निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मागील निवडणुकीप्रमाणे फटका बसू नये म्हणून पालिका सभेत गोंधळ घालून मी काहीतरी करतोय असे दाखवत ते केवळ प्रसिद्धीसाठी स्टंट करीत आहेत अशी टीका नगरसेवक विनायक पावसकर यांनी जनशक्तीचे गटनेते राजेंद्र यादव यांचे नाव न घेता आयोजित पत्रकार परिषदेत केली.
शुक्रवारी बजेट ची सभा पार पडली त्यात भाजपा नगरसेवकांवर जनशक्तीने टीका केली होती त्याचे उत्तर देण्यासाठी या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नगराध्यक्षा सौ रोहिणी शिंदे नगरसेवक फारुक पटवेकर,नगरसेविका विद्या पावसकर अंजली कुंभार आदि उपस्थित होते
पावसकर पुढे म्हणाले, जनशक्तीचे बहुमत आहे,सगळ्या समित्या त्यांच्याकडे आहेत,स्टँडिंगमध्ये त्यांचेच लोक अधिक आहेत आमच्या एकच सदस्य म्हणजे नगराध्यक्षा त्यामध्ये आहेत लोकशाहीचे गटनेते सौरभ पाटील ही त्यामध्ये आहेत असे असताना चार बैठका झाल्या त्यात काही चर्चा झाली नाही आणि बजेटमधील विषयांना संमती देण्यात आली त्यावेळी जनशक्तीने बदल सुचवणे किंवा उपसूचना मांडणे कायद्याने गरजेचे होते ते त्यांनी केले नाही आणि बजेट च्या सभेत त्यांनी गोधळ घालत उपसूचना मांडली हा कुठला प्रकार...? आणि ती उपसूचना एका कागदाच्या चिंटूर्यावर लिहून देणे योग्य आहे का...? असा सवाल ही पावसकर यांनी केला.जे विषय बजेट मध्ये घेता येत नाहीत ते घ्या असा दंगा या लोकांनी केला हे अयोग्य आहे.यावरून तुमचा अभ्यास कळतो.प्रीतिसंगम बाग,टाऊन हॉल साठी आलेल्या निधीपैकी किती निधी खर्च झाला? तो योग्य पद्धतीने झाला का? असा सवालही पावसकर यांनी यावेळी केला.मागील अडीच तीन वर्षे कोण किती पालिकेत हजर होते हे सर्वांनाच माहीत असल्याचा टोलाही पावसकर यांनी लगावला.
प्रश्नांची उत्तरे देण्याबाबतीत आम्ही अन्सरेबल नाही असे गटनेते राजेंद्र यादव बजेटच्या सभेत म्हणाले होते त्यावर बोलताना पावसकर म्हणाले असे असेल तर सगळ्या समितीची सभापती पदे तुमच्याकडेच आहेत, तुम्हीच उत्तरे द्यायची असतात आणि तुम्हाला गावच्या प्रश्नावर उत्तरे दयायची नसतील तर सभापती पदे सोडा... मग आम्हीं बघतो काय करायचं ते...
पृथ्वीराज चव्हाण आजही पालिकेला फ़ंडिंग करतील मात्र जनशक्तीला ते चालेल का? असा सवाल करत फारूक पटवेकर म्हणाले मागेही पृथ्वीराज चव्हाणांनी भरभरून निधी दिला मात्र त्यांचे नाव जाणूनबुजून बाजूला राहील अशी व्यवस्था केली गेली.
यावेळी नगराध्यक्षा सौ शिंदे यांनीही नगरसेंवक राजेंद्र यादव व गुंड्याभाऊ वाटेगावकर सौरभ पाटील यांच्यावर टीका केली.
बजेटच्या सभेवेळी गटनेते सौरभ पाटील यांनी आमदार आणि पालकमंत्री यांचेकडे पालिकेकडून निधी का मागितला गेला नाही असा सवाल केला होता त्याचे उत्तर देताना नगराध्यक्षा म्हणाल्या,राज्यात भाजप ची आत्ता असताना आम्ही तुम्हाला कधी बोलावले नाही तर आम्ही स्वतः शहरातील कामांसाठी पाठपुरावा केला त्यासाठी मुंबईला खूपवेळा आम्ही गेलो पालकमंत्र्यांचे पुतणे आत्ता जागे झालेत का.? वास्तविक त्यानी स्वतः शहरासाठी निधी आणायला हवा होता असेही त्या म्हणाल्या.
No comments:
Post a Comment