Wednesday, November 3, 2021

स्व. जयमाला भोसले यांना मान्यवरांची आदरांजली...

वेध माझा ऑनलाइन
कराड
सहकार, सामाजिक, शिक्षण व आरोग्य क्षेत्रात उत्तुंग कार्य केलेले सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांच्या पत्नी आणि य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मातोश्री श्रीमती जयमाला जयवंतराव भोसले (वय ८९) यांचे सोमवारी (ता. १) रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. के.सी.टी. कृष्णा स्कूलच्या प्रांगणात आज त्यांचा रक्षाविसर्जन विधी संपन्न झाला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आईसाहेबांच्या आठवणींना उजाळा देत, त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहिली. 

स्व. जयमाला भोसले यांच्यावर काल मंगळवारी के.सी.टी. कृष्णा स्कूलच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याचठिकाणी आज डॉ. सुरेश भोसले, श्री. पृथ्वीराज भोसले, डॉ. अतुल भोसले, श्री. विनायक भोसले, डॉ. जयवर्धन भोसले यांच्या हस्ते रक्षाविसर्जनासह धार्मिक विधी करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, इंद्रजीत मोहिते, राजेंद्रसिंह घाटगे, सिद्धार्थ घाटगे यांच्यासह नातेवाईक उपस्थित होते.
यानिमित्ताने झालेल्या आदरांजली सभेत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आईसाहेबांच्या आठवणींना उजाळा देत आदरांजली वाहिली. जी. के. गुजर मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. अशोकराव गुजर म्हणाले, की आप्पांच्या सर्व कार्यात काकींचा मोठा सहभाग होता. त्यांच्याशी आमचा कौटुंबिक स्नेह होता. त्यांच्या आशीर्वादामुळेच मी सर्जन होऊ शकलो. काकींच्या अकाली निधनामुळे आपल्या भागाचे मोठे नुकसान झाले आहे. या दु:खातून डॉ. सुरेशबाबा आणि त्यांच्या कुटुंबाला सावरण्याची शक्ती मिळो अशी मी प्रार्थना करतो. 
आईसाहेब आपल्या सबंध जीवनात आप्पांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. शून्यातून कृष्णा समूह उभा करताना आप्पांनी अहोरात्र कष्ट घेतले. या कष्टाला आणि त्यांच्या विचाराला भक्कम पाठबळ देण्याचे काम आईसाहेबांनी केले. प्रत्येक सुखदु:खात त्या आप्पांच्या पाठिशी राहिल्या. राजकारणात कुठेही न येता समाजकारणात राहून, त्यांनी आपल्या कुटुंबातील कर्त्या पुरुषांना साथ देण्याचे काम केले, असे प्रतिपादन शेतीमित्र अशोकराव थोरात यांनी केले. 
इस्लामपूर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजीबापू पाटील म्हणाले, आईसाहेबांच्या निधनामुळे कराडबरोबरच आमच्या वाळवा तालुक्यावरही शोककळा पसरली. वाळव्याचे आणि कृष्णा समूहाचे नाते दोन पिढ्यांचे आहे. वाळव्यात प्रत्येक कुटुंबाला आप्पांनी आधार देण्याचे काम केले. त्यांना पाठबळ देणाऱ्या आईसाहेबांच्या निधनामुळे वाळव्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. 
यावेळी इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष भगवानराव पाटील, भीमराव पाटील, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सदस्य भाजप ॲड. भरत पाटील, महाराष्ट्र केसरी पैलवान आप्पासाहेब कदम, वर्धन ॲग्रोचे चेअरमन धैर्यशील कदम, सातारा जि. प. सदस्य मानसिंगराव जगदाळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आप्पासाहेब गायकवाड, भाजपा किसान मोर्चाचे राज्यसचिव रामकृष्ण वेताळ, माजी आमदार भगवानराव साळुंखे, महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर, रयत संघटनेचे प्रा. धनाजी काटकर, भाजपाचे सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार आनंदराव पाटील, कृष्णा कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, माजी संचालक माणिकराव जाधव, इस्लामपूरचे उपनगराध्यक्ष दादा पाटील आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. 
यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, सुनील पाटील, कृष्णा कारखान्याचे संचालक लिंबाजीराव पाटील, धोंडीराम जाधव, संजय पाटील, दयानंद पाटील, जितेंद्र पाटील, माजी संचालक पांडुरंग होनमाने, धनलक्ष्मी पतसंस्थेचे दिलीपराव चव्हाण, माजी नगरसेवक महादेव पवार, भाजपाचे तालुकाध्यक्ष पैलवान धनाजी पाटील, जि.प. सदस्य सागर शिवदास, माजी संचालक ब्रम्हानंद पाटील, संग्राम पाटील, कृष्णा बँकेचे व्हाईस चेअरमन दामाजी मोरे, संचालक चंद्रहास जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment