Friday, February 26, 2021

कराड पालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत गटनेते सौरभ पाटील यानी विचारले काही प्रश्न... ; मात्र,ते सोडवण्यासाठी पालिकेचे सत्ताधारी कोण आहेत..? हा पेच अगोदर सुटलाच पाहिजे...

            
अजिंक्य गोवेकर / कराड

येथील पालिकेचे शिलकी अंदाजपत्रक नुकतेच  सादर करण्यात आले.यावेळी लोकशाहीचे गटनेते सौरभ पाटील यांनी योग्य व मुद्देसूद चर्चा घडवून व सत्ताधार्यांना शहराच्या ड्रीष्टीने महत्वाचे प्रश्न विचारून,आपल्या प्रगल्भतेचं दर्शन देत आपली शहराबद्दलची विकासात्मक कळकळही दाखवून दिली .त्यानी जे कोणी सत्ताधारी आहेत ते कसे चुकलेत हे दाखवतच ही सगळी चर्चा केली. मात्र,सत्ताधारी कोण आहे ? हा राजकीय मुद्दा त्यावेळी अचानकपणे बाहेर आला आणि याच मुद्यावर विषय सूचना वाचण्यावरून सभेमध्ये बाचाबाची, हमरीतुमरी झालेली पहायला मिळाली.. सौरभ पाटील यांनी शहरासाठी मांडलेले प्रश्न मात्र त्यामुळे बाजूला पडले.एकूणच या चर्चेच्या माध्यमातून शहराच्या आर्थिक प्रगतीच्या आलेखाला आणखी उंच आखण्याची संधी असतानाही यावेळी सभागृहातील झालेला गदारोळ  दुर्दैवी ठरला...

