Thursday, February 29, 2024

प्रीतिसंगम घाट परिसराच्या सुशोभीकरणासाठी प्रयत्नशील : : ऐतिहासिक महत्व टिकविणार: डॉ. अतुल भोसले ;

वेध माझा ऑनलाईन। कराडमध्ये कृष्णा नदीच्या काठी असलेल्या प्रीतिसंगम घाटाला ऐतिहासिक महत्त्व आहे. याठिकाणच्या उद्यानाच्या दक्षिणेला असलेला पंतांचा कोट, हा पूर्वीचा भुईकोट किल्ला आहे. या भागाचे ऐतिहासिक महत्व टिकविण्याच्या दृष्टीने, प्रीतिसंगम घाट परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी राज्य शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांनी दिली. प्रीतिसंगम घाट परिसराच्या पाहणीप्रसंगी ते बोलत होते.

कराड येथील प्रीतिसंगम घाट परिसराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. याठिकाणी लोकनेते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळास भेट देण्यासाठी राज्यभरातून अनेक नागरिक, विद्यार्थी तसेच पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. या भागाचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेऊन, या परिसराच्या सुधारणेसाठी कराड नगरपालिकेने विकास आराखडा तयार केला आहे. याची माहिती घेऊन डॉ. भोसले यांनी घाट परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली.

या परिसरात उद्यानालगत असलेल्या पायऱ्यांच्या भागावर आकर्षक फ्लॉवर बेड करणे शक्य आहे. तसेच या भागातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या ढासळलेल्या बुरुजांची डागडुजी करून, त्यावर लाईट शोच्या माध्यमातून आकर्षक विद्युत रोषणाई करणे शक्य असल्याच्या सूचना डॉ. भोसले यांनी केल्या. या परिसराच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी आणखी काही सुधारणा करता येतील का, याबद्दल या क्षेत्रातील लोकांशी बोलून सविस्तर विकास आराखडा शासन दरबारी दाखल करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. तसेच यासाठी शासनाकडून भरघोस निधी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाहीदेखील यावेळी दिली.

दरम्यान, कराडमधील सायकलस्वारांनी कराड ते जगन्नाथपुरी ते पुन्हा कराड असा प्रवास १५ दिवसात सायकलवरून पूर्ण केला. यामध्ये माजी उपनगराध्यक्ष दिपक बेलवणकर, तेजस गुरसाळे, अमोल बेलवणकर, वैभव गुरसाळे, उमंग पवार, राजेंद्र भोसले यांचा सहभाग होता. तसेच चिपळूण ते अक्कलकोट व पुन्हा चिपळूण असा ६१० किलोमीटरचा प्रवास सायकलवरून अवघ्या ३८ तासांत पूर्ण करून पत्रकार चंद्रजित पाटील व  रणजीत शिंदे यांनी अनोखा विक्रम केला आहे. याबद्दल या सर्वांचा डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी शिवसेनेचे नेते रणजित पाटील, कराडचे माजी नगराध्यक्ष सुभाषराव डुबल, राजेंद्र डुबल, आशुतोष डुबल, माजी नगरसेवक सुहास जगताप, घनश्याम पेंढारकर, मुकुंद चारेगावकर, अभिषेक भोसले, किरण मुळे, नगरपालिकेचे सहाय्यक अभियंता ए. आर. पवार, वृक्ष अधिकारी मुझफ्फर नदाफ यांच्यासह हास्य क्लब, स्विमिंग क्लबचे सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्यानातील खेळण्यांसाठी लवकरच निधीची तरतूद!

प्रीतिसंगम बागेतील खेळण्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे लहान मुलांना खेळण्यासाठी कोणतीही साधने उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे याठिकाणी खेळण्यांची चांगली व्यवस्था करण्याची मागणी माजी नगरसेवक सुहास जगताप यांनी डॉ. अतुल भोसले यांच्याकडे केली. यावेळी डॉ. भोसले यांनी प्रीतिसंगम उद्यानात लहान मुलांसाठी खेळणी मिळवून देण्यासाठी लवकरच निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. 


ब्राम्हणांना संपवण्याची भाषा करणाऱ्याला अटक करा ; कराडात विविध ब्राम्हण संघटनांच्या वतीने डीवायएसपी ना निवेदन ;


वेध माझा ऑनलाईन।
ब्राह्मणांना संपवण्याची भाषा करणाऱ्या व्यक्तीला तात्काळ अटक करून त्याच्यावर कारवाई करा अशी मागणी कराडमधील विविध ब्राम्हण संघटनांच्या वतीने आज निवेदनाद्वारे करण्यात आली कराडचे डीवायएसपी अमोल ठाकूर याना या मागणीबाबतचे निवेदन देण्यात आले

निवेदनात म्हटले आहे की गावरान विश्लेषक या चॅनेलवर मराठा आरक्षणाबाबत काही व्यक्तींनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्यामध्ये एका व्यक्तीने ब्राम्हण समाजाला तीन मिनिटात संपवू असे विधान केले या व्यक्तीच्या विधानामुळे ब्राम्हण समाजात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करून ब्राह्मण समाजाच्या कत्तली करण्याचे षडयंत्र यातून रचले जात आहे यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो मराठा आरक्षणाला ब्राम्हण समाजाने नेहमीच पाठिंबा दर्शवला आहे कधीही विरोध केलेला नाही असे असताना ब्राम्हण समाजाची नाहक बदनामी करण्याचे विनाकारण षडयंत्र सुरू आहे दरम्यान ब्राम्हणांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलेल्या  या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक करा व त्याच्यावर कारवाई करा अशी मागणी यावेळी करण्यात आली जय परशूराम, जय श्रीराम अशी घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली

यावेळी समस्त ब्राम्हण समाज सामाजिक संस्था,चित्पावन ब्राम्हण संघ, बहुभाषिक ब्राह्मण संघ विद्यानगर, वेदशास्त्र विद्या संवर्धन मंडळ , ऋग्वेद स्वाहाकार समिती, आणि ब्राम्हण बहुद्देशीय चॅरिटेबल फाउंडेशन या संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच ब्राम्हण महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

Wednesday, February 28, 2024

ब्राम्हणांना संपवण्याची भाषा करणारा पोलिसांच्या ताब्यात ; त्याचा पत्ता बारामतीचा; त्याच्या मागे कोण? चौकशीची मागणी ; तालिका अध्यक्षांचे चौकशीचे आदेश ;

वेध माझा ऑनलाईन। विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर सभागृहात पाँईट ऑफ इन्फॉर्मेशनच्या अंतर्गत भाजपा आमदार राम कदम यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. महाराष्ट्रात जातीवाद कसा पसरेल याचं मोठं षडयंत्र व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलंय. देवेंद्र फडणवीसांना या मातीत गाडणार असं त्यातला इसम बोलतो, देवेंद्र फडणवीसांसारखं महाराष्ट्रातले ब्राह्मण ३ मिनिटांत संपवून टाकू असं बोलतो. याबाबत सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. यात ज्याला पकडण्यात आले. त्याला सोडवण्यासाठी रोहित पवारांनी पोलिसांना फोन केला. रोहित पवार आणि या व्यक्तीचा काय संबंध असा सवाल कदम यांनी विचारला. 
दरम्यान, एक समाज ३ मिनिटांत आम्ही संपवू, देवेंद्र फडणवीस तुला संपवू असं व्हिडिओत आहे. युवासेनेच्या पदाधिकाऱ्याने तक्रार केली. त्यात योगेश सावंत सापडला. त्याने तो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पदाधिकारी आहे असं मान्य केले. रोहित पवार यांनी स्वत: वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फोन केला. त्यांचा संबंध काय? मराठा समाज शांततेत आंदोलन करतो. जरांगे पाटलांच्या आंदोलनावेळी आम्ही सुरुवातीपासून त्यांच्या बाजूने भूमिका घेतली. परंतु जेव्हा त्यांच्या आंदोलनातून राजकीय वास यायला लागला तेव्हा आता सर्व गोष्टी बाहेर यायला लागल्या. योगेश सावंतचा पत्ताही बारामतीतला आहे. रोहित पवार यांचा योगेश सावंतशी संबंध काय ? योगेश सावंत याच्यामागे कोण कोण आहे याची चौकशी झाली पाहिजे असं आमदार आशिष शेलार यांनी सांगितले. त्यावर या प्रकरणाची सखोल चौकशी करावी असे आदेश तालिका अध्यक्षांनी दिले.


विधानसभेत आमदार राम कदम म्हणाले की, महाराष्ट्र मराठ्यांचा आहे आणि मराठेच राज्य करणार असं तो बोलतो. देवेंद्र फडणवीसांबद्दल कोण असं बोलणार असेल तर ते सहन करणार नाही. योगेश सावंत असं या माणसाचे नाव आहे. त्याचे संबंध बारामतीशी असून या माणसाला सोडण्यासाठी रोहित पवार यांनी पोलिसांना फोन केला. रोहित पवारांचा योगेश सावंतशी काय संबंध? मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे पण मराठ्यांच्या आडून राज्यात जातीतेढ निर्माण करण्याचं काम रोहित पवार आणि त्यांचे बगलबच्चे करत असतील तर ते मराठा समाजाला बदनाम करतायेत. मराठा समाजाला एकही मोर्चा चुकीच्या मार्गाने गेला नाही. शांततेत निघाला. पण बीडमध्ये जाळपोळ, दगडफेक केली असं त्यांनी म्हटलं. 
तर कुठल्याही नेते, समाजाविरोधात असं विधान करणे कुणीही मान्य करणार नाही. मात्र सभागृहात शरद पवारांचे नाव घेतलं गेले, कुणाचेही नाव घेण्याआधी नोटीस द्यावी लागते. पाँईट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून कुणाचेही नाव घेण्याचा अधिकार नाही. जर नाव घेतले असले तर कामकाजातून काढून टाकावे अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. 


डॉ. अतुल भोसले यांच्याकडून विकासकामाचा धडाका सुरूच ; येरवळे येथे १० लाखांच्या विकासकामाचे भूमिपूजन ;

वेध माझा ऑनलाईन। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रुपाने देशाला बळकटी मिळवून देणारे गौरवशाली नेतृत्व लाभले आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांनी केले. येरवळे (ता. कराड) येथे विकासकामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.

डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून येरवळे गावातील रस्ते सुधारणा कामासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या २५-१५ ग्रामविकास योजनेतून १० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून होणाऱ्या विकासकामाचे भूमिपूजन डॉ. भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी बोलताना ते म्हणाले, देशाला नरेंद्र मोदींच्या रुपाने दूरदृष्टी असलेले नेतृत्व लाभले आहे. मोदींनी देशात सामाजिक सलोखा टिकविण्याचे काम करत, विकासाला गतिमान केले. सरकारच्या अनेक योजनांचा सामान्य नागरिकांना होत असून, सर्वसामान्य जनतेची उन्नती साधण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून कराड दक्षिणसाठी भरघोस निधी प्राप्त होत असून, भविष्यातही जास्तीत जास्त निधी मिळविण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. 

याप्रसंगी य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सयाजी यादव, माजी पं. स. सदस्या सौ. नंदाताई यादव, सरपंच रुपाली यादव, माजी सरपंच गीतांजली यादव, सेवा सोसायटीचे संचालक बाबासो यादव, वसंत यादव, रामभाऊ लोकरे, काजल चव्हाण, कविता यादव, सुवर्णा यादव, सुनील यादव, डॉ. आनंदराव लोकरे, कैलास यादव, भरत यादव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


Tuesday, February 27, 2024

शरद पवार, रोहित पवार यांच्याकडून जरांगे पाटील यांना मदत ; संगीता वानखेडे यांचे आरोप ; राष्ट्रवादीच्या राजेश टोपे यांच्या कारखान्यात ठरले आंदोलनाचे प्लॅनिंग ; प्रवीण दरेकर यांचा खळबळजनक गौप्यस्फोट ;

वेध माझा ऑनलाईन। मराठा आरक्षणाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. सागर बंगल्यावर येत आहे, मला  मारण्यासाठी फडणवीसांनी षडयंत्र रचल्याचा आरोप त्यांनी केला. मराठा आंदोलनामध्ये फूट पडलेली दिसली, अजय महाराज बारसकर आणि संगीता वानखेडे यांनी जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अशातच संगीता वानखेडे यांनी जरांगे यांची SIT चौकशीची मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि आमदार रोहित पवार यांचं नाव घेत खळबजनक वक्तव्य केलं आहे.
दरम्यान, विधीमंडळाच्या अर्धसंकल्पीय अधिवेशनात आमदार प्रविण दरेकर यांनी जरांगे यांच्या आंदोलनामागे शरद पवार यांचा हात असल्याचा आरोप केला. त्यानंतर राजेश टोपे यांच्या कारखान्यामध्ये आंदोलनाचं षडयंत्र रचलं गेल्याचंही दरेकर यांनी म्हटलं आहे.

मी SIT चौकशी करा हीच मागणी करत होते. अनेक राजकीय नेत्याचा जरांगे पाटील यांना सपोर्ट आहे. जरांगे पाटलाची चौकशी झाल्यावर सगळं दूध कमी पाणी का पाणी होईल. शरद पवार आणि त्यांचे नातू रोहित पवार यांच्याकडून जरांगे यांना मदत मिळत आहे. सगळ्यांना ताब्यात घेऊन चौकशी करा म्हणत जरांगेचं आंदोलन स्क्रिप्टेड आहे, गरज पडल्यास माझे देखील चौकशी करा, असं संगीता वानखेडे यांनी म्हटलं आहे.

