Tuesday, February 16, 2021

जिल्ह्यातील पालिका निवडणूका राष्ट्रवादी काँग्रेस लढणार पक्षचिन्हावर - जिल्हाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी दिले स्पष्ट संकेत...

सातारा
 आगामी सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. सर्वच राजकीय पक्ष आपलं पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहेत. 
राष्ट्रवादी देखिल पॅनेल टाकणार असल्याचे सांगत शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीचे दिपक पवार आणि मी स्वत: या निवडणुकीचे नेतृत्व करणार आहोत असे सांगून जिल्ह्यात होणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचिन्हवर लढणार असल्याचे संकेत दिले आहेत.शशिकांत शिंदे यांनी आज बोलावलेल्या जनता दरबार प्रसंगी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दरम्यान आमदार शिवेंद्रराजे भोसले जर राष्ट्रवादीत आले तर ते नगरपालिकेच्या निवडणुकीचे नैतृत्व करतील असं खोचक विधानही शशिकांत शिंदे यांनी यावेळी केले.

 राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात सातारा नगरपालिकेची सत्ता मिळवळण्यासाठी रस्सीखेच सुरु आहे. अशातच भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या राष्ट्रवादीशी जवळीक वाढत असल्याची चर्चा सुरु आहे. त्याचनिमित्ताने आमदार शशिकांत शिंदे यांनी यावर भाष्य केलं असल्याने त्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.
यावेळी नगरपालिकेच्या निवडणुकीचे नैतृत्व कोण करणार असा सवाल शशिकांत शिंदे यांना विचारला असता ते म्हणाले, ”राष्ट्रवादी देखील पॅनेल टाकणार आणि राष्ट्रवादीचे दिपक पवार आणि मी स्वत: या निवडणुकीचे नेतृत्व करणार आहोत. आमदार शिवेंद्रराजे भोसले हे राष्ट्रवादीत आले तर ते नगरपालिका निवडणुकीचे नेतृत्व करतील”, असंही वक्तव्य शशिकांत शिंदे यांनी यावेळी केले आहे.म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी होणाऱ्या जिल्ह्यातील पालिका निवडणूका राष्ट्रवादि काँग्रेस इतर राजकीय पक्षांप्रमाणे पक्षचिन्हावरच लढणार असल्याचे संकेत दिले आहेत.त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष ही निवडणूक पक्षचिन्हवर लढवून आपल्या पक्षाचे अस्तित्व टिकवणे व वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याने या निवडणुकिला विशेष महत्व येणार आहे. संधीसाधू राजकारण दूर ठेवण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षांसह जनतेला देखील पक्षचिन्हवरच ही  निवडणूक हवी आहे.आणि त्यासाठीच शशिकांत शिंदेंनी हे संकेत दिले आहेत.

No comments:

Post a Comment