Monday, February 15, 2021

सहकारमंत्र्यांच्या कारखान्यापासुनच होणार रयत क्रांती संघटनेच्या आंदोलनाचा शुभारंभ...तर सहकारमंत्र्यांचा राजीनामा मागावा लागेल - आमदार सदाभाऊ खोतांचा ना बाळासाहेब पाटील याना इशारा...

सातारा 
साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यात जळगाव येथे रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी वीजबील माफी आणि ऊसाची FRP या प्रमुख मुद्द्यावर सदाभाऊ खोत यांनी शेतकरी मेळाव्यात सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना इशारा दिला आहे..येत्या 15 दिवसात ऊसावरील FRP ची रक्कम कारखान्यांनी दिली नाही तर सहकारमंत्र्यांच्या कारखान्यापासुनच 28 फेब्रुवारीला रयत क्रांती संघटना आंदोलनाचा शुभारंभ करणार असल्याचा इशारा आ.सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.

सदाभाऊ म्हणाले, सहकारमंत्र्यांना माध्यमाच्या माध्यमातून आवाहन करतो की तुम्हाला यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा आहे आणि तुमच्याच सातारा जिल्ह्यातील साखर कारखाने एफआरपी देत नसतील तर सहकारमंत्री म्हणून नैतिक जबाबदारी तुमच्यावर आहे. नाईलाजाने आम्हाला तुमचा राजीनामा मागावा लागेल

आम्ही जर बँकेचे पैसे फेडू शकलो नाही तर आमच्या घराचा आणि जमिनीचा लिलाव निघतो. मग तुम्ही आमच्या उसाचे पैसे देणार नसाल तर तुमच्या घरादाराचे लिलाव काढा आणि आमच्या शेतकऱ्यांचे पैसे द्या असं सदाभाऊ खोत म्हणाले. तसेच ही लढाई आपण साताऱ्यातुन सुरू केली असून महाराष्ट्रभर सुरू राहील असंही सदाभाऊ म्हणाले

No comments:

Post a Comment