मराठा समाजाची दिशाभूल जरांगे यांनी केली असन आरक्षणात फसवणूक केली आहे. जाणून बुजून माझी बदनामी केली जाते, सगेसोयरे मान्य होणार नाही आम्हाला तसं आरक्षण नको. येत्या निवडणूकित जरांगे याला त्याची माणसे निवडून आणायची आहेत. गावागावातून पैसे गोळा होत आहेत. गाड्या कुठून आल्या याची चौकशी करा. आमच्या समाजाच वाटोळं केलं असून आमच्या मुलांवर गुन्हे दाखल होत असल्याचं वानखेडे म्हणाल्या.

ते सामान्य कार्यकर्ते होते तोवर ठीक होतं, आता नाही. आपल्या लिमीटच्या बाहेर गेलं तर आपण कार्यक्रम करुन टाकतो,' मुख्यमंत्री शिंदे कोणाबद्दल म्हणाले?'

वेध माझा ऑनलाईन
राज्यात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन वातावरण तापलेलं असतानाच  विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. आज विधानपरिषदेचे कामकाज सकाळी 11 वाजता सुरु झाले तर विधानसभेचे कामकाज दुपारी 12 वाजता सुरू झालं.  आज 27 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प मांडणार आहेत. सभागृहाच्या कामकाजामध्ये पुरवण्या मागण्या मांडण्यात आल्या आहेत. दरम्यान आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंदरम्यानच्या दरम्यान एक संवाद झाला त्याची सध्या जोरदार चर्चा आहे

नाना पटोले आणि मुख्यमंत्र्यांची प्रवेशद्वाराजवळ भेट झाली. दोन्ही नेते एकमेकांशी हस्तांदोलन करताना व्हिडीओत दिसत आहेत. मुख्यमंत्री शिंदे एका हाताने चष्मा सरळ करत असताना...
 नाना पटोले, 'हे काय चाललंय? तुम्हीच त्यांना मोठं केलंय,' असं म्हणत शिंदेंना प्रश्न विचारतात. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अगदी हातवारे करुन उत्तर देताना दिसत आहेत.

हातवारे करत मुख्यमंत्र्यांचं उत्तर...म्हणाले...
नाना पटोलेंच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे, 'ते सामान्य कार्यकर्ते होते तोवर ठीक होतं आता नाही. आपल्या लिमीटच्या बाहेर गेलं तर आपण कार्यक्रम करुन टाकतो,' असं अगदी हातवारे करुन सांगतात. 

मात्र या दोघांमधील हा संवाद नेमका कोणाबद्दल आहे हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. तरी पत्रकारांच्या गराड्यात अडकण्याआधी विधानसभेच्या प्रवेशद्वाराजवळ दोन्ही नेत्यांमध्ये झालेला हा संवाद व्हिडीओमध्ये अगदी स्पष्टपणे ऐकू येत आहे. यानंतरही नाना पटोले आणि मुख्यमंत्री शिंदे एकमेकांशी हसून काहीतरी बोलतात. मात्र व्हिडीओमध्ये त्यांच्या संवादामधील शेवटची काही वाक्य स्पष्टपणे ऐकू येत नाहीत. तरी या दोघांमधील ही चर्चा नेमकी कोणाबद्दल होती याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Monday, February 26, 2024

मनोज जरांगे यांच्या अडचणी वाढणार ; जरांगेची एसआयटी चौकशी होणार ; त्यांच्या मागे कोण? हे तपासले जाणार ;

वेध माझा ऑनलाईन। आज विधिमंडळात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यानंतर मराठा आरक्षणावरून सभागृहात गोंधळ पाहायला मिळाला. यावेळी मनोज जरांगे पाटलांच्या विधानांमागे नेमका कोणाचा हात आहे? हे तपासण्यासाठी एसआयटी चौकशी करा, अशी मागणी विधानसभेत आमदार आशिष शेलार यांनी केली. त्यांनी केलेल्या या मागणीनंतरच जरांगे पाटलांच्या आंदोलनाची SIT चौकशी व्हावी, असे आदेश विधानसभा अध्यक्षांनी दिले आहेत. त्यामुळे मनोज पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली 
आहे

विधिमंडळात बोलताना आशिष शेलार म्हणाले की, “काल मी मनोज जरांगे-पाटील यांचा व्हिडिओ बघितला. यामध्ये महाराष्ट्र बेचिराख करण्याची भाषा जरांगे पाटील यांनी केली आहे. त्यांच्यामागे कटकारस्थानाची भाषा आहे. जरांगेंची भाषा त्यांना शोभत नाही. राज्यात पंतप्रधानांविरोधात कटकारस्थान सुरू आहे. तसेच आमच्या जीवाला देखील धोका आहे, त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हावी” त्यांनी केलेला या मागणीनंतरच विधानसभा अध्यक्ष यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.


जरांगे पाटील यांची सगळी वक्तव्य तपासली जातील, पोलीस आपलं काम करतील...शंभूराज देसाई यांनी दिला इशारा ; आणखी काय म्हणाले?

वेध माझा ऑनलाईन।
 सुरुवातीला जरांगे यांनी मराठवाड्यातील नऊ जिल्ह्यातील पूर्वजांच्या कुणबी नोंदी प्रमाणे प्रमाणपत्राची मागणी केली, सरकारने ती मागणी पूर्ण केली. परत त्यांनी हे सर्व महाराष्ट्रात लागू करा असे म्हणाले. तीही मागणी पूर्ण केली. मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी जस्टीस शिंदे समिती नेमली. समितीने अहवाल दिला. एक लाख कर्मचारी नेमून मागासवर्गीय आयोगाकडून सर्वेक्षण पूर्ण करुन मराठी समाज आर्थिक मागास असल्याचा डाटा जमवला आणि कोर्टात टीकणारे कॉंक्रीट आरक्षण दिल्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले. परंतू त्यांनी सतत भूमिका बदलली. काल त्यांनी कहर करीत फडणवीसांना अरेतुरेची भाषा केली. त्यामुळे मराठा समाज नाराज झाला आहे. काल ते म्हटले मी सागर बंगल्याकडे चाललो, नंतर पुन्हा माघारी परतले. सरकारने आता कठोर निर्णय घेतला. त्यांची सगळी वक्तव्ये तपासली जातील कायदा आणि पोलिस आपले काम करेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. जे द्यायचे होते ते दिले आहे आणि काही मागण्या असतील त्यावरही विचार केला जाईल असे शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे.

जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण ; संजय राऊत यांचा सवाल ;

वेध माझा ऑनलाईन।
मनोज जरांगे पाटील यांच्या मागचा बोलवता धनी कोण आहे ? हे जर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहीती नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. हे सर्व घडविणारे कोण आहेत ? ते राज्य सरकारचा हिस्सा आहेत का ? त्यांना अस्थिरता निर्माण करुन काही वेगळे राजकारण करायचे आहे का? याची देवेंद्रना माहीती नसेल तर मग गृहमंत्री पद तुमच्याकडे गोट्या खेळायला आहे का ? अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. जरांगेबाबत काही माहीती हवी आहे तर जरांगे यांचे फोन टॅप केले असतीलच त्याबाबती डीजी रश्मी शुक्ला अनुभवी आहेत असाही टोला त्यांनी लगावला आहे. जरांगे हे साधे कार्यकर्ते आहेत. गावाकडील नेते आहेत. त्यांच्या भाषेकडे दुर्लक्ष करा. त्यांच्या भावना समजून घ्या असेही संजय राऊत म्हणाले. या राज्यात भाषेची संस्कृती आणि संस्कार जर कोणी बिघडवला असेल तर तो फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या एका टोळीने बिघडवला आहे असाही आरोप त्यांनी केला.

उद्या अजित पवार 2024-25 चा अंतरिम अर्थसंकल्प करणार सादर ; कोणत्या घोषणांवर भर देऊ शकतात ? वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाईन
आजपासून राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. आजच्या या अधिवेशनात 2023-24 च्या पुरवणी मागण्या मांडल्या जातील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता अर्थमंत्री अजित पवार 2024-25 चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी राज्य सरकार अर्थसंकल्प सादर करत असल्यामुळे या अंतरिम अर्थसंकल्पात कोणत्या घोषणांवर जास्त भर दिला जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 या अर्थसंकल्पात रोजगार, कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते, शेतकऱ्यांच्या कर्जाचे हप्ते, बँकांचे व्याजदर अशा गोष्टींवर सरकार जास्त भर देईल असे म्हटले जात आहे. तसेच, निवासी डॉक्टरांच्या अनुदानात वाढ, शेतकऱ्यांना वेगवेगळ्या सवलती, आशा वर्कर्सला आर्थिक मदत, मराठा समाजासाठी घोषणा सरकार करेल असा अंदाज वर्तवला जात आहे. त्याचबरोबर, पायाभूत सुविधा क्षेत्र, ग्रामीण भागातील रस्ते, राज्यातील नागरिकांसाठी विविध योजनांचा समावेश देखील या अर्थसंकल्पात असेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक ते शेतकऱ्यांपर्यंत सर्वांच्याचे लक्ष या अर्थसंकल्पाकडे लागले आहे.
दरम्यान आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी शिंदे फडणवीस पवार सरकार अर्थसंकल्प सादर करत आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या हिताचा सरकार जास्त विचार करेल, असे म्हटले जात आहे. पाहूया काय होते ते...

Sunday, February 25, 2024

रामोशी बेरड समाजाच्या विविध मागण्यांसाठी कराडात बैठक ; वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी केले मार्गदर्शन ;

वेध माझा ऑनलाईन। रामोशी बेरड समाजाच्या विविध मागण्या आणि न्याय हक्कासाठी रामोशी समाजाचे एकत्रीकरण गरजेचे आहे या उद्देशाने बेरड रामोशी समाज राष्ट्रीय संघ या समितीची बैठक कराड येथे शासकीय विश्रामगृह येथे नुकतीच पार पडली.यावेळी समितीच्या माध्यमातून रामोशी समाजाच्या विविध मागण्या आणि विविध अडचणी याबाबत वरिष्ठ पदाधिकारी यांनी चर्चा करून मार्गदर्शन केले. 

या बैठकीस अध्यक्ष रामदास आबा धनवटे उपाध्यक्ष संजय चव्हाण , मार्गदर्शक अप्पासाहेब चव्हाण ,सर्व समिती तसेच कराड पाटण तालुक्यातील रामोशी समाजाचे कार्यकर्ते, रामोशी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कराड बैठकीचे नियोजन शंभु मदने यांनी केले , सत्कार बहिरजी नाईक वंशज आबा जाधव यांनी केले , आभार प्रशांत चव्हाण यांनी मानले . सामाजिक कार्यकर्ते सागर मंडले , शिरतोडे सर , अनिल मदने वगैरे उपस्थित होते

छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या विकास आराखड्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना सादरीकरण ; डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केली भरघोस निधी देण्याची मागणी ;

वेध माझा आँनलाईन । कराडकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या विकास आराखड्याचे सादरीकरण सातारा येथे राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर करण्यात आले. शिवाजी स्टेडियमच्या अत्याधुनिकीकरणासाठी प्रयत्नशील असलेले भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले यांनी या आराखड्याचे सादरीकरण करत, राज्य शासनाकडून यासाठी भरघोस निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणी ना. फडणवीस यांच्याकडे केली. यावेळी खा. उदयनराजे भोसले उपस्थित होते.

ना. फडणवीस हे विविध विकासकामांच्या उदघाटनासाठी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. सातारा येथे ना. फडणवीस यांचे आगमन होताच, डॉ. अतुलबाबा भोसले यांनी स्वतः गाडीचे सारथ्य करत त्यांना खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर या निवासस्थानी नेले. तिथे ना. फडणवीस यांनी खा. भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस गेल्या महिन्यात कराड येथे आले असता; डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या मागणीला प्रतिसाद देत, त्यांनी कराडमधील क्रीडाप्रेमींसाठी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम सर्वसोयींनीयुक्त व अत्याधुनिक स्वरुपात उभारण्याची घोषणा केली होती. तसेच याबाबतचा विकास आराखडा सादर करण्याची सूचना केली होती. 

त्यानुसार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी तातडीने पावले उचलत स्टेडियमच्या विकास आराखड्याची आखणी सुरू केली. नुकतीच त्यांनी कराड नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत छ. शिवाजी स्टेडियमची पाहणी करुन, खेळाडू व क्रीडाप्रेमींशी चर्चा केली. तसेच त्यांच्या सूचना व अपेक्षा जाणून घेतल्या. या सूचनांचा अंतर्भाव असलेला स्टेडियमचा विकास आराखडा डॉ. भोसले यांनी सुप्रसिद्ध आर्किटेक्चर नितीश बेरी यांच्याकडून करून घेतला आहे. 


या विकास आराखड्याचे सादरीकरण डॉ. अतुलबाबा भोसले यांनी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर केले. सर्व प्रकारच्या खेळांसाठी उपयुक्त सोयीसुविधा, तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांचा अंतर्भाव या विकास आराखड्यात करण्यात आला आहे. यासाठी भरघोस  विकास निधी देण्याची मागणीही डॉ. भोसले यांनी यावेळी उपमुख्यमंत्र्यांकडे केली. ना. फडणवीस यांनी याबाबत सकारात्मकता दर्शवित लवकरच याबाबत कार्यवाही करण्याची ग्वाही दिली. 

याप्रसंगी नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी शंकर खंदारे, आर्किटेक्चर नितीश बेरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

Friday, February 23, 2024

जयंत पाटील एकटे जाणार की "सगेसोयरेना" घेऊन जाणार ? आ. प्राजक्त तनपूरे यांचा सवाल ; काय आहे बातमी ;

वेध माझा ऑनलाईन। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपमध्ये जाणार अशा चर्चा सुरू आहेत, या पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना जयंत पाटील यांचे भाचे आणि राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे म्हणाले की, नेमकी चर्चा काय सुरू आहे? जयंत पाटील एकटे जाणार की "सगेसोयरे" यांना घेऊन जाणार असा प्रति प्रश्न पत्रकारांना केला आहे. जयंत पाटील यांनी या चर्चांचे खंडन केलं आहे असं देखील ते म्हणाले. आम्ही शरद पवार यांच्या सोबतच आहोत आणि भविष्यात देखील राहणार आहोत, असं प्राजक्त तनपुरे यांनी म्हटलं आहे. भाजप म्हणत की येऊ घातलेल्या निवडणुकीत आम्ही सर्वाधिक जागा जिंकू तर त्यांचे मूळ भाजपचे किती लोक आहेत हे त्यांनी सांगावं. आमच्याकडून त्यांच्याकडे गेलेले किती लोक आहेत, हेही सांगावं असा टोला प्राजक्त तनपुरे यांनी लगावला आहे.

निवडणुकीवर काय म्हणाले ?
नगरपालिका ,महानगरपालिका, जिल्हा परिषद,  यांचे मागच्या दोन वर्षापासून इलेक्शन झालेले नाहीत. या सर्व संस्था प्रशासक चालवत आहेत, जनतेतून आलेले प्रतिनिधी तिथे नाहीत. तर दुसरीकडे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मी एक चर्चा ऐकली आहे की राज्यातील सहकार विभाग असा एक कायदा आणू पाहतय की, या संस्थांमधील संचालक मंडळ बरखास्त करून या सर्व संस्था अधिकाऱ्यांमार्फत चालवल्या जाणार आहेत तसं एक विधेयक येणार असल्याची चर्चा सुरू आहे असं आमदार प्राजक्त तनपुरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे भविष्यात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होतील की नाही अशी शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याला येत आहे अस देखील तनपुरे यांनी म्हटल आहे.

अजितदादांनीच कुटुंबाला एकटे पाडले ; रोहित पवारांचा अजितदादांवर मोठा आरोप ;

वेध माझा ऑनलाईन। शरद पवार साहेबांनी अजित दादांवर मुलासारखं प्रेम केलं. त्यांच्यावर अन्याय झाला असा आम्हाला कोणालाही वाटत नाही, पण त्यांनीच कुटुंबाला एकटं पाडलं आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे तरूण नेते रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर मोठा आरोप केला आहे. अहमदनगरमध्ये बोलताना त्यांना अजित पवार यांना खडेबोल सुनावले. काही दिवसांपूर्वी बारामतीमधील मेळाव्यात बोलताना अजित पवारांनी तेथील जनतेला भावनिक आवाहन केले. बारामतीमध्ये एकटं पाडलं जातंय असं विधान त्यांनी केलं होतं. त्याच विधानाचा समाचार घेताना रोहित पवार यांनी अजित पवार यांना चोख प्रत्युत्तर दिलं.

योगेंद्र पवार यांनी जी भूमिका घेतली ती शरद पवार साहेबांच्या बाजूची घेतली. कारण आम्हा सर्वांना माहिती आहे दादावर साहेबांनी मुलासारखं प्रेम केलं. जी जी मोठी संधी समोर आली ती कुटुंबातील इतर कोणालाही मिळाली नाही, तर दादांना मिळाली. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला असा आम्हाला कोणालाही वाटत नाही. उलट अजित पवार यांनीच कुटुंबाला एकटं पाडलं, असा आरोप रोहित पवार यांनी केला. आणि ते त्यांच्यासोबत (भाजप) गेले. अजित पवारांनी कुटुंबाला एकट पाडून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला, तो कुटुंबाला आवडला नाही. जय आणि योगेंद्र पवार देखील बोलले की दादांना एकटं पाडलं नाही. मग आता दादा असं का म्हणत आहेत की त्यांना एकटं पाडलं ? अशा शब्दात रोहित पवारांनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडलं.

Thursday, February 22, 2024

भारतीय जनता पार्टीच्या कराड शहर उपाध्यक्षपदी शैलेंद्र गोंदकर यांची निवड ; डॉ अतुलबाबांच्या हस्ते झाला सत्कार ;

वेध माझा ऑनलाईन। भारतीय जनता पार्टीच्या कराड शहर उपाध्यक्षपदी श्री शैलेंद्र शरद गोंदकर यांची सर्वानुमते नुकतीच निवड करण्यात आली अध्यक्ष एकनाथ बागडी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये ही निवड करण्यात आली निवडीनंतर भाजपचे नेते अतुल भोसले यांच्या हस्ते श्री गोंदकर यांचा सत्कार करण्यात आला

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, सागर शिवदास  सुनील शिंदे बापु धनजी माने काका,माजी नगरसेवक मा सुहास जगताप माजी नगरसेवक श्री.घनश्याम पेंढारकर,सरचिटणीस श्री विश्वनाथ फुटाणे,सरचिटणीस प्रशांत कुलकर्णी श्री नितीन वास्के,श्री रमेश मोहिते,श्री विवेक भोसले, मा सुहास चक्के आदी पदाधिकारी उपस्थित होते...

शिवसेना नेते मनोहर जोशी यांचे निधन ;

वेध माझा ऑनलाइन
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी लोकसभा सभापती मनोहर जोशी यांचं आज पहाटे मुंबईत निधन झालं. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

राजकारणातील शालीन व्यक्तीमत्व म्हणून सुपरिचित असलेले गुरुजी तथा माजी लोकसभा सभापती मनोहर जोशी यांचं निधन झालं. हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज पहाटे 03.02 वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनोहर जोशी यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या राजकारणाची अपरिमित हानी झाली आहे.
 लोकसभा माजी सभापती तथा शिवसेना भाजपा युतीचे पहिले माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना बुधवारी अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. हृदयविकाराचा झटका आल्याचं निदान हिंदुजा रुग्णालयातील डॉक्टरांनी केलं होतं. त्यामुळं त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यातच गुरुवारी पहाटे 03.02 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Tuesday, February 20, 2024

अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे सुपुत्र युगेंद्र पवार हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत ; अजितदादांना धक्का ;

वेध माझाऑनलाईन। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांच्याशी फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडल्यानंतर आता अजित पवारांनाही त्यांच्या सख्ख्या पुतण्याने जोरदार धक्का दिला आहे. अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे सुपुत्र युगेंद्र पवार हे शरद पवारांच्या गटात सामील झाले आहेत. तसेच बारामती लोकसभेसाठी ते सुप्रिया सुळेंचा प्रचार सुद्धा करतील. त्यामुळे शरद पवारांनी अजितदादांविरोधात खेळलेली ही मोठी खेळी म्हणावी लागेल.

महत्वाचे म्हणजे मागील आठवड्यात बारामती येथील जाहीर भाषणात अजित पवारांनी म्हंटल होत कि फक्त माझा परिवारच माझ्यासोबत आहे. बाकी संपूर्ण कुटुंब आज माझ्या विरोधात उभं आहे, त्यामुळे बारामतीकरांनो तुम्हीच मला साथ द्या…. अजितदादांचे ते विधान आता खरं ठरताना दिसत आहे. कारण श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार हे बारामतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या शहर कार्यालयाला आज सकाळी साडे दहा वाजता भेट देणार आहेत. शरद पवारांचे हात बळकट करण्यासाठी शहर कार्यालयाला उपस्थित राहण्याचे आवाहन युगेंद्र पवार यांनी केली आहे. युगेंद्र पवार हे शरद पवारांच्या ताफ्यात सामील झाल्याने अजित पवारांना हा मोठा धक्का मानला जातोय. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडताना स्वतःच्या कुटुंबीयांना सुद्धा विश्वासात न घेतल्याचे यामुळे स्पष्ट होत आहे.

कोण आहेत युगेंद्र पवार – 
युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे सुपुत्र आहेत. ते सक्रीय राजकारणात नाहीत, युगेंद्र पवार हे विद्या प्रतिष्ठान संस्थेचे खजिनदार असून बारामती तालुका कुस्तीगीर संघाचेही ते काम पाहतात. व्यावसायिक जबाबदा-या ते सांभाळतात. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दीड महिन्यांपूर्वी कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष युगेंद्र पवार यांनी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केलं होतं. त्यामुळे युगेंद्र पवार हे पहिल्यापासूनच शरद पवार यांच्यासोबत राहिल्याचे दिसून येते. आता तर युगेंद्र पवार थेट राजकरणात उतरण्याची शक्यता असून बारामतीत सुप्रिया सुळेंचा प्रचारही करतील.

सांगलीत आज्जीचा नातवाने केला खून ; आरोपीच्या आईने केली मदत ; प्रॉपर्टीचा वाद ;

वेध माझा ऑनलाईन। 
प्रॉपर्टीच्या वादातून सांगलीमध्ये एका आजीचा नातवांनी खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धक्कादायक, म्हणजे या हत्येमध्ये आरोपींच्या आईचाही समावेश आहे. तिघांनी मिळून 80 वर्षीय आजीचा टॉवेलनं गळा आवळून खून केला. खानापूर तालुक्यातील ही घटना घडली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली आहे. पोलिसांनी या तिघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. 

प्रॉपर्टीच्या वादातून नातवांनी स्वत:च्या आजीचा टॉवेलने गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना खानापूर तालुक्यातील  पारे  येथे घडली. सखुबाई संभाजी निकम (वय 80) असे मृत झालेल्या आजीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीसांनी आजीच्या एका अल्पवयीन नातवासह दुसरा नातू आणि सूनेलाही बेड्या ठोकल्या आहेत.  आशिष सतीश निकम आणि रेणुका सतीश निकम अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत.
चिंचणी येथील सतीशशेठ निकम यांचा सोने-चांदी गलाई व्यवसाय आहे. त्यांची विटा, चिंचणी (मं.) यासह विविध ठिकाणी प्रॉपर्टी आहे. यातील अर्धा हिस्सा सतीश यांचे जावई कुणाल पाटील यांच्या नावावर करण्यासाठी त्यांची पारे येथील बहीण संगिता रामचंद्र साळुंखे यांनी भाऊ सतीश यांना सांगितले होते. त्याचा राग संशयित नातू आशिष, त्याचा अल्पवयीन भाऊ व सून सौ. रेणुका यांना होता.

रागातून आजीला संपवलं - 
राग मनात धरून संशयित तिघांनी 19 फेब्रुवारी रोजी संगिता साळुंखे यांच्या पारे गावातील घरी जाऊन त्यांना तू तूझ्या भावाला बोलावून घेऊन 48 तासाच्या आत सदरची प्रॉपर्टी फिरवून दे. नाहीतर तुला व म्हातारीला (सखुबाई) यांना 48 तासानंतर दाखवितो, अशी धमकी देऊन हे तिघेही विट्याला निघून गेले. त्यानंतर मंगळवारी सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास हे तिघेही सतीश यांची बहीण संगिता यांच्या पारे येथील घरी गेले. त्यावेळी सखुबाई या मुलगी संगिताच्या घरी होत्या. या तिघांनी पुन्हा त्याठिकाणी वाद घालण्यास सुरूवात केली. त्यानंतर आजी सखुबाई यांना एका खोलीत नेऊन आतून दरवाजा बंद करून त्यांचा टॉवेलने गळा आवळून खून केला. त्यानंतर हे तिघेही संशयित त्यांच्या विटा येथील घरी आले. याबाबत संगिताकडून पोलिसांत तक्रार दाखल केली. 

पोलिसांची धडक कारवाई - 
या घटनेची माहिती मिळताच उपअधिक्षक विपुल पाटील, पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पंचनामा करून सखुबाई यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी विटा ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला. याप्रकरणी विटा पोलीसांनी मयत सखुबाई यांचा अल्पवयीन नातवासह दुसरा नातू आशिष, सून रेणुका निकम या तिघांना रात्री उशिरा अटक केली. या घटनेची विटा पोलीसांत नोंद झाली असून पोलीस निरीक्षक शरद मेमाणे पुढील तपास करीत आहेत.

शिंदे सरकारचे मराठा आरक्षण विधेयक ही मराठा समाजाची फसवणूकच - पृथ्वीराज चव्हाण

वेध माझा ऑनलाईन। मराठा आरक्षणाबाबत सर्वांची एकवाक्यता असताना सुद्धा शिंदे सरकारने चर्चा होऊ दिली नाही. तसेच विरोधकांच्या एकाही प्रश्नाला सरकारने उत्तर दिले नाही. जरांगे पाटील यांची सगे-सोयरे अधिसूचनेबद्दल कोणतीही स्पष्ट भूमिका सरकारने घेतली का? तसेच जरांगे पाटील यांना सरकारने जी गुप्त आश्वासने दिली आहेत ती सरकारने पूर्ण केली आहेत का? त्याचे काय ? यामुळे मराठा समाजाला आरक्षण देताना सरकारने एकप्रकारे फसवणूक केली असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

        या आधी गायकवाड समितीने वर्षभर अभ्यास करून सादर केलेला अहवाल सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला होता. तर आता पंधरा दिवसात तयार केलेला शुक्रे कमिटीचा अहवाल सुप्रीम कोर्ट कसा मान्य करेल याबाबत आम्हाला शंका वाटते. सरकार नक्की कोणते प्रयत्न करणार आहेत याची माहिती त्यांनी देणे आवश्यक आहे. तसेच मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा असताना विरोधकांना विश्वासात घ्यायला सरकार का घाबरत आहे ? असेही पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले.

