यांसह तसेच त्याठिकाणी बसून राहिले त्यांच्या शेजारी योगायोगाने सुभाषकाकाही होते...यादव मेहेरबान आणि सुभाषकाका बऱ्याच कालावधीनंतर गब्बर च्या कार्यक्रमामुळे एकत्र दिसले हेही तितकेच खरे...
काही दिवसांपूर्वी जाधव गटाने बाबांच्या वाढदिबसाला आपला शुभेच्छा फलक लावून शहराच्या राजकारणात खळबळ माजवून दिली होती  जाधव गटाची बाबांशी राजकीय जवळीकदेखील झालेल्या आमदारकीपासूनच अधिक चर्चेत आहे त्यातच बाबांच्या वाढदिवसादिवशी शुभेच्छा फ्लेक्स लावून या गटाने पालिका निवडणुकीसाठी आपली ओपन भूमिका शहरासमोर आणली आहे... आज गब्बर च्या कार्यक्रमातही जाधव गटाचा तोच स्पष्टपणा पुन्हा पहायला मिळाला... तर दुसरीकडे उपनगराध्यक्ष जयवंत पाटील या कार्यक्रमात यादव मेहेरबान व सुभाशकाका यांच्यापासून चार हात लांबच बसलेले दिसले... एकंदरच, जाधव गट जयवंतदादा गट तसेच यादव व लोकशाही गट होणाऱ्या पालिका निवडणुकीत आपली काय भूमिका घेणार याबाबत तर्क वितर्क शहरात सुरू आहेतच...आणि, पुढे जाऊन  निवडणुकीत नेमकं काय होईल हेही कळेलच... पण,निवडणूक तोंडावर असल्यामुळे अशा चर्चा तर आता होणारच ना...!

No comments:

Post a Comment