कराड
येथील नगरपरिषद निवडणूक डिसेंबर ते जानेवारी महिन्यात होईल असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री आ.प्रिथ्वीराज चव्हाण यांनी आज व्यक्त केले
प्रतिवर्षीप्रमाणे आ प्रिथ्वीराजबाबा यांच्यावतीने येथील पत्रकारांसाठी दिवाळी फराळचे आयोजन त्यांच्या पाटण कॉलनी येथील निवासस्थानी केले होते त्यावेळी ते अनौपचारिक चर्चा करताना बोलत होते
राज्यातील अनेक विषयाला त्यांनी यावेळी स्पर्श करत दिलखुलास चर्चा केली व पत्रकारांना दिवाळी शुभेच्छा दिल्या
यावेळी बोलताना ते म्हणाले, पालिका निवडणूक येत्या डिसेंबर ते जानेवारी महिन्यात होईल या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने पक्ष चिन्हावर लढावे असा सामाजीक सूर दिसतो आहे मलकापूर प्रमाणे कराडमध्येही आम्हाला एकहाती सत्ता मिळावी म्हणजे विकास होण्यास मोठा वाव मिळेल ही निवडणूक ओ बी सी आरक्षणासहित होईल असे सांगत ते पुढे म्हणाले प्रत्येक राजकीय पक्षाला आपल्या परीने मोठे होण्याचा अधिकार आहे निवडणुकीदरम्यान महाविकास आघाडी होण्यासंदर्भात लोकल लेव्हलवर चर्चा होऊ शकते असेही त्यांनी बोलता बोलता सांगून टाकले
सध्या बहुचर्चित सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात बोलताना ते म्हणाले चर्चेत असलेल्या सोसायटी गटातील ना बाळासाहेब पाटील व ऍड उदयसिह पाटील यांचा या निवडणुकीतील राजकीय संघर्ष टाळण्याचा मी प्रयत्न केला त्यासाठी शरद पवार यांची भेट घेतली... काहीतरी करू...बघू... असे आश्वासन घेऊन मी आलो आहे... अर्ज मागे घेण्याची तारीख 2 दिवसांवर आहे...असे सूचक वक्तव्यही त्यांनी यावेळी केले दरम्यान कराड पालिकेचा पाच वर्षांचा कारभार कसा झाला याबाबत मी होणाऱ्या पालिका निवडणुकितच बोलणार आहे असेही ते यावेळी म्हणाले
मलकापूरच्या नगराध्यक्षांना लवकरच गाडी मिळणार ; मनोहर शिंदे
दिवाळी फराळ च्या निमित्ताने आजची अनौपचारिक चर्चा सुरू असताना मलकापूरचे नेते मनोहर शिंदे प्रिथ्वीराजबाबा यांनी केलेल्या कामाबाबत पत्रकारांना नव्याने माहिती देत होते त्याचवेळी राज्यातील अनेक पालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षाना त्या त्या पालिकेकडून गाडी मिळाली असताना मलकापूरच्या नगराध्यक्षाना कधी मिळणार...??? असे मनोहर शिंदे यांना यावेळी पत्रकारांनी विचारले असता... लवकरच मिळणार आहे... असे झटकन उत्तर देऊन पुढची चर्चा टाळत या कार्यक्रमाचा त्यांनी आभार मानून समारोपच केला...
कराड पालिका गाळेधारकांच्या भाडेवाढी संदर्भात लक्ष घालणार...
येथील पालिका गाळेधारकांच्या अचानक झालेल्या भाडेवाढीचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे याबाबत शासन स्तरावर तोडगा काढण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले याविषयी पालिकेतील संबंधितांनी मला भेटून माहिती द्यावी असेही ते म्हणाले
No comments:
Post a Comment