तसेच ते पुढे म्हणाले की, आमच्या सरकारचा 2014 चा कायदा त्यानंतरचा 2018 चा कायदा आणि आजचा कायदा हा एकच आहे. फक्त आरक्षणाची टक्केवारी वेगळी आहे. तरीसुद्धा या कायद्यांना कोर्टात आव्हान दिले गेले, त्यामुळे सुप्रीम कोर्टाने 2018 चा कायदा फेटाळताना जी निरीक्षण नोंदविली होती त्याचे सरकारने कसे समाधान केले आहे ? जेव्हा हा कायदा पुन्हा सर्वोच्च न्यायालयमध्ये जाईल त्यावेळी सर्वोच्च न्यायालय आपला निकाल बदलेल का?

गायकवाड आयोग वर्षभर माहिती गोळा करत होता आता तुम्ही पंधरा दिवसात माहिती गोळा केली आहे. त्यामुळे आम्हाला भीती आहे की लोकसभा- विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी हे गाजर दाखवायचं काम सरकारने केलेल आहे, पुढे काय होईल ते होईल. सरकारने मराठा समाजाची फसवणूक करून वेळ मारून नेलेली आहे. ओबीसींना सुद्धा सरकारने सांगितले आहे की तुमच्या आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही. पण सरकारने मराठा समाजातील किती जणांना ओबीसी संवर्गातील कुणबी दाखले दिले हा आकडा सुद्धा सरकार देत नाही. कुणबी दाखल्यामुळे ओबीसींच्या हक्कांवर गदा कशी येणार नाही हे सरकार कोणत्या आधारे म्हणत आहे ? तसेच सगेसोयरे अधिसूचनेचे काय झाले ? सरकारने एकाही प्रश्नाचे उत्तर न देता विधिमंडळात चर्चा टाळली.

कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या अत्याधुनिकीकरणासाठी डॉ. अतुल भोसलेंनी घेतला पुढाकार ; सर्व क्रीडाप्रेमींची संयुक्त बैठक घेणार; स्टेडियमची केली पाहणी...

वेध माझा ऑनलाईन ।  भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या मागणीची दखल घेत; राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी कराडमधील क्रीडाप्रेमींसाठी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम सर्वसोयींनीयुक्त व अत्याधुनिक स्वरुपात उभारण्याची घोषणा गेल्या महिन्यात केली होती. त्यानुसार स्टेडियमचा सुधारणा आराखडा तयार करण्यासाठी डॉ. अतुलबाबा भोसले पुढे सरसावले आहेत. त्यांनी आज कराड नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत छ. शिवाजी स्टेडियमची पाहणी करुन, खेळाडू व क्रीडाप्रेमींशी चर्चा केली. तसेच स्टेडियमच्या सुधारित आराखड्यासाठी लवकरच कराडमधील सर्व क्रीडाप्रेमींची व्यापक संयुक्त बैठक घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर जानेवारी महिन्यात कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस प्रमुख उपस्थित होते. या सोहळ्यात डॉ. अतुलबाबा भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या विकासासाठी राज्य शासनाने विशेष लक्ष देण्याची मागणी ना. फडणवीस यांच्याकडे केली. त्यावेळी ना. फडणवीस यांनी आपल्या भाषणात डॉ. भोसले यांच्या मागणीची दखल घेत, या स्टेडियमचा लवकरच आराखडा तयार करुन, कराडकरांसाठी सुसज्ज व सर्वसोयींनीयुक्त असे अत्याधुनिक स्टेडियम उभारण्यासाठी राज्य सरकार विशेष प्रयत्न करेल, अशी ग्वाही दिली होती.

त्यानुसार भाजपाचे नेते डॉ. अतुलबाबा भोसले यांनी तातडीने स्टेडियमच्या अत्याधुनिकीकरणाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून त्यांनी आज स्टेडियमला भेट देऊन येथील खेळाडू व क्रीडाप्रेमींशी चर्चा केली. यावेळी उपस्थित क्रीडाप्रेमींनी व क्रीडा प्रशिक्षकांनी स्टेडियम सुधारणेबाबतच्या आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या. 

यावेळी बोलताना डॉ. भोसले म्हणाले, क्रीडाप्रेमींनी अनेक चांगल्या सूचना दिल्या आहेत. लवकरच स्टेडियमच्या सुधारित आराखड्यासाठी कराडमधील सर्व क्रीडाप्रेमींची व्यापक संयुक्त बैठक घेतली जाईल. येणाऱ्या ५० वर्षांत सर्व खेळांसाठी उपयुक्त असे सुसज्ज स्टेडियम उभारण्याचा माझा मानस आहे. राज्य सरकार यासाठी भरघोस निधी देण्याच्या मानसिकतेत असून, यासाठी कराडमधील क्रीडाप्रेमींची एक समितीही तयार केली जाणार आहे. 

डॉ. अतुलबाबा भोसले यांचे कराड नगरपालिकेला भक्कम पाठबळ लाभत असून, त्यांच्या पुढाकारातून छ. शिवाजी महाराज स्टेडियमचा आराखडा साकारण्यात येत आहे. क्रीडाप्रेमींच्या सूचनांचा अंतर्भाव यामध्ये करण्यात येणार आहे. यासाठी सर्व क्रीडाप्रेमींची बैठक घेतली जाणार असून, त्याची तारीख लवकरच निश्चित करुन क्रीडाप्रेमींना कळविली जाईल, अशी माहिती नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी दिली.

यावेळी नगरपालिकेचे उपअभियंता ए. आर. पवार, माजी नगरसेवक घन:श्याम पेंढारकर, उमेश शिंदे, मुकुंद चरेगावकर, रमेश मोहिते, नितीन वास्के, विनायक घेवदे, रमेश मोहिते, अभिषेक भोसले, किरण मुळे, प्रमोद शिंदे यांच्यासह खेळाडू, क्रीडाप्रेमी व क्रीडा प्रशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

आरक्षण देण्याचा अधिकार या सरकारला आहे ? 10 टक्के आरक्षण दिलं म्हणजे नेमकं काय दिलं ? राज्य सरकारला ठाकरेंचा सवाल...

वेध माझा ऑनलाईन। मराठा आरक्षण विधेयकाचा मसुदा आज विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. या विधेयकानुसार राज्यातील मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण मिळणार आहे. दरम्यान, यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 10 टक्के आरक्षण दिलं म्हणजे तुम्ही काय दिलं? कशात 10 टक्के आरक्षण दिलं? तुम्हाला तसे अधिकार कुणी दिले? असा थेट सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारलाच केला. पुढे ते असेही म्हणाले की, तुम्हाला या गोष्टीचे अधिकार आहेत का? नाहीतर परत हे प्रकरण सुप्रीम कोर्टात जाणार. मग राज्य सरकार सांगणार प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलंय. आम्ही काही करु शकत नाही. निवडणुकीच्या तोंडावर या सगळ्या गोष्टी करायच्या. याला काही अर्थ आहेत का? असा सवालही राज ठाकरे यांनी थेट सरकारला केला. तर आरक्षण देणं हा खूप तांत्रिक विषय आहे. सरकारने जाहीर केलं म्हणजे त्याचा आनंद व्यक्त करण्यासारखं नाही. 10 टक्के आरक्षण दिलं म्हणजे नक्की काय आहे? हे एकदा मराठा समाजाने सरकारला विचारावं, असेही राज ठाकरे यांनी मराठा समाजाला सांगितले.

मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर; राहुल नार्वेकर यांच्याकडून घोषणा

वेध माझा ऑनलाईन।  मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक एकमताने विधानसभेत एकमताने संमत करण्यात आलंय. मराठा आरक्षणाच्या मसुद्याला राज्याच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली त्यानंतर विधिमंडळात हे विधेयक मांडण्यात आले. विधानसभेतही मराठा आरक्षण विधेयकाचा मुसदा एकमताने मंजूर करण्यात आला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यासंदर्भातील तशी घोषणा केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केल्यानंतर या प्रस्तावावर मतदान घेण्यात आलं. त्यानंतर एकमताने हे विधेयक मंजूर करण्यात आलं. त्यामुळे मराठा समाजाला १० टक्के आरक्षण मिळाल्याने आता मराठ्यांचा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. आता हे विधेयक विधानपरिषदेत मांडलं जाईल त्यानंतर ते राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात येईल मग त्यासंदर्भातील कायद्यात रूपांतर करण्यात येणार आहे. मराठा समाजाचा, मराठा ऐक्याचा विजय आहे. मराठा समाजाच्या चिकाटीचा हा विजय आहे. मराठा लढयाचा विजय असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

Sunday, February 18, 2024

एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंसमोर रडले होते... आदित्य ठाकरेंचा मोठा दावा ;

वेध माझा ऑनलाईन। ठाकरे गटाचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आज ठाण्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांची ठाण्यात आज जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांची नक्कल देखील केले. तसेच एकनाथ शिंदे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याजवळ येऊन रडले होते, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला. “गेल्या पाच-सहा वर्षात मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना एवढं रडताना पाहिलं आहे, त्याचे किती कारणं आहेत. उल्हासनगरचा धीरज ठाकूर म्हणून तरुण नगरसेवक होता. त्याने खासदारकीसाठी कल्याणमध्ये खूप मेहनत घेतली. त्याने जीव की प्राण अशी मेहनत केली. सगळं काही केलं. मी त्याला सांगितलं होतं की, एक संधी आपण धीरजला दिलं पाहिजे. त्यानंतर त्यांनी जी रडणं सुरु केलं, नाही साहेब. तुमचा विश्वास नाही. मी राजीनामा देतो. मी म्हटलं, जाऊदे. तुमचं तुम्हाला लख लाभो. तसंच ठाण्याचे हल्ली जे शिव्या देत असतात ते आपल्या पक्षात आले होते. त्यांना तिकीट द्यायचं होतं. उद्धव ठाकरेंनी ठरवलं तिकीट देऊयात. पण त्यांनी तेव्हा पुन्हा रडारड सुरु केली”, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.

“एवढंच काय, ते 20 मे 2022 च्या दिवशीसुद्धा वर्षा बंगल्यावर येऊन उद्धव ठाकरेंसमोर असेच रडले होते की, मला तुम्ही यापासून वाचवा. भाजप मला जेलमध्ये टाकेल. आता जेलमध्ये जाण्याचं वय नाही, असं म्हणाले. त्यानंतर बरोबर एक महिन्यात ते भाजपात गेले. पक्ष तोडण्याचा प्रयत्न केला. घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणून आज अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर बसवलं आहे”, असा शब्दांत आदित्य ठाकरेंनी निशाणा साधला.

“मी जेव्हा जेव्हा ठाण्यात आलोय तेव्हा ठाणेकरांनी एवढं प्रेम दिलं आहे की कधीही असं वाटत नाही, आपल्यातून गद्दार गेले आहेत. ठाणे जसंच्या तसं शिवसेनेचं राहीलं आहे. महिलांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास आहे. कारण ते जिथे आहेत तिथे सुरक्षा, विश्वास, प्रगती आहे. अनेक गोष्टी बोलण्यासाख्या आहेत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

आपल्या राज्यात हल्ली एक फॅशन झालीय. खोटं बोला पण रडून बोला. आधी भाजप बोलायची खोटं बोला पण रेटून बोला. आता मिंधे बोलतात, खोटं बोला पण रडून बोला. काल त्यांनी एवढ्यासाठीच अधिवेशन घेतलं होतं की, माझे वडील किती अपयशी ठरले आहेत हे त्यांना तोंडावर लोकांसमोर सांगण्याठी अधिवेशन घेतलं. मी जास्त काही पाहिलं नाही. कारण मला त्यांना रडत बघण्याची सवय जुनी आहे. काही झालं तर डोळ्यांतून अश्रू काढायचं आणि रडायचं. पण आता लोकं ओळखून आहेत”, असा दावा आदित्य ठाकरेंनी केला.

“आम्ही किती उदाहरणं देऊ. तुम्ही शिवसैनिक म्हणून अपयशी ठरलातच पण तुम्ही माणूस आणि व्यक्ती म्हणून अपयशी ठरलात. ज्या व्यक्तीने तुम्हाला सर्व काही दिलं, ज्या नेत्याने तुम्हाला सर्व काही दिलं, ज्या परिवाराने तुम्हाला सर्व काही दिलं, ज्या पक्षाने तुम्हाला सर्व काही दिलं त्याच व्यक्तीचे तुम्ही बाप चोरायला निघालेत. त्याच व्यक्तीचा पक्ष आणि इमान चोरायला निघालात. सर्वच चोरायला निघालात. पण मी आजही तुम्हाला सांगतो. या महाराष्ट्रातून दोन गोष्टी पुसल्या जाऊ शकत नाहीत. एक म्हणजे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून केलेलं काम आणि दुसरं म्हणजे तुमच्या माथ्यावर गद्दार, बाप चोर, पक्ष चोर म्हणून जो शिक्का आहे तो कुणी पुसू शकत नाही”, असा घणाघात आदित्य ठाकरेंनी केला.

अजित पवारांनी ३ वेळा शब्द फिरवून आमच्या पाठीत खंजीर खुपसला ; अंकिता पाटील यांनी दिला इशारा ;

वेध माझा ऑनलाईन। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधून बंड केल्यानंतर बारामती लोकसभेवर दावा केला आहे. त्यामुळे बारामतीत शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार उमेदवार देणार हे तर नक्की आहे. त्यादृष्टीने अजितदादा बारामतीत जाऊन बारामतीकराना भावनिक आवाहन सुद्धा करत आहेत. मात्र त्याच दरम्यान आता भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांनी अजितदादांना निवडणुकीपूर्वीच थेट इशारा दिला आहे. अजित पवारांनी ३ वेळा शब्द फिरवून आमच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यामुळे जे आमचे विधानसभेला काम करतील त्यांचेच आम्ही लोकसभेला काम करू असा इशारा अंकिता पाटील यांनी दिला आहे.

