Monday, November 29, 2021

डॉ अतुलबाबा म्हणाले होते...आम्ही कराड पालिकेची निवडणूक विक्रम पावसकर यांच्या नेतृत्वात लढू...मी कार्यकर्ता म्हणून काम करेन...या वक्तव्याचा अर्थ जिल्हा बँकेच्या निकालानंतर स्पष्ट झाला आहे !

वेध माझा ऑनलाइन
कराड
काही दिवसांपूर्वी येथील विश्रामगृह येथे भाजपा ची पत्रकार परिषद पार पडली त्यामध्ये नेते डॉ अतुल भोसले म्हणाले होते की होणारी पालिका निवडणुक आम्ही शेखर चरेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या नेतृत्वात लढू आणि आपण मात्र कार्यकर्ते म्हणून या निवडणुकीत काम करू...या त्यांच्या बोलण्याचा अर्थ त्यावेळी कोणालाच कळला नाही मात्र जिल्हा बँकेची निवडणूक झाली आणि त्यांच्या "या' बोलण्याचा अर्थ उघड झाला...! 

गेल्या काही दिवसांपूर्वी येथील भाजपा ची पत्रकार परिषद पार पडली त्यावेळी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी शहरात होणाऱ्या पालिका निवडणुकीत पक्षचिन्हवरच आम्ही सर्व जागा लढवणार आहोत असे जाहीर केले त्यावेळी बोलताना भाजपा चे राज्याचे पदाधिकारी डॉ अतुल भोसले म्हणाले ही निवडणूक चरेगावकर यांचे मार्गदर्शनाखाली व विक्रम पावसकर यांच्या नेतृत्वाखाली होईल मात्र आपण या निवडणुकीत एक कार्यकर्ता म्हणून सहभागी असू...ते असे का बोलले हा प्रश्न त्यावेळी फारसा कोणाला पडला नाही...ते प्रत्येकाला आदराने नेहमीच बोलताना दिसतात, समोरच्या व्यक्तीला मोठेपणा देतात तशा अर्थाने ते चरेगावकर व पावसकर यांचे नाव घेऊन बोलले असावेत असे त्यावेळी वाटले... याच पत्रकार परिषदेतून नामदार बाळासाहेब आम्हाला सन्माननीय आहेत असेही ते म्हणाले होते त्यानंतर झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निकालाने त्यांच्या बोलण्यामागचे सगळे इरादे स्पष्ट झाले आणि त्यातून होणाऱ्या पालिका निवडणुकीतून भोसले गटाने शहरात आपली फळी आणखी मजबूत करणारी गणिते आखली असल्याचे उघडही झाले
 
केवळ भाजपाच्या माध्यमातून आपण फारसे शहरात मजबूत होऊ शकत नाही शहरात भाजपाचा दुसरा गट म्हणजे पावसकर गट देखील कार्यरत आहे त्यामुळे आपली ताकद राजकीय तडजोडीतूनच शहरात वाढवण्याचे त्यांचे गणित दिसते आहे आणि तसे झाल्यास या निवडणुकीतून त्यांना भाजपा च्या माध्यमातून अधिक पुढे पुढे करता येणार नाही स्थानिक गट किंवा इथल्या एखाद्या ताकदी बरोबर आपल्या गटाचे जुळवून घ्यायचं झालं तर त्यांचेच विरोधक म्हणून या निवडणुकीत त्यांना समोरासमोर येता येणार नाही उमेदवार निवडीबाबत देखील आपले कार्यकर्ते काहीजण भाजपा मधून तर काही तडजोड झालेल्या गटातूनदेखील त्यांना उभे करता येणार आहेत  दोन्ही बाजूने आपले लोक त्यांना पालिकेत निवडून आणून देत आपली ताकद शहरात आणखी वाढवता येणार आहे झालेल्या विधानसभेसाठी त्यांना शहरातून म्हणावे असे मतदान मिळाले नाही त्यासाठी त्यांना येथील स्थानिक नेत्यांवर अवलंबून रहावे लागले त्यांचा स्वतःचा असा गट शहरात नाही त्यामुळे केवळ काही मतात ते हारले मात्र ग्रामीण मतात ते मजबूत आहेत भविष्यात तडजोड झालेल्या शहरातील एखाद्या गटातून व दुसरीकडे  पक्षाच्या माध्यमातून पालिकेत त्यांचे विश्वासू सरकारी निवडून गेले तर त्यांना ही बेरीज नक्कीच फायदेशीर ठरणार आहे आणि महत्वाचे म्हणजे शहरातील पुढाऱ्यांवर त्यांना अवलंबून रहावे लागणार नाही शिवाय भाजपाच्या शहरातील दुसऱ्या गटाला ते यातून आपला शह देऊ शकतात भाजपाच्या या गटाशी त्यांचे फारसे सख्य नाही याची चर्चा शहरात नेहमीच असते एकूणच त्यांच्या या बेरजेच्या राजकारणाचे गणित व अर्थ पत्रकार परिषदेतील त्यांच्या बोलण्यामागे होता हे आता स्पष्ट झाले आहे म्हणूनच झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून नामदार पाटील यांना मदत करत भोसलेंनी पालिका निवडणुकीसह भविष्यातील एकूणच राजकारणाच्या गणिताची मुळे आणखीनच घट्ट केली आहेत 

