कराड मध्ये विमान प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याच्या अनुषंगाने माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण व विमान उड्डाण अकॅडमीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी कराड विमानतळाची पाहणी केली. येत्या दोन महिन्यात कराड मध्ये विमान प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
शुक्रवारी पहिल्या दिवशी प्रशिक्षणासाठी एक विमान दाखल झाले असून दोन दिवसात आणखी एक विमान दाखल होत असल्याचे अकॅडमीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रशिक्षणासाठी एकूण 8 विमाने असतील 60 विद्यार्थ्याची एक बॅच असेल. भारतात या पद्धतीची 10 विमान प्रशिक्षण केंद्र असून महाराष्ट्रात हे दुसरे केंद्र असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले
यावेळी अकॅडमीचे सीईओ परवेज दमानिया, डायरेक्टर अश्विन अडसूळ, मनोज प्रधान, विनोद मेनन, विलास वरे यांच्यासह काँग्रेसचे कराड दक्षिण अध्यक्ष मनोहर शिंदे, कराड शहर अध्यक्ष राजेंद्र माने, इंद्रजीत चव्हाण, नगरसेवक इंद्रजीत गुजर, पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment