Sunday, February 28, 2021
195 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित
अपहरणप्रकरणी शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर अपहरणाचा गुन्हा...
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पानवन (ता. माण) येथील धनाजी आबाजी शिंदे व त्यांचे मित्र छुब चव्हाण हे गुरुवार (दि. 25) पासून रविवार (दि. 28) पर्यंत गायब होते. या दोघाना शेखर भगवान गोरे, राजेंद्र उर्फ राजू ब्रम्हदेव जाधव, संग्राम अनिल शेटे, दत्ता घाडगे, राहुल अर्जुन गोरे, वीरकुमार पोपटलाल गांधी व गाडीवरील चालक हरिदास गायकवाड यांनी त्यांच्या ईनोवा गाडी (क्र. एमएच 11 – 7057) मधून जबरदसतीने बसवून कुळकजाई येथील फार्म हाऊस तसेच ठाणे येथील लॉजवर थांबवून ठेवले होते.याबाबत धनाजी आबाजी शिंदे यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यासह वरील सहा जणांवर अपहरणाचा गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास म्हसवड पोलीस करत आहेत.
संवेदनशील आणि रोखठोक नेते जयवंतराव पाटील यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...
आज 17 जणांना दिला डिस्चार्ज ; 177 जण नवीन बाधित
119 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित
Saturday, February 27, 2021
नगरसेवक विनायक पावसकरांची राजेंद्रसिह यादव याच्यावर जोरदार टीका... मी काहितरी करतोय असे दाखवण्याचा केवळ त्यांचा स्टंट असल्याचा केला आरोप...
नगराध्यक्षा सौ रोहिणी शिंदे यांच्या सतर्कतेचे शहरातून होतंय कौतुक...
98 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज ; 117 जण सापडले नवे रुग्ण...
182 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित
Friday, February 26, 2021
कराड पालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत गटनेते सौरभ पाटील यानी विचारले काही प्रश्न... ; मात्र,ते सोडवण्यासाठी पालिकेचे सत्ताधारी कोण आहेत..? हा पेच अगोदर सुटलाच पाहिजे...
136 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज तर,176 जण नवीन बाधित आढळले...
कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करा – जिल्हाधिकारी शेखर सिंह
130 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित
Thursday, February 25, 2021
भाजपच्या नगराध्यक्षांसह 13 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश...एकनाथ खडसेंचा धमाका...
59 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज ; तर,130 नवीन बाधित... काळजी घ्या...
कोरोना संक्रमिक रुग्ण संख्येवर नियंत्रणासाठी-जिल्हाधिकारी यांचे खाजगी डॉक्टर्स आणि हॉस्पिटलला आदेश
लग्न समारंभास 100 व्यक्तींनाच परवानगी -जिल्हाधिकारी यांनी दिल्या सुचना
111 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; काळजी घ्या...
Wednesday, February 24, 2021
एक मार्च पासून सर्वसामान्यांना मिळणार कोरोनाची लस...या लोकांना मिळणार प्राधान्य...
35 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज ; तर 111 सापडले नवे रुग्ण...जिल्हाधिकाऱ्यांनी केले नवे आदेश जारी...
कराड नगरपरिषदेच्या वतीने 14 प्रभागांमध्ये पथनाट्याद्वारे जनजागृती...
Tuesday, February 23, 2021
सांगलीत राष्ट्रवादीला मदत करणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई होणार..भाजपा कडून हालचाली सुरू...
204 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित
पुरोगामी विचार वाचवण्यासाठी महाआघाडी सरकार एकत्र : आ. पृथ्वीराज चव्हाण... पोतलेत आरोग्य उपकेंद्राचे उदघाटन ; उदयसिंह पाटील-उंडाळकरांची उपस्थिती.
जिल्ह्यातील 96 जणांना दिला डिस्चार्ज ; मात्र 201 सापडले नवीन बाधीत...
शहाजीराव क्षीरसागर यांचे जशराज पाटील यांनी केले अभिनंदन....
कृष्णा कारखान्याची साखर झाली इंडोनेशियाला रवाना...
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या केंद्र शासनाने कारखान्यांची आर्थिक तरलता सुधारावी. साखर कारखान्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून साखर निर्यात योजना जाहीर केली आहे. या योजनेस अनुसरून आणि मागील तसेच चालू हंगामातील शिल्लक साखर साठा विचारात घेऊन आणि सध्या पांढर्या साखरेला बाजारात कमी प्रमाणात असलेली मागणी, पर्यायाने मंदावलेला साखरेचा उठाव, बाजारात घसरलेले साखरेचे दर अशा अनेक बाबींचा विचार करून कारखान्यात रॉ शुगरची निर्मिती करण्याचे धोरण सर्वत्र अंगीकारण्यात आले आहे. या रॉ शुगरला आंतरराष्ट्रीय बाजारात असलेली मागणी आणि केंद्र सरकारचे सकारात्मक निर्यात धोरण याचा विचार करून, कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी 2020-21 या गळीत हंगामात रॉ शुगर उत्पादित करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तसेच या हंगामात 5 लाख क्िंवटल कच्ची साखर तयार करून ती निर्यात करण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. त्यानुसार कारखान्यात उत्पादित केलेल्या साखरेचा पहिला ट्रक निर्यातीसाठी काही दिवसापूर्वी पाठविण्यात आला.
याप्रसंगी व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक लिंबाजीराव पाटील, दयानंद पाटील, जितेंद्र पाटील, धोंडीराम जाधव, संजय पाटील, गिरीश पाटील, सुजित मोरे, अमोल गुरव, ब्रिजराज मोहिते, दिलीपराव पाटील, पांडुरंग होनमाने, गुणवंतराव पाटील, निवास थोरात, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, रघुनाथ मोहिते, बहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील, सेक्रेटरी मुकेश पवार, जनरल मॅनेजर (टेक्निकल) पी. डी. राक्षे आदींसह सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
कराड तालुक्यातील काही ग्रामपंचायतींच्या सरपंच उपसरपंच निवडी खालील प्रमाणे...
साखरपुड्यातुन 14 तोळे सोने असलेली पर्स लंपास : अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल
कराड - साखरपुड्याच्या कार्यक्रमातून 14 तोळे सोन्याचे दागिने लंपास झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. येथील एका हॉटेल लॉनमध्ये साखरपुड्याच्या कार्यक्रम सुरु होता. या कार्यक्रमातून एका महिलेचे सुमारे 5 लाख रूपये किमतीचे 14 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले. रविवारी 21 रोजी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली सविता सुधीर पाटील (वय 41) रा. वारूंजी विमानतळ ता. कराड यांनी रात्री उशिरा याबाबतची फिर्याद शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, येथील एका हॉटेल लॉनमध्ये सविता पाटील या त्यांच्या नातेवाईकाचा साखरपुडा होता. या कार्यक्रमासाठी त्या त्यांच्या मुलासोबत आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी त्यांच्या सोन्याच्या बांगड्या व ब्रेसलेट पर्समध्ये काढून ठेवल्या,दरम्यान, साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू असताना त्यांच्या नणंदेची मुलगी ऋतुजा साळुंखे हिने सविता यांच्याजवळ तिच्या भावाची जुनी अंगठी त्यांच्या पर्समध्ये ठेवायला दिली. दरम्यान, साखरपुड्याचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास सविता पाटील यांनी नवरीमुलीसोबत फोटो काढण्यासाठी त्यांच्या जवळची पर्स शेजारच्या सोफ्यावर ठेवली. फोटो काढून झाल्यानंतर त्या पर्स घेण्यासाठी सोफ्याकडे गेल्या असता त्यांना सदर ठिकाणी पर्स दिसली नाही. पर्सबाबत पाटील यांनी पै-पाहुण्यांना विचारणा केली. मात्र, पर्सबाबत कोणालाच काही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर अज्ञात व्यक्तीने त्यांची पर्स चोरली असल्याबाबत त्यांची खात्री झाली त्यानंतर सविता पाटील यांनी याबाबत शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे या पर्समध्ये सविता पाटील यांचे सुमारे 4 लाख 20 हजार रूपये किमतीचे सोन्याच्या 6 बांगड्या, 35 हजार रूपये किमतीचे 1 तोळे वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट, 25 हजार रूपये किमतीची सोन्याची 7 ग्रँम वजनाची अंगठी असा एकूण सुमारे 4 लाख 80 हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिने होते. ही पर्स अज्ञात चोरट्याने लंपास केल्याने साखरपुड्याच्या कार्यक्रमात एकच गदारोळ उडाला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक स्वामी करीत आहेत.
36 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित
Monday, February 22, 2021
कराड पालिकेच्या वतीने सत्कार...
कराड
येथील नगरपालिकेने विविध उद्योगात कार्य करणाऱ्या महिला बचत गटांसह विविध संस्था व योध्यांचा करण्यात आला. यामध्ये शाकंभरी, विघ्नहर्ता महिला बचत, सिटी कंप्यूटर इंस्टिट्यूट व शोएब सय्यद यांचा समावेश असून त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्धल पालिकेच्या वतीने हा सत्कार केला.
शहरातील शुक्रवार पेठेत दहा महिलांचा शाकंभरी महिला बचत गट गेल्या पंधरा वर्षांपासून कार्यरत आहे. याच गटातील चार महिला व एका युवकाने मिळवून ओम शिवरत्न कापूर व्यवसाय सुरु केला असून त्यांना बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून कर्जही मिळाले. या गटाने सामाजिक बांधिलकी जपत कोरोना महामारीत दहा दिवस कार्वे नाका, श्री हॉस्पिटल शेजारील झोपडपट्टी, स्टेडियम परिसरातील घरे, हायवेवरील वीटभट्टी आदी. भागात संपूर्ण जेवण बनवून वितरित केले. तसेच त्यांनी आरोग्याच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण मास्कही तयार करून त्याचे वाटपही केले होते. अशाप्रकारे सामाजिक भान जपणाऱ्या व आपल्या बरोबर इतरही महिलांना प्रेरित करणाऱ्या या गटाचे काम कौतुकास्पद असल्याने नगरपालिकेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच शुक्रवार पेठेतील दहा महिलांचा विघ्नहर्ता महिला बचत गट 2008 सालापासून कार्यरत आहे. या गटाने ज्याला जमेल तसे पापड बनविणे, कुरडया विकणे, मेणबत्ती बनवणे, ब्लाऊज शिवणे आदी. व्यवसाय सुरु केले. तसेच सामाजिक बांधिलकी जपत कोरोनाच्या काळामध्ये आरोग्याची काळजी म्हणून इतरांसाठी जवळपास 2000 पेक्षा अधिक मास्कसह जीवनावश्यक वस्तूंचे, गरीब महिलांसाठी साड्यांचे वाटप, लहान मुलांना कपड्यांचे वाटप, खाऊचे वाटप केले. त्यांच्या या कामामुळे इतर बचत गटातील महिलांना, सेवाभावी संस्थांनाही यातून प्रेरणा मिळाली. अशाप्रकारे सामाजिक भान जपणाऱ्या व आपल्या बरोबर इतरही महिलांनाही प्रेरित करणाऱ्या बचत गटाचाही नगरपालिकेमार्फत सत्कार करण्यात आला.