अंकिता पाटील म्हणाल्या, आम्ही यापूर्वी काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीत होतो आणि आता महायुतीत एकत्र आहोत. मागच्या तिन्ही वेळेस अजित पवार यांनी आम्हाला शब्द देऊन फिरवला आहे. त्यांनी आमची फसवणूक केली आहे. आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यामुळे जे आमचे विधानसभेला काम करतील त्यांचेच आम्ही लोकसभेला काम करू असा इशारा अंकिता पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात उलटसुलट चर्चा सुरु झाल्यात.

नेमका विषय काय? 
खरं तर इंदापूरच्या विधानसभा जागेवरून अजित पवार पाटील यांच्यात वितुष्ट आलं होते. इंदापूर विधानसभा मतदारसंघ हा बारामती लोकसभेच्या अंतर्गत येतो. यापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीमध्ये हर्षवर्धन पाटील आघाडीधर्म पाळून राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळेंना निवडणुकीसाठी मदत करायचे, मात्र लोकसभेनंतर विधानसभा निवडणुका येताच अजित पवार त्याठिकाणी त्यांचा उमेदवार उभा करत होते. २०१४ आणि २०१९ च्या दोन्ही विधानसभा निवडणुकीत अजितदादांनी दत्तात्रय भरणे याना विधानसभेचं तिकीट देऊन हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात उभे केलं होते. दोन्ही वेळा हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला होता. आता अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील हे महायुतीत आहेत, त्यामुळे इंदापूर विधानसभेच्या जागेचा पेच पुन्हा उभा राहणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर अंकिता पाटील यांनी अजित पवार याना थेट इशारा दिला आहे.

Saturday, February 17, 2024

शिवसेना का सोडली…मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात दिले कारण...

वेध माझा ऑनलाईन | आज बाळासाहेब असते तर राम मंदिर पूर्ण होताना आणि कलम ३७० हटवल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भरभरून कौतूक केले असते. परंतु जे वारसा सांगता आहेत, त्यांनी एकही शब्दही उच्चारले नाही. यामुळे हिंदुत्व सांगण्याची तुमच्याकडे नैतिकता नाही.महाविकास आघाडीत असताना बाळासाहेबांचे विचार मरु लागले होते. शिवसैनिकांचे खच्चीकरण होऊ लागले होते. नेतृत्व चुकत असल्याचे लक्षात आले होते. मग बाळासाहेबांची भूमिका मांडण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलले. आमचे पाऊल जर चुकले असते तर ग्रामपंचायत निवडणुकीत महायुतीला पहिल्या क्रमांकाचा पक्ष जनतेने केला नसता. तुम्ही देखील इतक्या मोठ्या संख्येने येथे आला नसता, असे शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी शिवसेनेच्या अधिवेशनात बोलताना सांगितले. यावेळी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर घाणाघात मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.

ते म्हणाले...
आज बाळासाहेब असते तर राम मंदिर पूर्ण होताना आणि कलम ३७० हटवल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भरभरून कौतूक केले असते. परंतु जे वारसा सांगता आहेत, त्यांनी एकही शब्दही उच्चारला नाही. यामुळे हिंदुत्व सांगण्याची तुमच्याकडे नैतिकता नाही. तुमच्याकडे असतो तो पर्यंत तो व्यक्ती चांगला असतो. परंतु गेल्यावर तो कचरा होतो. तो गद्दर होतो. आता एकेदिवशी हा महाराष्ट्र तुम्हाला कचरा केल्याशिवाय राहणार नाही, असा घाणाघात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता केला. आज त्यांनी आत्मपरीक्षण, आत्मचिंतन करायला हवे, असा सल्ला त्यांनी दिला.

…मग लोकांचे हे प्रेम मिळाले नसते
आम्ही अनेक ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी रात्रीअपरात्री हजारो लोक स्वागतासाठी येतात. लोकांचे हे प्रेम कामातून, वागण्यातून मिळाले आहे. आम्ही चुकीचे केले असते तर लोकांचे हे प्रेम मिळाले नसते. बाळासाहेबांनी सांगितले होते काँग्रेससोबत जाण्यापेक्षा माझे दुकान बंद करेल. मग आज त्याच काँग्रेससोबत तुम्ही बसला आहात. आता तुमचे हिंदुत्व कुठे गेले? सावरकरांचा अपमान केला तेव्हा कुठे गेले तुमचे हिंदुत्व? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणाला सुरुवात करताना लवकरच आपण सर्वांना अयोध्येत घेऊन जाणार असल्याचे सांगितले. एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसेनेचे अधिवेशन कालपासून सुरु आहे. अनेक विषयांना या अधिवेशनातून चालना देण्यात आली. कोल्हापूर शहरात भगवे वातावरण झाले आहे. शिवसेना ही कुणाची आहे, हे शिवसैनिकांनी दाखवून दिले आहे. अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी उद्योजकांसाठी सर्व ठराव आपण करुन घेतले.

आरशामध्ये त्यांनी स्वतःला पहावे. स्वतःचे कर्तुत्व आरशात पहावे. किती मुकुटे घालून फिरणार तुम्ही? हे कधी लपत नाहीत. या गोष्टी सगळ्या बाहेर येत असतात. बाळासाहेबांचा वारसा सांगण्यासाठी तोंडात नाही तर मनगटात जोर असावा लागतो. ताकत असावी लागते. ज्यांनी शिवसेना वाढवण्यासाठी रक्ताचे पाणी केले. पाकिस्तानची मॅच होऊ नये म्हणून कार्यकर्त्यांनी वानखेडे स्टेडियम तोडून टाकलं ही शिवसेना कार्यकर्ते होते.शिवसेना अशीच मोठी झाली नाही. त्यासाठी रक्ताचे पाणी केले लोकांनी. घरावर तुळशीपत्र ठेवले.
आज बाळासाहेब असते तर राम मंदिर पूर्ण होताना आणि कलम ३७० हटवल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भरभरून कौतूक केले असते. परंतु जे वारसा सांगता आहेत, त्यांनी एकही शब्दही उच्चारले नाही. यामुळे हिंदुत्व सांगण्याची तुमच्याकडे नैतिकता नाही.

शिवसेना का सोडली...मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले कारण
Follow us
google-news-icon
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Feb 17, 2024 | 3:09 PM
कोल्हापूर, दि. 17 फेब्रुवारी 2024 | महाविकास आघाडीत असताना बाळासाहेबांचे विचार मरु लागले होते. शिवसैनिकांचे खच्चीकरण होऊ लागले होते. नेतृत्व चुकत असल्याचे लक्षात आले होते. मग बाळासाहेबांची भूमिका मांडण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलले. आमचे पाऊल जर चुकले असते तर ग्रामपंचायत निवडणुकीत महायुतीला पहिल्या क्रमांकाचा पक्ष जनतेने केला नसता. तुम्ही देखील इतक्या मोठ्या संख्येने येथे आला नसता, असे शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी शिवसेनेच्या अधिवेशनात बोलताना सांगितले. यावेळी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर घाणाघात मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.


बाळासाहेबांनी मोदींचे कौतूक केले असते
आज बाळासाहेब असते तर राम मंदिर पूर्ण होताना आणि कलम ३७० हटवल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भरभरून कौतूक केले असते. परंतु जे वारसा सांगता आहेत, त्यांनी एकही शब्दही उच्चारला नाही. यामुळे हिंदुत्व सांगण्याची तुमच्याकडे नैतिकता नाही. तुमच्याकडे असतो तो पर्यंत तो व्यक्ती चांगला असतो. परंतु गेल्यावर तो कचरा होतो. तो गद्दर होतो. आता एकेदिवशी हा महाराष्ट्र तुम्हाला कचरा केल्याशिवाय राहणार नाही, अशा घाणाघात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता केला. आज त्यांनी आत्मपरीक्षण, आत्मचिंतन करायला हवे, असा सल्ला त्यांनी दिला.

…मग लोकांचे हे प्रेम मिळाले नसते
आम्ही अनेक ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी रात्रीअपरात्री हजारो लोक स्वागतासाठी येतात. लोकांचे हे प्रेम कामातून, वागण्यातून मिळाले आहे. आम्ही चुकीचे केले असते तर लोकांचे हे प्रेम मिळाले असते. बाळासाहेबांनी सांगितले होते काँग्रेससोबत जाण्यापेक्षा माझे दुकान बंद करेल. मग आज त्याच काँग्रेससोबत तुम्ही बसला आहात. आता तुमचे हिंदुत्व कुठे गेले? सावरकरांचा अपमान केला तेव्हा कुठे गेले तुमचे हिंदुत्व? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला.

कुटुंबात मी एकटा पडलोय अस म्हणत अजित पवार लोकांची सहानुभूती घेत आहेत ; ...बारामतीचे लोक आम्हाला वर्षानुवर्ष ओळखतात, आम्हाला भावनात्मक अपील करण्याची गरज नाही ; शरद पवार यांचा पुन्हा हल्लाबोल ;

वेध माझा ऑनलाईन। विरोधकांकडून ज्या पद्धतीने भाषा वापरली जाते, त्यांची भाषणं पाहता बारामतीचे लोक नोंद घेतील, असे म्हणत शरद पवार यांनी बारामतीमधील अजित पवार गटाचा बूथ कमिटी मेळाव्यातून अजित पवार यांनी केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर दिलं आहे
आम्ही भावनात्मक अपील करण्याचं कारण नाही. कारण बारामतीचे लोक आम्हाला वर्षानुवर्ष ओळखत आहेत. त्यामुळे आम्हाला भावनात्मक अपील करण्याची गरज नाही. पण विरोधकांकडून ज्या पद्धतीने भाषा वापरली जाते, त्यांची भाषणं पाहता बारामतीचे लोक नोंद घेतील, असे म्हणत शरद पवार यांनी बारामतीमधील अजित पवार गटाचा बूथ कमिटी मेळाव्यातून अजित पवार यांनी केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर दिलं आहे. 
पुढे ते असेही म्हणाले की, उमेदवार कोणी असला तरी निवडणुकीत मतदारांची साथ मागण्याचा अधिकार आहे. पण संपूर्ण लोक एका कुटुंबाच्या मागे आहेत, आणि मीच एकटा आहे, असं भासवणं म्हणजेच लोकांना भावनिक करण्यासारखं आहे. लोकांची सहानुभूती मिळवण्याचं काम असल्याचे म्हणत शरद पवार यांनी अजित पवारांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला. अजित पवार यांनी आपल्याला परिवारात एकटं पाडण्यात आल्याची भावना व्यक्त करत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला होता.

 



डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून रस्ते सुधारणेसह शाळा दुरुस्तीसाठी निधी मंजूर ; कालवडे येथे १५ लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन ;

वेध माझा ऑनलाईन। कालवडे (ता. कराड) येथे राज्य शासनाच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून अंतर्गत रस्ता सुधारणेसाठी १० लाख रुपये आणि जिल्हा परिषद शाळा दुरूस्तीसाठी ५ लाख रुपये असा एकूण १५ लाख रुपयांचा विकासनिधी उपलब्ध झाला आहे. या विकासकामांचे भूमिपूजन डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विष्णू थोरात होते. 

याप्रसंगी य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, दत्तात्रय देसाई, कृष्णा सहकारी बँकेचे संचालक शिवाजीराव थोरात, प्रमोद पाटील, बाबुराव यादव, हर्षवर्धन मोहिते, पैलवान दादासाहेब थोरात, उपसरपंच शुभम थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. 

डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, सार्वजनिक बांधकाम खात्याने व ग्रामविकास खात्याने कराड दक्षिण मतदारसंघात कोट्यवधींचा निधी दिला आहे. या विकासनिधीतून रस्ते, पूल अशी अनेक कामे मार्गी लागत आहेत. राज्यातील भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे कराड दक्षिण मतदारसंघाच्या विकासाकडे विशेष लक्ष असून, येत्या काळातही जास्तीत जास्त विकासनिधी खेचून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यातून कालवडे गावातील विविध विकासकामांसाठीदेखील मोठा निधी देण्याची ग्वाही डॉ. भोसले यांनी दिली.

यावेळी दिनकर थोरात, धनाजीराव थोरात, उदयसिंह थोरात, रविराज थोरात, बालिश थोरात, विलास देसाई यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पक्ष आणि चिन्हाबाबतचा निर्णय सेटलमेंट करून घेतला ; शरद पवारांचा हल्लाबोल ;

वेध माझा ऑनलाईन। पक्ष, चिन्ह काढून घेणे हा आमच्यावर अन्याय आहे. पक्ष आणि चिन्हाबाबतचा निर्णय सेटलमेंट करून घेतला गेला, असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला. माध्यमांशी बोलताना त्यांनी विधानसभा अध्यक्ष तसेच अजित पवार गटावर हल्ला चढवला.

