सातारा दि.25 (जिमाका):जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 59 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 635 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
दरम्यान 130 जण नवीन बाधीत सापडले आहेत
त्याबाबतची सविस्तर बातमी उद्या...
635 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
जिल्हा रुग्णालय सातारा येथील 38, कराड येथील 117, कोरेगाव येथील 47, वाई येथील 46, खंडाळा येथील 11, रायगाव येथील 21 , पानमळेवाडी येथील 187, महाबळेश्वर येथील 25, दहिवडी येथील 70, म्हसवड येथील 9, पिंपोडा येथील 8 व कृष्णा मेडिकल कॉलेज येथील 56 असे एकुण 635 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
*एकूण नमुने -342420*
*एकूण बाधित -58365*
*घरी सोडण्यात आलेले -55464*
*मृत्यू -1850*
*उपचारार्थ रुग्ण- 1051*
00000
No comments:
Post a Comment