Friday, February 26, 2021

136 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज तर,176 जण नवीन बाधित आढळले...

सातारा दि.26 (जिमाका):जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 136 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 479 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली
दरम्यान आज 176 अधिक रुग्ण सापडल्याचे रिपोर्ट्स आलेत.
त्याबाबतची सविस्तर बातमी उद्या...

479 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

जिल्हा  रुग्णालय सातारा येथील 40, कराड येथील 62, फलटण येथील 35, कोरेगाव येथील 26, वाई येथील 53, खंडाळा येथील 11, रायगाव येथील 24 , पानमळेवाडी येथील 113, महाबळेश्वर येथील 15, दहिवडी येथील 22, म्हसवड येथील 28, व कृष्णा मेडिकल कॉलेज येथील 50 असे एकुण 479 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

*एकूण नमुने -344134*
*एकूण बाधित -58504*  
*घरी सोडण्यात आलेले -55600*  
*मृत्यू -1851* 
*उपचारार्थ रुग्ण- 1053* 
00000

No comments:

Post a Comment