काय म्हणाले शरद पवार ?
सेटलमेंट करून पक्ष, चिन्ह देण्यात आलंय. असा निर्णय होईल याची खात्री होती. त्याचं कारण विधानसभा अध्यक्षांना, पदाला जी प्रतिष्ठा आहे ती त्यांनी ठेवली नाही. ते ठेवतील असं वाटत नव्हतं. त्या प्रकारचा निर्णय त्यांनी घेतला. दोन्ही बाजूने अशा प्रकारचा निर्णय त्यांनी शिवसेनेबाबत घेतला होता. त्याच निर्णयाची पुनरावृत्ती त्यांनी केलीय. पण पक्ष आणि चिन्ह याबाबतची भूमिका निवडणूक आयोगाने घेतली किंवा सभापतींनी घेतली, आमच्या मते ही संस्था न्याय देणारी आहे. पण पदाचा गैरवापर कसा होतो त्याचं उदाहरण यातून दिसलं. त्याला पर्याय फक्त सुप्रीम कोर्ट आहे. आम्ही कोर्टात याचिका दाखल केली आहे. निवडणुका जवळ आल्यात तुम्ही लवकर निर्णय घ्या अशी विनंती आहे .

राष्ट्रवादीची स्थापना कोणी केली हे देशाला माहीत आहे
आतापर्यंत अनेक निर्णय झाले. पण पक्ष आणि चिन्ह दुसऱ्यांना देणं हे घडलं नाही. राष्ट्रवादीची स्थापना कुणी केली हे जगाला माहीत आहे. हे माहीत असताना पक्ष इतरांच्या हाती देणं हा अन्याय करणारा निर्णय आहे. त्यामुळे आमच्यासमोर सुप्रीम कोर्टाशिवाय पर्याय नाही असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. अनेक लोकांनी मेळाव्यातून सभातून दोन्ही गोष्टी आम्हाला इतक्या दिवसात मिळतील हे जाहीर केलं होतं. तेव्हाच आमच्या लक्षात आलं होतं की सेटिंग करून निर्णय घेतले जातील. आपल्यावर अन्याय होणारे निर्णय होतील. पक्षाला पुढची तयारी केली पाहिजे, त्यासाठी आम्ही वरच्या कोर्टात गेलो.


Friday, February 16, 2024

‘…तर मीच विधानसभा निवडणूक लढणार नाही’; अजित पवारांनी बारामतीकरांना टाकलं कोड्यात! माझी शेवटची निवडणूक असे म्हणून काहीजण मत मागतील, त्याला भुलू नका ; शरद पवारांवर केली टीका

वेध माझा ऑनलाईन। वास्तविक हा निकाल निवडणूक आयोगाने दिला. विधानसभा अध्यक्षांनी निकाल दिला. कागदपत्र काय आहेत यावर निकाल लागतो. खऱ्याचा, सत्याचा निकाल लागतो. हा निकाल आम्ही नम्रपणे स्वीकारला आहे. आम्ही ऊतमात केला नाही. ही परिस्थिती यायला नको होती, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. मोदींशिवाय देशाला पर्याय नाही. इंडिया आघाडी काढली, पण राहिली नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

माझी शेवटची निवडणूक आहे, असं म्हणून काही लोक तुम्हाला मतदान मागतील. पण त्यांचं ऐकू नका. त्यांना भुलू नका, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर हल्ला चढवला होता. मात्र, अजित पवार यांनीच खुद्द आज मतदारांना सर्वात मोठं आवाहन केलं आहे. आम्ही जो उमेदवार देऊ त्याला विजयी करा. नाही तर उद्या मी विधानसभेला उभा राहणार नाही. मलाही माझे उद्योग आणि प्रपंच पडले आहेत. तुम्हीच जर मला साथ देणार नसाल तर काय?, असा सवालच अजित पवार यांनी केला. तेव्हा कार्यकर्त्यांमधून एकच वादा, अजितदादा असा नारा देण्यात आला. त्यावर अजितदादांनी हे मतपेटीतही दिसू द्या, असं आवाहन केलं. मात्र, अजितदादा यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीकरांशी संवाद साधताना ही साद घातली आहे. आता मला ही बघायचं आहे. बारामती भावनेच्या पाठीशी उभे राहती की विकासाच्या मागे उभी राहते. बारामतीची आता खरी कसोटी आहे. जोपर्यंत महायुती एकत्र बसून कोण जागा लढणार हे ठरणार नाही तोपर्यंत उमेदवार जाहीर करत येणार नाही. आम्ही लवकरच बसू. तुम्ही एकमेकांशी संपर्क ठेवा. ज्यांना माझ्या बरोबर राहायचं आहे त्यांनी माझ्या बरोबर रहा. दबावात कोणी राहू नका, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
जेव्हा कोणाला अजित पवारांची गरज पडेल तेव्हा सांगतो अजित पवार काय ते, असा इशाराही अजितदादांनी यावेळी दिला. जर तुम्ही राष्ट्रवादी हे एक घर समजता तर मी अध्यक्ष झालो तर काय झालं? कोणी कोणाच्या पोटी जन्माला यावं हे माझ्या हाती आहे काय? मला माझ्या कुटुंबाने एकटं पाडलंय. तुम्ही पडू देऊ नका, असं आवाहनही त्यांनी केलं.

मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री शिंदे यांचं मोठं विधान ; मराठा आरक्षण मिळणार पण नेमकं कुणाला?

वेध माझा ऑनलाइन। मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केले आहे. कुणावर अन्याय न करता कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देता येईल आणि मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. मराठा समाजास स्वतंत्र आरक्षण मिळण्यासाठी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात ‘क्युरेटिव्ह पिटिशन’ दाखल केली होती. ती न्यायालयाने स्वीकारली. यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी ही शेवटची संधी असणार आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केले आहे. मराठा समाजाला शैक्षणिक, सामाजिक मागासलेपणावर टिकणार आणि कायद्याच्या चौकटीत बसणार तसेच कुणावर अन्याय न करता कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देता येईल आणि मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. तर ज्यांच्याकडे जुन्या कुणबी नोंदी असतील त्यांना मराठा आरक्षणाचा लाभ मिळणार नाही तर कुणबी नोंदी नसलेल्यांना मराठा आरक्षणाचा लाभ मिळणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. 
दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं पाहिजे. सरकार मराठा आरक्षणाबाबतीत सकारात्मक आहे. त्यामुळे मराठा समाजाने कोणतंही आंदोलन करायला नव्हतं पाहिजे. पण जे आता सुरू आहेत ते आंदोलन मागे घ्यावं असे आवाहन देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला केले आहे.



Thursday, February 15, 2024

सातारा जिल्हा नियोजन समितीवर 14 नामनिर्देशित सदस्य - पालकमंत्री शंभूराज देसाई यांची शिफारस :

वेध माझा ऑनलाइन
सातारा जिल्हा नियोजन समीतीवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या शिफारशींवर 14 सदस्य नामनिर्देशित करण्यात आले आहेत

त्या सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे...

विधिमंडळ सदस्यांमधून
आमदार महेश शिंदे
आमदार जयकुमार गोरे

नामनिर्देशित सदस्य - 
प्रदीप साळुंखे
राजेंद्र यादव
प्रदीप माने
धैर्यशील कदम
राहुल बर्गे
संतोष जाधव
अमरसिंह घाडगे
जयवंत शेलार
चंद्रकांत जाधव
वासुदेव माने
पुरुषोत्तम जाधव
रणजित भोसले
अशी या सदस्यांची नावे आहेत





डॉ.अतुल भोसले यांचा कराड शहर भाजपच्या वतीने सत्कार

वेध माझा ऑनलाइन। कराड  शहरावरती जीवापाड प्रेम करणारे व नेहमीच संकटाच्या काळात धावून येणारे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य व सातारा लोकसभा प्रभारी डॉ.अतुल भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून कराड शहरासाठी 50 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला.

त्यानिमित्ताने भारतीय जनता पार्टी कराड शहराच्यावतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी कराड शहराचे अध्यक्ष एकनाथ बागडी,सातारा उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, सरचिटणीस किसन चौगुले, मुकुंद चरेगावकर ,किरण मुळे, रमेश मोहिते, सुधाकर कांबळे, व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Wednesday, February 14, 2024

कराडच्या वैकुंठ स्मशानभूमी येथे दहनासाठी वेळेचे बंधन नको ; लोकशाही आघाडीचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन ;

वेध माझा ऑनलाइन । कराड नगरपरिषदेने,  वैकुंठ स्मशानभूमी कराड येथे दहनासाठी घातलेल्या वेळेच्या बंधना विरोधात, राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाही आघाडी कराड शहर यांच्यावतीने, अध्यक्ष मा. श्री जयवंत पांडुरंग पाटील (काका) यांनी लोकशाही आघाडीच्या पदाधिकारी, माजी नगरसेवक व नागरिकांसमवेत मा.मुख्याधिकारी, कराड नगरपरिषद कराड यांना लेखी निवेदन देऊन स्मशानभूमीत दहनासाठी घातलेले वेळेचे बंधन रद्द करण्याची मागणी केली आहे.

प्रारंभी कराड नगर परिषदेच्या प्रांगणामध्ये उभारण्यात आलेल्या आदरणीय स्व. पी. डी.पाटीलसाहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सर्व पदाधिकारी नागरिकांनी अभिवादन केले.

निवेदनात असे म्हटले आहे की 'कराड शहरातील वैकुंठ स्मशामभूमीमध्ये कराड शहरातील तसेच कराड शहरानजीकच्या गांवामधील अनेक ग्रामस्थ व नागरिक त्यांच्या नातेवाईकांचे निधन झालेनंतर, पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दहनासाठी आणले जाते. त्यास वेळेचे- काळाचे बंधन कधीच नव्हते. परंतू नुकतेच कराड वैकुंठ स्मशामभूमीत दहनासाठी रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत वैकुंठ स्मशामभूमीत पार्थिव दहन करता येणार नाही, असे फलक आपणांतर्फे वैकुंठ स्मशामभूमी परिसरात लावले आहेत.

खरे पाहता स्मशामभूमीत दहनासाठी पार्थिव आणण्यासाठी वेळेचे घातलेले बंधन अत्यंत चुकीचे, जनतेच्या व समाजाच्या भावनांशी खेळ करणारे आहे. कारण काही नागरिक बंधु-भगिनींचे देहावसान घरी वृध्दापकाळाने, काहीचे अपघाची निधन, काहीचे दुर्धर अशा आजाराने रात्री-अपरात्री निधन होते अशा वेळी नातेवाईकांना पार्थिव जास्त वेळ घरी ठेवणे भावनिक व आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे. निधन होणारी व्यक्ती या सर्वच सदन, अर्थिकदृष्ट्या सक्षम असणार नाहीत. आपण जर वेळेचे बंधन घातले तर ज्याची अर्थिक परिस्थिती बेताची आहे, अशा नागरिकांनी आपल्या नातेवाईकांचे पार्थिव कोठे ठेवायचे? त्यांना ते दवाखान्यात ठेवणे परवडणारे नाही. सध्याची महागाई पाहता नातेवाईकांना दवाखान्याचे बिल भरणे देखील शक्य नसते अशा वेळी आपण वेळेचे बंधन घालून महागाईत आणखी भर घालत आहात. तसेच योग्य वेळेत दहन न करता आलेने होणारी कुटुंबांतील सदस्यांची भावनिक व मानसिक कुचंबना याचा विचार करता हे बंधन सामाजिकदृष्ट्या अनिष्ट व घातक आहे.

 या बंधनाचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत.
तरी आपणांस लोकशाही आघाडी व कराड शहरातील नागरिकांच्या वतीने विनंती करणेत येते की,- सदर वेळेचे बंधन त्वरीत रद्द करावे अन्यथा लोकशाही आघाडीचेवतीने तीव्र आंदोलन केले जाईल, याची नोंद घ्यावी.' असे निवेदनात म्हटले आहे.

याप्रसंगी कराड लोकशाही आघाडीचे अध्यक्ष माननीय श्री जयवंत पांडुरंग पाटील (काका), उपाध्यक्ष ॲड. विद्याराणी साळुंखे, सचिव नरेंद्र पवार, सहसचिव व मुसद्दीक आंबेकरी, खजिनदार रवींद्र मुंढेकर, सह खजिनदार राकेश शहा यांचेसह माजी नगरसेवक नंदकुमार बटाणे, सुहास पवार,  उदय हिंगमिरे,शिवाजी पवार, गंगाधर जाधव, जयंत बेडेकर, प्रविण पवार, अजय सूर्यवंशी, भारत थोरवडे, सोहेब सुतार, अशपाक मुल्ला, दीपक कटारिया,  साबीर आंबेकरी, अमरसिंह बटाणे, आदिल आंबेकरी, निहाल मसुरकर, गणेश हिंगमिरे, सोहेल बारस्कर, अबुकर सुतार, प्रताप भोसले, राहुल भोसले, मंगेश वास्के, गणेश कांबळे,सचिन चव्हाण, रोहित वाडकर, चांद पालकर, विनायक पाटील, अहमद मुल्ला, प्रशांत शिंदे,अजिंक्य देव, संजय मोरे, रफिक मुल्ला, सतीश भोंगाळे, रमेश सातुरे आदींनी उपस्थित राहून निवेदनावर सह्या केल्या आहेत.

Tuesday, February 13, 2024

डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नातून कराडच्या विकासासाठी ५० कोटींचा निधी मंजूर ; वाखाण रोड ते कोरेगाव - कार्वे रस्त्याचे होणार चौपदरीकरण; फूटपाथसह स्वतंत्र सायकल ट्रॅकचीही होणार निर्मिती ;

वेध माझा ऑनलाइन।  कराड दक्षिण मतदारसंघाच्या व विशेषतः कराड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असलेले भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नामुळे केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधी (CRIF) अंतर्गत कराडच्या विकासासाठी ५० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या ५० कोटींच्या निधीतून कृष्णा नाका - वाखाण रोड ते कोरेगाव - कार्वे - कोडोली या १० किलोमीटरच्या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. याशिवाय स्मार्ट सिटीच्या धर्तीवर या रस्त्यावर पादचाऱ्यांसाठी फूटपाथ व स्वतंत्र सायकल ट्रॅकचीही निर्मिती होणार असल्याने, या नव्या प्रकल्पामुळे कराड शहराच्या प्रगतीला चालना मिळणार आहे. 

भाजपा महायुती सरकारने गेल्या वर्षभरात राज्यात रखडलेल्या विकासाला पुन्हा चालना देत, नवनव्या प्रकल्पांसाठी निधीची बरसात सुरू केली आहे. विशेषतः कराड दक्षिण मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्नशील असलेले भाजपचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले यांना ताकद देण्याचे धोरण राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी अवलंबिलेले आहे. जनतेच्या हितासाठी आणि कराड दक्षिणच्या सर्वांगीण विकासासाठी अखंड कार्यरत असलेल्या डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रत्येक मागणीला हिरवा कंदील दाखवीत, राज्य सरकारच्या माध्यमातून विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला जात आहे. 

गेल्याच आठवड्यात कराड दक्षिणमध्ये डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या १३१ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. भोसले यांनी कराड दक्षिणच्या विकासासाठी भविष्यातही भरघोस निधी उपलब्ध करून देण्याची मागणी ना. चव्हाण यांच्याकडे केली होती. मुख्यत्वे कराड शहराच्या विकासासाठी मोठा विकासप्रकल्प मंजूर करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली होती. 

अतुलबाबांच्या मागणीची दखल घेत ना. चव्हाण यांच्या सूचनेनुसार राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाने केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधी (CRIF) अंतर्गत कराड शहरातील रस्ते विकासासाठी ५० कोटींच्या निधीची मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. त्यानुसार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने कराड शहरातील कृष्णा नाका - वाखाण रोड ते कोरेगाव - कार्वे - कोडोली या १० किलोमीटरच्या रस्त्याचा समावेश सी.आर.आय.एफ. योजनेत करत ५० कोटींचा निधी मंजूर केला आहे. 

केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधी (CRIF) अंतर्गत मंजूर झालेला हा राज्यातील निवडक रस्त्यांपैकी एक रस्ता असून, डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे कराडच्या या रस्त्याला आता नवी झळाळी प्राप्त होणार आहे. या ५० कोटींच्या निधीतून कराड शहरातील कृष्णा नाका - वाखाण रोड ते कोरेगाव - कार्वे - कोडोली या १० किलोमीटरच्या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. शिवाय स्मार्ट सिटीच्या धर्तीवर या रस्त्यावर पादचाऱ्यांसाठी फूटपाथसह स्वतंत्र सायकल ट्रॅकची निर्मिती केली जाणार आहे. ज्यामुळे मॉर्निंग वॉक अथवा सायकलिंग करणाऱ्या आरोग्यहितदक्ष नागरिकांसाठी सुरक्षित व स्वतंत्र मार्गाची सोय उपलब्ध होणार आहे. याशिवाय या रस्त्यावर अन्य अनुषंगिक सेवासुविधा जसे की, प्रसाधनगृह, स्वच्छतागृहे, पार्किंग स्लॉट, सायकल पार्किंग स्टॅन्ड अशा विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे या प्रकल्पामुळे कराड शहराच्या सौंदर्यात भर पडण्यास मदत होणार आहे.

डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांना भाजपचे बळ!
कराड दक्षिण मतदारसंघाच्या आणि विशेषतः कराड शहराच्या विकासासाठी भाजपचे नेते डॉ. अतुलबाबा भोसले सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून अतुलबाबांना राज्यात ओळखले जात असून, डॉ. अतुलबाबांकडून जनविकासासाठी आलेल्या प्रत्येक मागणीची पूर्तता करून, भाजपकडून त्यांना बळ दिले जात आहे. डॉ. अतुलबाबांची लोकसेवेची तळमळ बघून, कराड दक्षिणमध्ये विविध विकास कामांसाठी भरघोस निधीचा वर्षाव होत असून, कराड शहरासाठी मंजूर झालेल्या ५० कोटींच्या निधीमुळे शहराच्या विकासात मोठी भर पडणार आहे.


Monday, February 12, 2024

येत्या 72 तासात भाजप काँग्रेसचा मोठा गट फोडणार ? ; भाजप कडून हालचाली सुरू ! काँग्रेसचे 10 ते 12 आमदार फुटणार? ; चर्चांना उधाण ;

वेध माझा ऑनलाइन। महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे प्रचंड हालचाली घडत आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्रातील मोठे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. विशेष म्हणजे अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचादेखील राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना भेटून आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे आणखी 10 ते 12 आमदारांचा गट फुटून भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. पण या सर्व घडामोडींना नेमकी सुरुवात कधीपासून झाली? याची माहिती समोर येत आहे.येत्या 72 तासात मोठ्या घडामोडींची शक्यताअसून भाजप काँग्रेसमधील मोठा गट फोडण्याची खेळी करणार असल्याची माहिती मिळाली आहे

 यापुर्वी अशोक चव्हाण यांनी माध्यमांसमोर येत भाजप प्रवेशाच खंडन केलं होतं. पण आता त्यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा थेट राजीनामा दिल्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची बातमी पक्की असल्याची चर्चा आहे. अशोक चव्हाण यांनी पक्षात प्रवेश करण्यापूर्वी गेल्या आठवड्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. आपला पक्ष प्रवेश केंद्रीय नेतृत्वाच्या उपस्थितीत व्हावा असे त्यांनी या भेटीत सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. अमित शाह येत्या 15 फेब्रुवारीला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यावेळी अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे.

महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस, पुढचे 72 तास महाराष्ट्रात वेगवान घडामोडी
भाजपचं महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरु आहे. भाजप पडद्यामागे मोठी राजकीय खेळी खेळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे आणखी काही बडे नेते भाजपच्या संपर्कात आहेत. यामध्ये काँग्रेस आमदारांचादेखील समावेश आहे. भाजप नेत्यांची काँग्रेस नेत्यांशी बोलणी सुरु आहे. भाजप काँग्रेसमधील मोठा गट फोडण्याची खेळी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत सर्वांचा पक्षप्रवेश होणार आहे.

...शिंदे, अजित पवारांसारखे अशोक चव्हाण पक्ष आणि चिन्हावर दावा सांगणार का? संजय राऊत यांचा सवाल ...

वेध माझा ऑनलाईन। काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या पक्षाचा राजीनामा दिला. आमदारकीचा राजीनामा अशोक चव्हाण यांनी दिल्यानंतर काँग्रेसच्या गोटात एकच खळबळ उडाली. या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळातून सत्ताधारी विरोधकांकडून प्रतिक्रिया येत असताना अशोक चव्हाण भाजपवासी झाले, विश्वास बसत नाही, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले. तर कालपर्यंत अशोक चव्हाण सोबत होते.. चर्चा करीत होते.. आज गेले…अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर संजय राऊत यांनी ट्वीट करत खोचक टोला लगावला आहे. तर पुढे ते असेही म्हणाले, एकनाथ मिंधे व अजित पवार यांच्या प्रमाणे चव्हाण सुध्दा आता काँग्रेस वर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय? आणि निवडणूक आयोग त्यांना ते देणार काय? आपल्या देशात काहीही घडू शकते!, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.



अशोक चव्हाणांचा राजीनामा ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय दिली प्रतिक्रिया ? वाचा सविस्तर;

वेध माझा ऑनलाइन । काँग्रेसमधील अनेक नेते लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. आज काँग्रेस नेते आमदार अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असल्याची जोरदार चर्चा सुरू असून ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचीही सुरू आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रीया दिली आहे. 

"अशोक चव्हाण यांनी राजिनामा दिल्याची चर्चा मी तुमच्याकडून ऐकली. पण काँग्रेसमधील अनेक मोठे नेते भाजपच्या संपर्कात आहेत.ज्या प्रकारे काँग्रेस पक्ष काम करत आहे यामुळे जनतेत काम करणाऱ्या नेत्यांची गुदमर होत आहे, त्यामुळे असा ट्रेंड देशभरात सुरू आहे. यामुळे राज्यातील काँग्रेसमधील काही मोठे नेते भाजपमध्ये प्रवेश करतील, मी आता फक्त एवढंच सांगेन आगे आगे देखो होता है क्या, असं मोठं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे, यामुळे आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. 
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या साडेचार वर्षांपासून सुरू असलेली उलथापालथी आणि  फोडाफोडीच्या मालिकेने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा वेग घेतला आहे. गेल्या दीड वर्षांत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असली तरी काँग्रेस मात्र एकसंध होता. मात्र आज दुपारी काँग्रेसमध्ये भूकंप घडवणारी माहिती समोर आली असून, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे राज्यातील ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच त्यांनी आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. 

Sunday, February 11, 2024

कॉग्रेस नेते अशोक चव्हाण 11 आमदारांना घेवून लवकरच भाजप मध्ये प्रवेश करणार? घडामोडींना वेग ?

वेध माझा ऑनलाइन। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. काँग्रेस नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला आहे ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. अशोक चव्हाण यांच्यासोबत त्यांचे ११ समर्थक आमदार सुद्धा भाजपच्या वाटेवर असून आजच अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश होण्याची शक्यता आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये गेल्यास आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला हा सर्वात मोठा हादरा म्हणावा लागेल

अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली असून त्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याच्या चर्चा सुरू आहे. अशोक चव्हाण यांचा मोबाईल फोन सध्या नॉट रिचेबल आहे.  गेल्या काही महिन्यापासून अशोक चव्हाण हे भाजपच्या वाटेवर आहेत अशा चर्चा सुरु होत्याच. राज्यात महाविकास आघाडी सरकार जाऊन शिंदे फडणवीस यांचे सरकार आले तेव्हा सुद्धा बहुमत चाचणीवेळी अशोक चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीचे काही आमदार सभागृहात उपस्थित नव्हते. भाजपला मदत करण्याासाठीच या आमदारांनी बहुमत चाचणीला येणे टाळल्याची चर्चा त्यावेळी सुरु होती. त्यातच दुसरीकडे भाजपच्या प्रदेश कार्यालयात सुद्धा नेत्यांची मोठी लगबग सुरु आहे. बड्या नेत्याच्या पक्षप्रवेशासाठीच ही लबबग सुरु आहे असं बोललं जात आहे.

धनगर आरक्षणासाठी 17 फेब्रुवारीला 50 लाख धनगर बांधव मुंबईत येणार; सरकारला इशारा

वेध माझा ऑनलाइन। बीडमध्ये धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी इशारा मेळावा घेण्यात आला आणि याच इशारा मेळाव्यामध्ये धनगर आरक्षणाच्या पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली. येत्या 17 फेब्रुवारीला आरक्षणासाठी 50 लाख धनगर बांधव हे चौंडी येथून मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी जाणार आहेत. तसा निर्णय बीड येथे झालेल्या इशारा मेळाव्यात घेण्यात आला आहे.

50 लाख धनगर बांधव मेंढ्यासह मुंबईला जाणार
अनेक वेळा आंदोलन मोर्चा काढून देखील सरकार धनगर समाजाला आरक्षण देत नाही, त्यामुळे बीडमध्ये सरकारला इशारा देण्यासाठी धनगर समाज बांधवांनी मेळावा घेतला. या मेळाव्यामध्ये धनगर समाज बांधव 17 तारखेला चोंडी येथील अहिल्यादेवी होळकर यांचा आशीर्वाद घेऊन मुंबईत मेंढ्यासह दाखल होणार आहेत असा इशारा यशवंत सेनेचे बाळासाहेब दोडतले यांनी सरकारला दिला. धनगर समाज बांधव मुंबईत गेल्यावर मुख्यमंत्र्यांना नाही तर पंतप्रधानांना देखील आरक्षणाची घोषणा करावी लागेल असं दोडतले म्हणाले आहेत

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे धनगर आरक्षणाच्या विरोधात आहेत, त्यांनी जर 20 तारखेच्या आत धनगर समाजाला आरक्षण दिलं नाही तर ते जातीवादी आहेत असं आपण समजायचं आणि धनगर आरक्षण विरोधी सरकार असे बोर्ड गावागावात लावायचे. असे बाळासाहेब दोडकले  म्हणाले आहेत

धनगर आरक्षणासाठी एमआयएम पक्ष रस्त्यावर उतरणार
धनगर आरक्षणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असून देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवू असं सांगितलं होतं. मात्र अद्याप देखील धनगर समाजाला आरक्षण मिळाले नाही. त्यामुळे धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर खासदार इम्तेहाज जलील यांनी देखील सरकारकडे मागणी केली आहे. बीडमध्ये झालेल्या इशारा सभेत एमआयएम पक्ष देखील धनगर आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचं जिल्हाध्यक्ष शेख शफीक यांनी सांगितलं.

मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेतली आणि ती पूर्ण करून दाखवली असे ते म्हणतात. तर धनगर आरक्षणासाठी उपमुख्यमंत्री अहिल्यादेवी होळकर यांची शपथ घेतील का असा प्रश्न यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी उपमुख्यमंत्र्यांना विचारला. 21 दिवस आंदोलन करून 50 दिवसाचा वेळ सरकारने घेतला तरी देखील अद्याप आरक्षण का दिले नाही असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनी देखील धनगर आरक्षणाला पाठिंबा द्यावा अशी साद त्यांनी प्रकाश आंबेडकर यांना घातली. 

