कराड शहरातील शाहू चौक मित्र परिवार ग्रुपच्या वतीने काल नगरसेवक सौरभ अशोकराव पाटील (तात्या) यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रारंभी सौरभतात्या आणि शाहु चौक मित्र परिवाराच्या सर्व सदस्यांनी श्री राजर्षी शाहु महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर ग्रुपच्या वतीने तात्यांना फेटा बांधून,केक कापण्यात आला.ग्रुपच्या सदस्यांनी मनोगत व्यक्त करून तात्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व तात्यांच्या सुरू असलेल्या सामाजिक,राजकीय,शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीस सुयश चिंतिले.
याप्रसंगी बोलताना सौरभतात्या म्हणाले शाहू चौक मित्र परिवार हा ग्रुप कराड शहरातील प्रत्येक कार्यात सक्रिय सहभाग घेणारा ग्रुप आहे.या ग्रुप मधील सर्व सदस्यांची कोरोना काळात रुग्णांच्या मदतीसाठी सुरू असलेली धावपळ मी स्वतः पाहिली आहे.रेमडीसीवर इंजेक्शन उपलब्ध होत नसताना ग्रुपच्या वतीने पुणे,कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी धावपळ करून हे इंजेक्शन गरजू रुग्णांस त्वरित मिळवून देताना अनेकदा यश मिळवले.ज्यांना वेळेवर बेड उपलब्ध होत नव्हते,त्या रुग्णांना बेड मिळवून देण्यासाठीही अनेकदा प्रयत्न केले.फक्त कोरोनाच नव्हे तर झालेल्या पावसाळ्यात आलेल्या महापूरामुळे शहरात अनेक ठिकाणी पुराचे पाणी शिरल्यामुळे पाटण कॉलनी तसेच अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले असताना या ग्रुपच्या सर्व सदस्यांनी अनेक नागरिकांना स्थलांतरित करण्यास मदत केली त्यावेळी दुकानातील साहित्य बाहेर काढण्यासदेखील नगरपरिषद प्रशासन व नागरिक,व्यापारी मित्रांना मदत केली.
या ग्रुपमध्ये सर्वपक्षीय, सर्व धर्मीय युवकमित्र मोठ्या प्रमाणात सक्रिय सहभागी आहेत हे ग्रुपचे मुख्य वैशिष्ट्य म्हणावे लागेल.आणि शाहू चौक मित्र परिवार गेल्या काही दिवसापासून अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहे.ही बाब खूप कौतुकास्पद आहे.या ग्रुपचा एक सदस्य म्हणून इथून पुढेही आपल्या सोबत असेन असेही तात्या यावेळी म्हणाले
यावेळी शाहू चौक मित्र परिवारचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment