शहराच्या नगराध्यक्षा कार्यसम्राट तर आहेतच मात्र त्यांची एक सतर्कता ही आता लोकांसमोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांना सापडलेली एक पर्स त्यांनी सुखरूप संबंधित महिलेला परत करत त्या महिलेचे आशीर्वाद घेत वाहवाह मिळवली आहे.त्या पर्समध्ये सुमारे सव्वादोन लाखाचा ऐवज होता.
दोन दिवसांपूर्वी पालिकेतील बजेट पार पडल्यानंतर कराडच्या नगराध्यक्षा सौ रोहिणी शिंदे या कामाचा शीण घालवण्यासाठी सहज फेरफटका मारण्यासाठी म्हणून येथील घाटावर गेल्या होत्या तिथून परत येताना उपजिल्हा रुग्णालयासमोरील रस्त्यावर त्यांना एक पर्स पडल्याचे निदर्शनास आले त्याचवेळी एकजण ती पर्स उचलून पळण्याच्या नादात असतानाच नगराध्यक्षानी त्यांचे स्वीयं सहायक आशिष रैनाक याना ती पर्स घेण्यास सांगितले त्या पर्समध्ये मोबाईल फोन होता त्या नंबर वर त्या पर्स हरवलेल्या संबंधित महिलेचा पर्स साठी फोन आल्यावर अध्यक्षांनी त्यांना पालिकेत बोलावून त्यांची पर्स त्या महिलेला परत केली त्या पर्समध्ये सोन्याची चेन अंगठी मोबाईल फोन रुद्राक्ष असा सुमारे सव्वादोन लाखाचा ऐवज होता पर्स परत मिळाल्याने संबंधित महिलेला अश्रू अनावर झाले त्या महिलेने अध्यक्ष सौ शिंदे यांना आशीर्वाद दिले
सौ शिंदे या कराडच्या ऍक्टिव्ह नगराध्यक्षा म्हणून सम्पूर्ण राज्यात परिचित आहेत त्यांच्या कामाचा धडाका वाखाणण्याजोगा असतो त्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल नेहमीच चर्चा होत असते त्याच बरोबर या घटनेमुळे आता त्यांच्या या सतर्कतेचेही कौतुक संपूर्ण शहरातून होत आहे.
No comments:
Post a Comment