Wednesday, February 24, 2021

कराड नगरपरिषदेच्या वतीने 14 प्रभागांमध्ये पथनाट्याद्वारे जनजागृती...

कराड : नगरपरिषदेच्या वतीने शहरातील 14 प्रभागांमध्ये पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली.  नगरपालिकेने स्वच्छतेत देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. या स्वच्छतेतील सातत्य टिकवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले..

सलग दोन वर्ष स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये कराड नगरपरिषदेने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने राज्य शासन व जिल्हा प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही नियमावली जाहीर केले आहे. या दोन्ही विषयांचा संयुक्तिक विचार करून कराड नगरपरिषदेने नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी पथनाट्याद्वारे 14 प्रभागांमध्ये पथनाट्याचे सादरीकरण करून नागरिकांना स्वच्छ सर्वेक्षणचे महत्व पटवून दिले तर कोरोनापासून बचाव करण्यासाठी घ्यावयाच्या सुरक्षेच्यादृष्टीने माहिती देण्यात आले आहे. 

पथनाट्याद्वारे सादरीकरण होत असताना कराडमधील नागरिकांनी याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. पथनाट्यामध्ये सादर होणारे शब्द न् शब्द कानातमध्ये ग्रहण करून स्वच्छ सर्वेक्षणबाबत दक्ष असल्याचे व   त्याचबरोबर कोरोना प्रादुर्भाव  वाढणार नाही, याची दक्षता घेत आहोत अशी हमी कराडकरांच्या चेहर्‍यावर दिसून येत होती. पथनाट्याला कराड शहरातील आबालवृद्ध, युवा युवती तसेच लहान मुलांनी प्रतिसाद दिला. रस्त्यावरून ये-जा करणार्‍या विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांना व वाहनचालकांना मास्क वापरा हा संदेश प्रामुख्याने दिला जात होता. 

पथनाट्यातील कलाकार सिग्नलवर उभे राहून वाहनधारकांना स्वच्छतेचे धडे व कोरोनाबाबत घ्यावयाची दक्षता सांगितली जात होती. अन्यथा "आपले शहर स्वच्छ ठेवायचे  आणि कोरोनापासून सुरक्षित राहायचे असेल तर सूचनांचे पालन केले पाहिजे, हा संदेश अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. राजा - प्रधान, वासुदेव, पोतराज, मावळे अशा विविध पेहरावामध्ये पथनाट्यातील कलाकारांनी आज कराडमध्ये स्वच्छता व कोरोनाबाबत कराडमधील 14 प्रभागांमध्ये जनजागृती व प्रबोधन केले.

या पथनाट्याचे सादरीकरण व जनजागृतीसाठी मुख्याधिकारी रमाकांत डाके, नगरसेवक हणमंतराव पवार, विजय वाटेगावकर यांच्या मार्गदर्शनानुसार कराड नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी व पथनाट्यातील कलाकारांनी आज दिवसभर कराड शहरातील 14 प्रभागांमध्ये जनजागृती व प्रबोधन केले.

No comments:

Post a Comment