कराड
जिल्हा बँकेची निवडणूक होत आहे त्याच पार्शवभूमीवर सोसायटी गटात काय होणार ? याची चर्चा राज्यभर रंगली आहे या निवडणुकीत ऍड उदय दादा पाटील उंडाळकर व स्वतः सहकार मंत्री ना बाळासाहेब पाटील यांची थेट लढत होत आहे त्याच निवडणुकीच्या अनुषंगाने ना पाटील यांनी आज एका मेळाव्याचे आयोजन केले आहे या मेळाव्यात कृष्णा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा डॉ सुरेश भोसले व मदनदादा मोहिते उपस्थित राहणार आहेत हे सगळे आज एकत्रित एका व्यासपीठावर दिसणार आहेत याचे सर्वाना अप्रूप आहे आणि याचीच सध्या चर्चा रंगली आहे...
एकेकाळी कराड उत्तर मधून एकमेकाच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवलेले नामदार बाळासाहेब पाटील व भोसले आता सातारा जिल्हा बँकेच्या होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र दिसणार आहेत यामागे ऍड उदय पाटील यांना जिल्हा बँकेत जाण्यापासून रोखणे हा सध्यातरी उद्देश दिसतो आहे कारण या निवडणुकीत जर उदयदादा विजयी झाले तर दादा राज्याच्या राजकीय पटलावर लक्षवेधी म्हणून अधोरेखित होतील आणि हे भोसले व नामदार पाटील यांना दक्षिणमध्ये राजकारण करताना पुढे जाऊन पेलणार नाही भविष्यात पृथ्वीराज चव्हाणांची ताकद शहरासह ग्रामीण मध्ये उदयदादाना उचलून धरणार आहे शिवाय कृष्णेच्या रणांगणातील दोन्ही मोहिते उघडपणे पृथ्वीराजबाबांच्या शब्दावर भोसलेना विरोध करण्यासाठी दादांच्या मागे उभे राहतील यात शंकाच नाही मात्र उदयदादाना यावेळच्या विधानसभा निवडणुकीत मागच्या म्हणजे काका उभे असताना पडलेल्या मताच्या तुलनेत कमी मते मिळाल्याने आणि नुकत्याच झालेल्या "कृष्णा करखान्याच्या निवडणुकीपासून उंडाळकर गटाची दक्षिणेत घडी विस्कटली की काय ? अशी चर्चा सुरू असल्याने ती घडी पुरती विस्कटून टाकून आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी भोसले यांची उत्तरेतील पाटलांशी एकत्र होण्याची खेळी खेळली जात असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे जिल्हा बँक निवडणूक त्यासाठी कारण आहे तर याच बँकेच्या होणाऱ्या निवडणुकीत उत्तरेतील पाटीलासाठी दक्षिणेतील भोसलेची मदत निर्णायक ठरणार आहे असे भोसले गटाचे म्हणणे आहे दोन्ही बाजूचे एकत्रीकरण त्यामुळेच तर होताना दिसत आहे
माजी आमदार विलासकाकां उंडाळकरांच्या निधनानंतर झालेली विधानसभा निवडणुक ही उदयदादाना महत्वाची होती... अर्थात त्या निवडणुकीत स्वतः दादा निवडून येण्यापेक्षा डॉ अतुलबाबा पडणे त्यांना महत्वाचे होते... म्हणून त्यांनी आणि पृथ्वीराजबाबांनी मिळून खेळी खेळली त्याची आजही चर्चा असते... ती म्हणजे...त्याच निवडणुकीत उदयदादाना चक्क काँग्रेसचे विरोधी उमेदवार म्हणून उभे केले...त्या निवडणुकीत त्यांनी मिळवलेली मते पृथ्वीबाबाना आमदार करायला कारणीभूत ठरली .. पारंपरिक काका-बाबा गटाचा विरोध राज्यात परिचयाचा आहेच काकांची मते या निवडणुकीत थेट बाबांना मिळणे कठीण होते म्हणून ती मते भोसलेकडे डायव्हर्ट होऊ नये याचि काळजी घेतली गेली... त्याकरिताच उदयदादाना काँग्रेस विरोधी उमेदवार म्हणून उभे करून काका गटाची मते खाल्ली गेली...आणि काँग्रेसचा उमेदवार आमदार म्हणून निवडून आणला गेला...त्यासाठी काकांची मते त्यांचे चिरंजीव उदयदादांना मिळाली खरी... पण काकांच्या निम्मीच...उरलेली मते दोन्ही बाबांच्यात "डिस्ट्रिब्युट' झाल्याने दोघांची मागच्या वेळेपेक्षा यावेळची मते वाढली... तरीही उदयदादा उभे नसते तर निकाल भाजपाच्या बाजूने दिसला असता...म्हणून दादा- बाबा यांनी मिळून खेळलेली खेळी दक्षिणमध्ये पृथ्वीबाबांना आमदार करून गेली...याची आजदेखील चर्चा असते...निकाल लागला त्याच दिवशी दुपारी उदयदादा पृथ्वीबाबा यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करून गेले...त्यानंतर प्रिथ्वीबाबानी स्वतः पुढे होऊन उदयदादाना काँग्रेसचे राज्याचे काँग्रेसचे पदाधिकारी करण्यात पुढाकार घेतला त्यामुळे आता दक्षिणेत भोसले व काका गट यांचा भविष्यात आमदारकीसाठी संघर्ष होणार हे नक्की आहे... म्हणूनच दक्षिणमध्ये उदयदादाना रोखण्यासाठी भोसलेना संधी हवी असताना नामदार बाळासाहेब पाटील यांना उदय दादांनी जिल्हा बॅंकेत केलेला आताचा विरोध हाणून पाडण्यासाठी उत्तरेतील पाटलांना मदत करण्याचे बेरजेचे राजकारण करताना भोसले सध्या दिसत आहेत... एकमेकांचे विरोधक म्हणून गेली 10 वर्षाहून अधिक काळ एकमेकामधून विस्तवदेखील जात नसलेले भोसले आणि उत्तरेतील पाटील आता यानिमित्ताने खुर्चीला खुर्ची लावून बसले आहेत... यात दोघांचाही राजकीय फायदा नक्कीच आहे ?...म्हणून दुष्मन का दुष्मन दोस्त होता है... हे समीकरण यातून साकार होताना दिसतंय... पाहूया पुढे काय होतय ते...!
No comments:
Post a Comment