सिटी कंप्यूटर इंस्टिट्यूट, कराड ही संस्था मागील २० वर्षापासून शहर व परिसरात कार्यरत आहे. या संस्थेच्या माध्यमातून कम्प्युटर, कॉम्प्युटर टायपिंग, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनिंग आदी. प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. या संस्थेने वरील वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या उद्देशाने स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन,रोजगार मेळावे, अन्नदान तसेच मोफत व्यवसायाभिमुख प्रशिक्षण असे अनेक वेगळ्या प्रकारचे उपक्रम राबविले आहेत. सिटी फॅशन डिझाईन इन्स्टिट्यूट, कराड या संस्थेतील विद्यार्थिनींनी कोरोना कालावधीमध्ये स्वतः 500 पेक्षा जास्त दर्जेदार मास्क बनवून त्याचे गरजूंना मोफत वाटप केले. याबद्धल त्यांचाही पालिकेतर्फे सत्कार करण्यात आला.
तसेच शनिवार पेठेतील शोएब सय्यद या अतिशय गरीब कुटुंबातील युवकानेही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आईचे घरकाम तर वडील इस्त्रीच्या दुकानात कामाला असून घरात दोघेजण भाऊ. घरचं परिस्थितीमुळे कसेतरी रडतखडत आठवीपर्यंतचे शिक्षण त्याने पूर्ण केले. त्यानंतर वडिलांना हातभार लावायचा म्हणून बरीच छोटी-मोठी कामेही त्याने केली. यामधून मिळणाऱ्या पैशांवरच त्याचे कुटुंब चालत होते. त्यानंतर शोएबने कपडे शिवण्याचा व्यवसाय सुरु केला. त्यासाठी आवश्यक मशीन्स खरेदीसाठी त्याने पालिकेच्या दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान या विभागाकडे कर्जासाठी मदत मागितली. बँक ऑफ इंडियाकडून कर्ज घेऊन त्याने त्याचा व्यवसाय सुरू केला. तसेच कोरोना काळात सामाजिक बांधिलकी जोपासत त्याने उरलेल्या कपड्यातून मास्क तयार केले. याच काळात त्याने भाजीपाला वितरण, वारणा कोविड सेंटरमधील रुग्णांसाठी आपल्या जमापुंजीतून एक वेळचे जेवण दिले. तसेच स्वतःच्या जीवाची काळजी न करता त्यांच्या शेजारील दोन कुटुंबातील लोकांना ऑक्सिजन मशीन लावून त्याचे प्राणही त्याने वाचविले. स्वतःच्या प्रतिकूल परिस्थितीतही दुसऱ्याचा विचार करून त्यांना आनंद देण्यासाठी झटणाऱ्या या मुलाचाही नगरपालिकेतर्फे सत्कार करून त्याचे कौतुक करण्यात आले.
खासदार उदयनराजे व श्रीनिवास पाटील यांच्यावर शेतकरी नेते पंजाबराव पाटील यांची टीका...
95 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित
, समजुतदारपणे सूचनांचं पालन करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Sunday, February 21, 2021
53 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित
Saturday, February 20, 2021
70 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित
Friday, February 19, 2021
.....आणि उदयनराजे पोहोचले शंभूराज देसाईंच्या घरी...
77 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित
पालकमंत्री ना बाळासाहेब पाटील यांचे शिवछत्रपतीना अभिवादन...
Thursday, February 18, 2021
कराडात लवकरच विमान प्रशिक्षण केंद होणार...
सातारा जिल्ह्यात कोरोनाबधितांचा आकडा आता 57 हजार पार...... सतर्कता बाळगा - ना शंभूराज देसाई यांचे आवाहन...
राज्यासह जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सतर्क राहून खबदारी घेतली पाहिजे. यासाठी प्रत्येकाने मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व वेळोवेळी हाताची स्वच्छता केली पाहिजे, असे आवाहन गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
दरम्यान, जिल्ह्यात एकूण बरे झालेली रुग्णसंख्या 55016 आहे. तर आज दिवसभरात सातारा जिल्ह्यात 2 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 1845 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.