अभ्यासू व शहराच्या प्रश्नांची जाण असणारे उपनगराध्यक्ष म्हणून जयवंतदादा परिचित आहेत. अनेकवेळा रोखठोक व स्पष्टपणे मते मांडून आपल्या कामाचा आवाका दाखवत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरल्याचे अनेकानी पाहिले आहे. शहराच्या प्रश्नाबाबत चर्चेत भाग घेऊन उगाचच स्टंट करण्याचा त्यांचा स्वभाव नाही. योग्य विषयावर चर्चा घडवून आणण्यात ते नेहमी अग्रेसर असतात. वर्तमानपत्रातून प्रसिद्धी मिळो न मिळो, दररोज पालिकेत हजर राहून लोकांची कामे करताना ते नेहमीच दिसतात..त्यांनी उपनगराध्यक्ष म्हणन कारकीर्द चोख बजावली आहे. येथील नगरपालिकेतून उचलबांगडी झालेले वादग्रस्त मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्या अनेक भानगडी लोकांसमोर आणत त्यांनी प्रशासनाचा चेहरा वेळोवेळी उघडा पाडला आहे आणि वेळप्रसंगी शहराच्या हितासाठी स्वतः वाईटपणा स्वीकारला आहे. डांगे यांचे कारनामे शहरासाठी कसे व किती घातक आहेत यावर ते वारंवार रोखठोक बोललेही आहेत. शहराच्या प्रश्नांवर भरभरून बोलणारे व प्रशासनाला धारेवर धरणारे जयवंतदादा वेळप्रसंगी आपल्या आघाडीलादेखील घरचा आहेर देत योग्य बाजू घेऊन मग ती विरोधकांची का असेना त्या बाजूने बोलताना अनेक प्रसंगातून दिसले आहेत आता तर विविध कारणाने आघाडीत बिघडी झाल्याची चर्चा असल्याने आघाडीशी पुन्हा जुळवून घेण्याच्या मानसिकतेत जयवंतदादा दिसत नाहीत अशीही त्यांची सडेतोड भूमिका त्यांनी मांडली आहे.विचाराने वागणारे आणि तत्वांची जपणूक करणारे नेते म्हणूनही त्यांची ओळख आहे. राजकारण म्हटलं की... लोकांचा राजकारण्यांकडे बघण्याचा वेगळा ड्रीष्टिकोन असतो मात्र जयवन्तदादासारख्या नेत्यांची संवेदनशीलतेचा आणि माणुसकी याची जनतेतून नेहमीच कदर होत असते. कारण त्यांनाही जनतेच्या भावनांची कदर नेहमीच असते. लॉक डाऊन काळात दादांनी दोन हजार कुटुंबांना अन्नधान्य किटचे वाटप कोणतीही जाहिरातबाजी न करता केलं आहे.लोकांना सर्वतोपरी मदत देण्यासाठी दादा नेहमीच सतर्क व सज्ज असतात.शहराचे जबाबदार नेतृत्व म्हणून त्यामुळेच तर त्यांची ओळख निर्माण झाली आहे. अतिक्रमण मोहिमेत व्यापाऱ्यांच्या झालेल्या नुकसानास मुख्याधिकारी डांगे हेच जबाबदार आहेत असे ठामपणे सांगत धडधडीतपणे त्यांनी व्यापाऱ्यांची बाजू घेतल्याचे सर्वांनीच पाहिले आहे.जो अडचणीत असेल त्याच्या बाजूने दादा नेहमीच उभे राहिले आहेत आणि याच कारणाने दादांना आपल म्हणणारा माणूस त्यांच्यापासून कधीच लांब गेलेला पाहायला मिळत नाही हे त्यांचे वैशिष्ट्य मानले जाते. जनतेचे नेते असलेल्या रोखठोक दादांचा आज वाढदिवस साजरा होत आहे त्यांना खुप खुप शुभेच्छा...
No comments:
Post a Comment