येत्या 20 तारखेपर्यंत धनगर समाजाला आरक्षण दिलं नाही तर लोकसभेच्या निवडणुकीवर संपूर्ण धनगर समाज हा बहिष्कार घालणार आहे. तर जो पक्ष धनगर समाजाच्या नेत्याला तिकीट देणार नाही त्या पक्षालादेखील मतदान करणार नसल्याचं या इशारा मेळाव्यातून सरकारला सांगण्यात आलं. आतापर्यंत अनेक वेळा आंदोलन करून देखील राज्य सरकारने आपल्या तोंडावर काठी मारली आहे, आता मेंढपाळाची काठी राज्य सरकारच्या तोंडावर बसणार असल्याचं धनगर बांधवांकडून सांगण्यात आलंय.

राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गटाला दिल्यानंतर शरद पवार पहिल्यांदा बोलले ...काय म्हणाले...वाचा बातमी ...

वेध माझा ऑनलाइन। केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवारांच्या गटाला दिल्यानंतर शरद पवार यांनी आज प्रथमच त्यावर भाष्य केलं. निवडणूक आयोगाचा हा निकाल आश्चर्यकारक आहे परंतु आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो आहोत आणि आम्हाला लवकर न्याय मिळेल, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला. तसेच चिन्ह मर्यादीत काळासाठी उपयुक्त असतं असेही त्यांनी सांगितलं.

पुण्यातील एका कार्यक्रमाला संबोधित केल्यानंतर शरद पवार यांनी मीडियाशी संवाद साधला, त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी शरद पवार म्हणाले, माझा व्यक्तिगत अनुभव असा आहे, मी पहिली निवडणूक बैलजोडीवर लढलो, नंतर आमचं चिन्ह गेलं.आम्ही चरख्यावर लढलो, नंतर आमचं चिन्ह गेलं, आम्ही हातावर लढलो.नंतर आमचं चिन्ह गेल्यावर आम्ही घड्याळावर लढलो. त्यामुळे लोकांच्या दृष्टीने चिन्ह हे मर्यादित कामासाठी उपयुक्त असतं पण या पद्धतीने निवडणूक आयोगाचा निकाल आश्चर्यकारक आहे. निवडणूक आयोगानं आमचं पक्षचिन्ह काढून घेतलं नाही तर आमचा पक्ष दुसऱ्याला दिला. ज्यांनी पक्ष स्थापन केला, उभारला त्यांच्या हातून पक्ष काढून दुसऱ्याच्या हातात दिला हे देशात घडलं नव्हतं, ते सुद्धा निवडणूक आयोगाने करून दाखवलं असं शरद पवार यांनी सांगितलं.

मी निवडणुकीला उभा राहणार नाही- 
दरम्यान, काहीजण भावनिक करतील, शेवटची निवडणूक आहे असं म्हणतील परंतु त्यांना बळी पडू नका असं विधान अजित पवारानी शरद पवार याना उद्देशून केलं होते, त्यावर सुद्धा पवारांनी उत्तर दिले. मी निवडणुकीला उभं राहणार नाही हे मी यापूर्वीच जाहीर केलं आहे. त्यामुळं भावनिक बोलायची गरज नाही. बारामतीचे लोक हुशार आणि समजदार आहेत. बारामतीत कामे कोणी केली आणि बारामतीची प्रतिष्ठा कुणी वाढवली आहे हे त्यांना माहिती आहे, त्यामुळं ते योग्य निर्णय घेतली, असं शरद पवार म्हणाले.

Saturday, February 10, 2024

पुण्यात दिवसा ढवळ्या बंदुकीचा थरार ; आर्थिक वादातून पार्टनरला घातल्या गोळ्या ;

वेध माझा ऑनलाइन। पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळच्या झालेल्या दिवसाढवळ्या हत्येनंतर सुरु झालेला बंदुकीचा थरकाप सुरुच आहे. कोथरूडनंतर आता पुण्यातील औंध भागात आर्थिक वादातून पार्टनरवर गोळीबार करून स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनिल ढमाले अस आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. आर्थिक वादातून हा गोळीबार करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. गोळीबारात जखमी झालेल्या आकाश जाधवची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

गोळीबार करण्यात आलेला पार्टनर आकाश जाधव या गोळीबारात गंभीर जखमी झाला आहे. औंधमधील ज्युपिटर चौकात हा प्रकार घडला. याच चौकात आकाश जाधवचे ज्वेलरी शॉप होते. हे शॉप त्याने अनिल ढमालेला चालवण्यासाठी दिले होते.  मात्र दोघांमधे गेल्या काही दिवसांपासून पैशाच्या व्यवहारावरुन वाद सुरु होते. 

आज (10 फेब्रुवारी) आकाशने अनिल ढमालेला दुकानात बोलावून घेतले. त्यानंतर दोघेही एकाच दुचाकीवरून बँकेत जाण्यासाठी निघाले. यावेळी दुचाकीच्या मागे बसलेल्या अनिल ढमालेनं दुचाकी चालवत असलेल्या आकाशवर मागून गोळी झाडली. गोळीबार केल्यानंतर त्याने पळ काढला. पळ काढल्यानंतर तो एका रिक्षात जाऊन बसला. रिक्षात बसल्यानंतर अनिलने रिक्षाचालकाला पुणे स्टेशनच्या दिशेने रिक्षा नेण्यास सांगितले. रिक्षातून थोडं अंतर गेल्यानंतर रिक्षाच्या मागील सीटवर बसलेल्या अनिल ढमालेनं स्वतःच्या सुद्धा डोक्यात गोळी मारुन आत्महत्या केली.

राष्ट्रीय आरोग्य चित्रपट महोत्सवात कृष्णा विद्यापीठाच्या ‘फार्मासिस्ट’ लघुपटाची निवड

वेध माझा ऑनलाइन। पुणे येथे होणाऱ्या १२ व्या राष्ट्रीय आरोग्य चित्रपट महोत्सवात कृष्णा विश्व विद्यापीठातील फार्मसी अधिविभागाच्या ‘फार्मासिस्ट’ या लघुपटाची निवड झाली आहे. या लघुपटाचे दिग्दर्शन कृष्णा विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे संचालक डॉ. बाळकृष्ण दामले यांनी केले आहे.

आरोग्य जागृतीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या पुणे येथील पी. एम. शाह फाऊंडेशनच्यावतीने दरवर्षी आरोग्य समस्यांवरील चित्रपटांच्या राष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाच्या १२ व्या राष्ट्रीय आरोग्य चित्रपट महोत्सवासाठी विविध भारतीय भाषांमधून अनेक विषयांवरचे हजारो लघुपट फाऊंडेशनकडे प्राप्त झाले होते. यामधून कृष्णा विश्व विद्यापीठातील फार्मसी अधिविभागाने तयार केलेल्या ‘फार्मासिस्ट’ या लघुपटाची निवड यंदाच्या महोत्सवासाठी करण्यात आली आहे.

कृष्णा विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे संचालक डॉ. बाळकृष्ण दामले यांनी दिग्दर्शित केलेल्या या लघुपटात फार्मसी अधिविभागातील प्रा. डॉ. विश्वजीत घोरपडे, प्रा. शिवशरण धडे, प्रा. ज्योत्स्ना गांधी व प्रा. जिशा यांनी भूमिका साकारल्या आहेत. त्यांना फार्मसी अधिविभागाचे अधिष्ठाता डॉ. नामदेव जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. पुणे येथील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात २३ व २४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या १२ व्या राष्ट्रीय आरोग्य चित्रपट महोत्सवात या लघुपटाचे प्रदर्शन करण्यात येणार आहे.

या यशाबद्दल कृष्ण विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले, कुलपतींचे प्रधान सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिणगारे, कुलगुरु डॉ. नीलम मिश्रा, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे यांनी लघुपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे. 


मुख्यमंत्री चषकात थरारक फायनल ; सासवडच्या संत सोपान काका बँक संघास विजेतेपद; महिलांमध्ये पुण्याच्या राजमाता जिजाऊ संघास विजेतेपद ; सामन्यांचे यशस्वी नियोजन ; शिंदे गटाचे नेते रणजितनानांची अनेकांनी थोपटली पाठ ;

वेध माझा ऑनलाइन। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त लिबर्टी मजदूर मंडळाच्या क्रीडांगणावर आयोजित केलेल्या मुख्यमंत्री चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत व्यावसायिक पुरुष गटात अतिशय थरारक आणि रोमहर्षक फायनल प्रेक्षकांना  पाहायला मिळाली. 

मुंबई महापालिका संघाने जवळजवळ जिंकलेला सामना शेवटच्या एका मिनिटात बाजी उलटवत सासवडच्या संत सोपान काका बँक संघाने जिंकत मुख्यमंत्री चषक पटकावला. पृथ्वीराज शिंदे याने जिगरबाज खेळ करत शेवटच्या मिनिटात गुणांची कमाई केल्याने सासवड संघास विजेतेपद मिळाले. ही लढत पाहण्यासाठी आलेल्या हजारो प्रेक्षकांनी पृथ्वीराज शिंदेंच्या खेळाला दाद देताना त्याच्यावर बक्षिसांचा वर्षाव केला.
व्यावसायिक पुरुष गटाची फायनल अपेक्षेनुसार रोमहर्षक ठरली. दोन्ही संघांनी व्यावसायिक खेळाचे प्रदर्शन करत खेळ करत गुण घेतल्याने प्रत्येक क्षणाला विजयाचे पारडे दोन्ही संघांकडे झुकत होते. सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये संत सोपान काका संघाने गुणांची कमाई करत आघाडी घेतली. मात्र मुंबई महापालिका संघाने शांतपणे चाली करत बरोबरी साधली. पहिल्या हाफमध्ये सामना १९-१९ असा बरोबरीत होता.
दुसऱ्या हाफमध्ये ही दोन्ही संघ एकमेकांवर गुणांची कमाई करत होते. संत सोपान काका संघास काही चुकांचा फटका बसला. त्यामुळे हा संघ पिछाडीवर होता. शेवटच्या पाच मिनिटांत मुंबई संघ विजेतेपद पटकावणार असे वाटत असतानाच पुण्याच्या पृथ्वीराज शिंदेंने चपळदार खेळाने पुणे संघास गुण मिळवून दिले. वेगवान हालचाली करत त्याने गुण मिळवले. त्यांच्या जादुई हालचालींपुढे मुंबई संघाचा प्रतिकार कमी पडला आणि ४०-४५ अशा गुणांनी सासवड संघाने विजेतेपद पटकावले. त्यावेळी मैदानावर उपस्थित हजारो प्रेक्षकांनी जल्लोष करत पृथ्वीराजला खांद्यावर उचलून घेतले. शेवटच्या क्षणापर्यंत थरार पाहावयास मिळाल्याने दोन्ही संघांच्या खेळाडूंचे कौतुक झाले.  संत सोपान काका बँक संघ सासवडने २ लाख २२ हजार २२२ रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळविले. मुंबई महापालिका संघास उपविजेतेपद मिळाले. मुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबई संघाने तिसरा आणि इन्कम टॅक्स पुणे संघाने चौथा क्रमांक पटकावला‌. अष्टपैलू खेळाडू म्हणून मुंबईच्या विशाल कुमार, उत्कृष्ट चढाईसाठी पृथ्वीराज शिंदे तर उत्कृष्ट पकडसाठी राजेश बोराडे याला गौरवण्यात आले.

महिलांमध्ये पुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाने शिवशक्ती मुंबई संघावर एकतर्फी विजय मिळवत विजेतेपद मिळविले. शिवशक्ती मुंबई संघास उपविजेतेपद, द्रोणा स्पोर्ट्स पुणे संघास तिसरा तर एम. डी. स्पोर्ट्स पुणे संघास चौथा क्रमांक मिळाला. अष्टपैलू खेळाडू म्हणून सलोनी गजमले, उत्कृष्ट चढाईसाठी अर्चना जोरे, उत्कृष्ट पकडसाठी रेखा सावंत यांना गौरवण्यात आले.
भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कराड अर्बन बँकेचे अध्यक्ष दिलीप गुरव, 
वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन. पाटील, शिवाजी हाउसिंग सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती सुनीता जाधव, माजी नगराध्यक्षा एड. विद्याराणी साळुंखे, रणजित नाना पाटील यांच्या हस्ते सामन्यांना प्रारंभ झाला. बक्षीस वितरण दिलीप गुरव, लिबर्टीचे उपाध्यक्ष अरुण जाधव, एड. मानसिंगराव पाटील, रणजित नाना पाटील, सचिन पाटील, सचिव रमेश जाधव यांच्या हस्ते झाले. मुनीर बागवान सावकार, विजय गरुड, दादासाहेब पाटील, एकनाथ बागडी, आशपाक मुजावर, किशोर शिंदे, विजय कुलकर्णी,  राजेंद्र जाधव, एकनाथ बागडी, लिबर्टीचे सर्व संचालक, आजी माजी खेळाडू व क्रीडा प्रेमी नागरिक उपस्थित होते.

रणजित पाटील यांची अनेकांनी थोपटली पाठ...
कबड्डीची मोठी परंपरा असणाऱ्या लिबर्टी मजदूर मंडळाच्या वतीने रणजित पाटील नाना यांच्या पुढाकाराने गेल्या वर्षापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्य कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. नामांकित खेळाडूंचा खेळ पाहावयास मिळत आहे. काल अंतिम सामन्यासाठी हजारो प्रेक्षकांनी उपस्थिती लावली. महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. लिबर्टीच्या मैदानावर पूर्वीचे दिवस पाहावयास मिळत होते. स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद आणि नेटक्या संयोजना बद्धल रणजित पाटील नाना यांची अनेकांनी पाठ थोपटली. खास करून लिबर्टीचे माजी खेळाडूही भारावलेले होते.