दोन दिवसांपूर्वी पालिकेचे शिलकी अंदाजपत्रक सादर झाले. सभेच्या प्रारंभी नगरसेवक सुहास जगताप यांनी अंदाजपत्रकाचे वाचन केले. त्यावर भाष्य करत लोकशाही चे गटनेते सौरभ पाटील यांनी हे अंदाजपत्रक सपशेल अपयशी असल्याचे सांगत या मधून शहराच्या आर्थिक नियोजनाचा बोजवारा उडाल्याचे निदर्शनास आणून दिले डोळ्यात अंजन घालणारे भाष्य करीत पालिकेचे सत्ताधाऱ्यांकडून झालेले आत्तापर्यंत चे नुकसान त्यांनी उदाहरणासाहित दाखवून देत पालिकेचा उत्पन्नाचा भाग कसा उभा राहू शकला असता... किंबहुना कसा तो पुन्हा उभा राहू शकतो... याचे यथायोग्य विवरण केले.मात्र त्यांच्या प्रश्नावलीची उत्तरे देण्याची जबाबदारी सत्ताधारी म्हणून कोणी घेतलेली पहायला मिळाली नाही... कारण सत्ताधारी कोण ? यावरून जनशक्ती व भाजपा यांच्यात त्यानंतर जी हमरीतुमरी झाली ती पालिकेच्या इतिहासात नोंद व्हावी अशीच झाली आणि पालिकेच्या अर्थकारणाबाबतचा विचार तिथेच थांबलेला दिसला.
 दरम्यान सभागृहात आपले मत मांडताना  सौरभ पाटील म्हणाले, यावेळचे अंदाजपत्रक होप्लेस आहे .त्यातून काही होप्स दिसत नाहीत.नवीन प्रकल्प आणि उत्पन्नाच्या बाजू यामधून दिसणे गरजेचे होते तेही यामध्ये अजिबात दिसत नाही.होल्डिंग्स चे भाडे गेली दोन वर्षे पालिकेला मिळाले नाही ज्यांनी भाडे थकवले त्यांच्यावर कारवाई नाही हा काय प्रकार आहे...? तसेच करमणूक कर पालिकेने दोन वर्षांपासून वसूल केलेला नाही हेही नुकसान शहराचे नाही का...? पालिकेच्या शहरातील मोकळ्या जागा आहेत त्यापासून पालिकेला काहीच उत्पन्न येत नाही.त्यातून उत्पन्न यावे याचे काही आजतागायत प्रयोजन पालिकेकडून केले गेलेले नाही.रस्त्यावर धूळ खात महिने महिनो ज्या गाड्या उभ्या आहेत त्यांची अडचण असताना त्या गाड्यांवर कोणतीही दंडात्मक कारवाई पालिकेकडून का होत नाही ? हा काय प्रकार आहे...? आमदार, खासदार फँडातून पालिकेकडून शहराच्या विकासासाठी कधीं काही मागणी केली गेली नाही... असे का ? शहराच्या विकासात्मक बदलासाठी सर्वांनी राजकारण सोडून एकत्र काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी बोलून दाखवले.आणि पालिकेचे होत असलेले नुकसान निदर्शनास आणून दिले...
मलकापूर नगरपलिकेचे कौतुक करत त्यांनी त्या नगरपालिकेचा जसा शहराच्या विकासासाठी मंत्रालयीन पाठपुरावा होत असतो तसा कराड शहराचाही झाला पाहिजे... मग तो का झाला नाही...? असा सवालही त्यांनी यावेळी केला...आणि या सर्व त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळण्याची अपेक्षा सत्ताधाऱ्याकडून असल्याचे त्यांनी यावेळी बोलून दाखवले...  त्याचवेळी पालिका सभेत सूचना कोणी वाचली पाहिजे ? नेमकं सत्ताधारी कोण ? यावरून जनशक्ती आणि भाजपाच्या नगरसेवकांमध्ये वादावादी झाली आणि याच विषयाच्या अनुषंगाने नवीन वादाला तोंड फुटले..यावरून मोठी बाचाबाचीदेखील झालेली पहायला मिळाली...गदारोळ झाला..तू तू मै मै झाली...आम्हीच कसे बरोबर हे तिथे असलेल्या उपस्थित पत्रकारांना दाखवण्याचा  प्रयत्नही झालेला पहायला मिळाला...मात्र  पालिकेच्या उत्पन्नासाठीचे उपाय...आणि त्याबाबतचे प्रश्न महत्वाचे असतानाही त्याची उत्तरे त्याठिकाणी मिळाली नाहीत...पालिकेच्या आर्थिक उन्नतीचा विचार होणे त्यावेळी गरजेचे होते, चर्चा गरजेची होती... या सभेवेळी कोणतेही राजकारण होणे अपेक्षित नव्हते...ते कोणी? ,का? कशासाठी? केले हे ज्याचे त्यांनाच ठाऊक ? पण हे सगळे दुर्दैवी झाले...शहराच्या चार वर्षाच्या कारभारानंतर एका  विरोधी गटनेत्याला शहरातील एवढे प्रश्न दिसतात... याची उत्तरे कधी मिळायची ? या प्रश्नाच्या उत्तरामध्ये जर पालिकेचा आर्थिक फायदा होत असेल तर ती उत्तरे मिळणे महत्वाचे नाही का ?  हे प्रश्न गेल्या 4 वर्षात का नाही सुटले  ? का आजतागायत अनुत्तरित राहिले..?  अशा अनेक प्रश्नावली शहरातील लोकांसमोर तात्यांनी या सभेच्या निमित्ताने उभ्या केल्या आहेत... याची उत्तरे सत्ताधाऱ्यांकडून सौरभ तात्यांना हवी आहेत...
झालेल्या सभेत ती मिळाली नाहीत...गदारोळात विषयच डायव्हर्ट झाला एवढेच जाणवले... दरम्यान वरील प्रश्नांची उत्तरे  मिळण्यासाठी पालिकेतील सत्ताधारी... आहे तरी नेमकं कोण ? याचाही खुलासा आता होणे गरजेचे आहे. 

1 comment: