सातारा दि.24 (जिमाका):जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 35 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 545 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. दरम्यान आज 111 जण नवीन रुग्ण सापडल्याचे रिपोर्ट्स आले आहेत
त्याबाबतची सविस्तर बातमी उद्या...
545 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
जिल्हा रुग्णालय सातारा येथील 26, कराड येथील 84, फलटण येथील 21, कोरेगाव येथील 17, वाई येथील 88, खंडाळा येथील 3, रायगाव येथील 42 , पानमळेवाडी येथील 96, महाबळेश्वर येथील 35, दहिवडी येथील 83, म्हसवड येथील 9 व कृष्णा मेडिकल कॉलेज येथील 41 असे एकुण 545 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
*एकूण नमुने -341299*
*एकूण बाधित -58268*
*घरी सोडण्यात आलेले -55405*
*मृत्यू -1849*
*उपचारार्थ रुग्ण-1014*
00000
कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने
आठवडे बाजार, दुकाने, हॉटेल, मंगल कार्यालय, लॉन्स इ. ठिकाणी कठोर नियम लागु.........
जिल्हाधिकाऱ्यांनी केले आदेश जारी..........
जिल्ह्यात कोविड-19 रुग्णांमध्ये लक्षणीया वाढ होत असून कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले बिुलांश निर्बंध हटवण्यात आले असून विविध सामसाजिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व राजनैतिक व इतर कार्यक्रमात मोठ्या प्रमाणत गर्दी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात रात्रीचे 11.00 वाजेलेपासून ते सकाळी 6.00 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तथापि, राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक व अत्यावश्यक सेवा चालू राहतील. सातारा जिल्ह्यातील आठवडे बाजार, दुकाने, हॉटेल, मंगल कार्यालय, लॉन्स इत्यादी ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे तसेच कोविड-19 च्या अनुषंगाने वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशातील अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. *हॉटेल, रिसॉर्ट,लॉन्स, मंगल कार्यालय इत्यादी ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कोविड-19 च्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेल्या आदेशाचा भंग झाल्यास संबंधित व्यवस्थापन यांचेकडून प्रथमवेळी रक्कम रु. 25 हजार दंड, तसेच दुसऱ्यांदा भंग झाल्यास रक्कम रु. एक लाख दंड व फौजदारी कारवाई करण्यात येईल असे आदेश प्रशासनाने दिलेत.
No comments:
Post a Comment