कराड
आज सातारा जिल्हा बँकेची निवडणूक पार पडली त्यामधील सोसायटी गटाच्या झालेल्या लढती बाबत याठिकाणी काय होणार अशी... गेली महिनाभर चर्चा होती या गटात नामदार बाळासाहेब पाटील यांच्याविरुद्ध काँग्रेसचे माजी आमदार दिवंगत विलास्काका पाटील उंडाळकर यांचे चिरंजीव उदयदादा पाटील हे निवडणूक लढवत आहेत येथील शिवाजी हायस्कुल येथे ही निवडणूक आज पार पडली या निवडणुकीत शंभर टक्के मतदान झाले असल्याने ही निवडणूक काटेकी टक्कर ठरणार असल्याचे तज्ञांचे मत आहे दरम्यान या निवडणुकीत भोसले गटाचे मतदान निर्णायक ठरेल असे खुद्द भोसलेचे म्हणणे आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आज दिवसभर भोसले गटाचे मावळे नामदार बाळासाहेब पाटील गटाच्या मांडीला मांडी लावून बसलेले दिसले तरीदेखील त्यांचे मतदान कोणाला होणार याची चर्चा मात्र रंगलेली दिसली
गेली अनेक दिवस जिल्हा बँकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे राज्याचे सहकार मंत्री नामदार बाळासाहेब पाटील हे या निवडणुकीत उतरले आहेत दिवंगत आमदार विलास्काका पाटील उंडाळकर यांचे चिरंजीव ऍड उदय दादा पाटील यांचे विरोधात सहकार मंत्र्यांनी या निवडणुकीत दंड थोपटले आहेत गेली महिनाभर या निवडणुकीच्या निमित्ताने हाय होलटेज चर्चा सुरू आहे दिवंगत नेते विलास्काका पाटील यांचे पन्नास हुन अधिक वर्षे प्राबल्य राहिलेला हाच सोसायटी मतदार संघ आहे त्यांच्या निधनानंतर होणाऱ्या या निवडणुकीसाठी त्यांचे चिरंजीव ऍड उदयदादा पाटील यांची त्याठिकाणी बिनविरोध वर्णी लागावी अशी काका प्रेमींची इच्छा होती मात्र तसे होऊ शकले नाही जिल्ह्याचे पालकमंत्री ना बाळासाहेब पाटील यांनी त्याच मतदार संघातूंन आपण उभे राहणार असल्याचे जाहीर केले
एकूण 140 इतके मतदान या मतदारसंघात आहे त्यामध्ये कराड उत्तर व दक्षिण मतदारसंघाचा भाग येतो त्यामध्ये प्रामुख्याने कृष्णेच्या भोसले गटाचे मतदान यावेळी महत्वाचे व निवडणुकीला निर्णायक ठरवणारे आहे असे खुद्द भोसले सांगतात त्यामुळे भोसले गट या निवडणुकीत कोण विजयी होणार हे ठरवणार आहे !
डॉ अतुल भोसले हे कराड उत्तर मधून बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात उभे असताना 40 हजाराने पडले होते त्यानंतर त्यांनी मतदारसंघ बदलला ते दक्षिण मध्ये आले दरम्यान त्यांनी काका व पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात त्यावेळी दक्षिणेत येऊन निवडणूक लढवली होती त्यानंतर नुकत्याच झालेल्या निवडणुकीत देखील ते पृथ्वीराज चव्हाण यांचे विरोधात उभे होते पराभूत होऊनही यावेळी त्यांची मते खूपच वाढलेली दिसली मात्र या झालेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून अतुलबाबाना रोखण्यासाठी उदयदादाना उभे केले गेले दिवंगत काका गटाची मते डायरेक्ट बाबाना मिळणे शक्य नव्हते कारण काका बाबा गटाचे पूर्वीपासूनचे विल्या-भोपळ्याचे सख्य सम्पूर्ण राज्याला माहीत होते काका गटाची मते भोसलेना डाव्हर्ट होऊ नये याची काळजी घेतली गेली तरी निम्मी मते दोन्ही बाबांना डिस्ट्रिब्युट झाली आणि उरलेली निम्मी उदय दादांनी घेतली पर्यायाने पृथ्वीराजबाबा आमदार झाले अतुलबाबा थोडक्यात पडले... दरम्यान त्याचवेळी भविष्यात उदय दादा व अतुलबाबा यांच्यापैकी एकजण दक्षिण मतदार संघाला आमदार म्हणून मिळणार हेही नक्की झाले नुकत्याच झालेल्या कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत उदय दादांनी अविनाश मोहिते गटाची पाठराखण करत भोसलेना विरोध केला तर भोसलेना इस्लामपूर व कराड दक्षिण मधून छुपी मदत राष्ट्रवादीने केल्याची चर्चा झाली ही निवडणूक भोसले जिंकले... त्यानंतर खऱ्या अर्थाने नामदार पाटील व भोसले यांच्या राजकीय जवळीकीची चर्चा उत्तर-दक्षिण मतदार संघात होऊ लागली दरम्यान काही कालावधीने आता जिल्हा बँक निवडणूक होत आहे त्यामधून भोसले कोणाला मदत करणार हे अद्याप गुपितच राहिले असले तरी आज मतदानादरम्यान त्यांचे पहिल्या फळीतले सर्व कार्यकर्ते नामदार पाटील गटाच्या मांडीला मांडी लावून बसलेले दिसले... खरतर दक्षिणेत ग्रामपंचायत असेल किंवा एखाद्या गण किंवा गटाची निवडणूक होत असेल तर काका व भोसले गट एकमेकांच्या हातात हात घालून अनेक ठिकाणी एकत्रित दिसला आहे, आणि आजही दिसतो... कृष्णेच्या निवडणुकीतही असेच चित्र अनेकवेळा पहायला मिळते... ते गणित यापुढे सुरू राहण्यासाठी काका व भोसले गट स्थानिक पातळीवर प्रयत्नशील राहीलच ! असे जाणकारांचे म्हणणे आहे उत्तरेतील पाटलांची मदत काही अंशी त्यांना दक्षिणेत होईल हेही खरे...पण आत्तापर्यंतचा इतिहास पाहता काका आणि भोसले यांचे एकत्र समीकरण दक्षिणेत यापुढे विस्कटेल असे आतातरी वाटत नाही... आणि म्हणून आज या निवडणुकीच्या निमित्ताने भोसलेंनी आपले मावळे नामदार पाटील यांच्या बरोबर उघड केले असले तरी स्वतःची भूमिका उदय दादांच्या विरोधात घेतली नाही... हेही तितकेच खरे ! त्यामुळे आज भोसले कोणत्या पाटलांजवळ बसले हे सर्वांनी पाहिले तरी त्यांनी कोणत्या पाटलांना मतदान केले ? हे अद्याप गुलदस्त्यातच आहे आणि ते कळण्यासाठी निकालाच्या दिवसाची वाट पहावी लागणार आहे हे मात्र निश्चित !
No comments:
Post a Comment