याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पानवन (ता. माण) येथील धनाजी आबाजी शिंदे व त्यांचे मित्र छुब चव्हाण हे गुरुवार (दि. 25) पासून रविवार (दि. 28) पर्यंत गायब होते. या दोघाना शेखर भगवान गोरे, राजेंद्र उर्फ राजू ब्रम्हदेव जाधव, संग्राम अनिल शेटे, दत्ता घाडगे, राहुल अर्जुन गोरे, वीरकुमार पोपटलाल गांधी व गाडीवरील चालक हरिदास गायकवाड यांनी त्यांच्या ईनोवा गाडी (क्र. एमएच 11 – 7057) मधून जबरदसतीने बसवून कुळकजाई येथील फार्म हाऊस तसेच ठाणे येथील लॉजवर थांबवून ठेवले होते.याबाबत धनाजी आबाजी शिंदे यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यासह वरील सहा जणांवर अपहरणाचा गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास म्हसवड पोलीस करत आहेत.
No comments:
Post a Comment