डॉ अतुलबाबा यांनी शहरातील राजकारणात आपली राजकीय एन्ट्री धक्कादायक पद्धतीने केल्याचा इतिहास आहे ही दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे... त्यावेळी निवडून येऊन नगरसेवक अल्ताफ शिकलगार,रामभाऊ कोळी यांनी अचानकपणे आम्ही डॉ अतुलबाबांचे नेतृत्व मानतो असे एका पत्रकार परिषदेतून सांगून शहराच्या राजकारणात खळबळ माजवून दिली होती त्यातूनच दक्षिणचे  आमदार होण्यासाठी अतुलबाबा आपली पाऊले टाकत होते त्याकरिता शहरातून आपला मजबूत गट निर्माण करणे त्यांना गरजेचे होते त्यासाठी शहरात एन्ट्री करणेही त्यांना त्यावेळी महत्वाचेही होते होते तेच त्यांनी केले राजकारणात प्रत्येकाला आपला गट किंवा पक्ष मोठा करण्याचा अधिकार आहे आणि त्यानुसार ते आजही प्रयत्नशील दिसतात मात्र केवळ भाजपा म्हणून त्यांना कराड दक्षिण व शहरामध्ये मजबूत होणे फारसे शक्य नाही त्यांना स्वतःची ताकद तयार करावी लागेल त्यासाठी राजकीय तडजोडीदेखील त्यांना केल्याचं पाहिजेत त्यांना त्या महत्वाच्या आहेत कारण विरोधकांची ताकद व पक्षांतर्गत विरोध याला पार करून त्यांना दक्षिणेत मजबूत व्हायचं आहे त्यांनी आपली ग्रामीण राजकीय ताकद जबरदस्त मजबूत केली आहे तश्याच प्रकारची फळी शहरातून तयार झाल्यास त्यांना आमदारकी दूर नाही...याचाच सारासार विचार करून सध्या त्यांच्या नामदार गटाबरोबर होणाऱ्या "कोंप्रमाईज'च्या हालचाली यशस्वी होताना दिसतायत त्याकरिता नामदार गट देखील पुढाकार घेताना दिसतोय त्यांनी एकमेकाला कृष्णा कारखाना तसेच जिल्हा बँकेत मदत करत भविष्यातील आपल्या राजकीय एकत्रिकरणाचे संकेतही दिले आहेत ही कराड शहर व दक्षिणेत होणाऱ्या नवीन राजकारणाच्या नांदीची चाहूलच  असल्याचे मानलं जातंय नामदार पाटील जिल्हा बँकेवर निवडून गेले त्यावेळी भोसलेंनी त्यांचा सत्कार केला त्यावेळी बोलताना डॉ सुरेश भोसले यांनी यापुढे आम्ही नामदार पाटील यांना सर्व सहकार्य करणार आहोत असे राजकीय वचनदेखील जाहीर भाषणातून दिले आहे...एकूणच या सगळ्या बेरजेच्या राजकारणाचे गणित मांडूनच पालिका निवडणुकीत पावसकर नेतृत्व करतील... मी फक्त कार्यकर्ता म्हणून काम करेन असे भोसले म्हणाले असावेत का ? याचीच चर्चा आहे.

No comments:

Post a Comment