गोविंद विनायक देशपांडे उर्फ राजाभाऊ देशपांडे यांनी या परिसरात भारतीय जनता पार्टी ऊभी करण्यासाठी दिवसाची रात्र केली काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात हे शिवधनुष्य त्यांनी वेळप्रसंगी स्वतःचा पैसा अडका खर्च करून पेलण्याचा निष्ठेने प्रयत्न केला तेही कोणत्याही अपेक्षेशिवाय...ते स्वतः वैचारिक आणि लढवय्ये नेते होते त्यांच्या निष्ठेबद्दल त्यांचे राजकीय विरोधक देखील अभिमानाने बोलताना नेहमीच दिसले कराड नगर परिषदेमध्ये त्यांनी नगरसेवक म्हणून काहीकाळ प्रतिनिधित्व केले. तसेच कराड उत्तर विधानसभा मतदार संघातून निवडणूकही लढवली होती तर त्यावेळच्या कराड लोकसभा मतदारसंघातूंन देखील त्यांनी लोकसभा निवडणूक लढवून भाजपा घराघरात पोचवल्याचे सर्वज्ञातच आहे कराडची भाजपा म्हणजे राजाभाऊ असे समीकरणच बनले होते...त्यांच्या जाण्याने एका निष्ठावंत पर्वाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होताना दिसत आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजाभाऊ देशपांडे यांची त्यांच्या येथील राहत्या घरी जाऊन नुकतीच भेट घेतली होती
भावपुर्ण श्रद्धांजली
ReplyDelete