कराड
भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ व निष्ठावान नेते माजी नगरसेवक राजाभाऊ देशपांडे (दादा) यांचे काल वृद्धापकाळाने निधन झाले आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले दरम्यान आज त्यांची कराड शहरातून अंत्ययात्रा काढण्यात आली होती शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांसह लोकशाही आघाडीच्यावतीने देखील दादांना आदरांजली वाहण्यात आली
शहरातील मुख्य ठिकाणी ही अंत्ययात्रा जाऊन त्याठिकाणी भाजपासह विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांसह अनेक मान्यवरांनी राजाभाऊंच्या अंत्ययात्रेत सामील होऊन दादांचे अंतिम दर्शन घेतले
सदर अंत्ययात्रा मंगळवार पेठ येथे आली असता आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब यांच्या कुटुंबियासह लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत पाटील (काका) व नगरसेवक सौरभ पाटील यांनी देखील दादांचे अंतिम दर्शन घेऊन त्याठिकाणी
दादांना आदरांजली वाहिली.काही दिवसांपूर्वीच सौरभ तात्या यांनी राजाभाऊंच्या घरी जाऊन त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांचे आशीर्वादही घेतले होते व तब्बेतीची विचारपुसही केली होती त्यांच्या कुटुंबाचा देशपांडे घराशी नेहमीच स्नेह राहिला आहे...
यावेळी लोकशाही आघाडीचे सुहास पवार (भाऊ), शिवाजी पवार (तात्या), जयंत बेडेकर (दादा), रवींद्र मुंढेकर,ऍड. प्रताप पाटील, नवाज सुतार, भारत थोरवडे, संदीप कोडगुले सतीश भोंगाळे, सबिरमीयां मुल्ला, सचिन मुळे, इंद्रजीत घोलप व देशपांडे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
No comments:
Post a Comment