कराड, प्रतिनिधी : प्राथमिक आरोग्य केंद्र ते ग्रामीण रुग्णालय असा आरोग्य विभागाचा मूलभूत पाया रचण्याची अभूतपूर्व कामगिरी केंद्रातील यूपीए काँग्रेस सरकारने केली होती. देशातील आरोग्याची मूलभूत सुविधा भक्कम असल्याने आपण कोरोनाच्या महामारीला यशस्वीपणे तोंड दिले. असे सांगून कोरोनानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकारने खर्च आणि उत्पन्न याचा मेळ घालत आणला आहे. त्याचबरोबर पुरोगामी विचार वाचवण्यासाठी हे तिन्ही पक्ष एकत्र काम करत आहेत. असे मत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
पोतले (ता. कराड) येथे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून एक कोटी पाच लाख रुपये खर्चातून उभारण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे उदघाटन व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. रयत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील-उंडाळकर, प्रदेश काँग्रेसचे प्रांतिक सदस्य अजितराव पाटील-चिखलीकर, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, युवा नेते इंद्रजित चव्हाण, प्रा. धनाजी काटकर, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले, सदस्या मंगलताई गलांडे, पंचायत समिती सदस्या नंदाताई यादव, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगिता देशमुख, वैधकीय अधिकारी डॉ. सुनिता थोरात, डॉ. हर्षाली जगताप, जिल्हा काँग्रेसचे चिटणीस राजेंद्र चव्हाण, मलकापूर नगरपालिकेचे बांधकाम सभापती राजेंद्र यादव, कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोकराव पाटील-पोतलेकर, रयत कारखान्याचे माजी संचालक विलासराव पाटील-पोतलेकर, कराड उत्तर सेवादल काँग्रेसचे अध्यक्ष उमेश साळुंखे, शाखा अभियंता सुनील म्हेत्रे, आनंदराव कोळी, येरवळेचे सरपंच सुभाषराव पाटील, तानाजीराव घारे, अधिकराव गरुड, पोतलेच्या सरपंच वैशाली माळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. चव्हाण म्हणाले, पोतलेच्या विकासासाठी भरघोस निधी दिला आहे. विकासाची भूक थांबवू नका. तुम्ही विकासकामे आणखी मागा. मी ती देत राहीन. गाव आणि गावाचा विकास हे उद्धिष्ट पोतलेकरांनी ठेवले आहे, हे अभिनंदनीय आहे. आरोग्य उपकेंद्राचे देखणे व सुबक काम झाले आहे. त्याची सर्वांनी मनोभावे जपणूक करावी.
उदयसिंह पाटील म्हणाले, आगामी निवडणुकात काँग्रेसची ताकद दुसऱ्यांकडे गहाण ठेवल्यास विरोधक आपणास देशोधडीला लावतील. व्यक्तिगत स्वार्थासाठी कुणाबरोबर न जाता काँग्रेसचा विचार आणि विकासाला साथ देणाऱ्या नेत्यांबरोबर रहा. विलासकाका व पृथ्वीराज बाबा यांनी मतदारसंघातील सरंजामशाही प्रवृत्तींना बाजूला ठेवण्यासाठी मतदारसंघात पायाभूत सुविधा व वैचारिक विकास केला आहे.
मनोहर शिंदे म्हणाले, बाबांच्यामध्ये मोठा निधी आणण्याची प्रचंड क्षमता आहे. कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज बाबांचा सर्वाधिक निधी वांग खोऱ्यासाठी मिळाला आहे. पोतलेच्या विकासाचा इतर गावांनी आदर्श घ्यावा.
अजितराव पाटील म्हणाले, विलासकाकांनी आदर्श आमदार म्हणून काम केले. आता पृथ्वीराज बाबांनी आदर्श उभा केला आहे. लबाडाचे निमंत्रण जेवल्याशिवाय खरे नाही. अशी विरोधकांची अवस्था आहे. त्यामुळे आपण सर्वांनी पृथ्वीराज बाबा आणि उदयदादांच्या मागे चालायचे आहे.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य व माजी सदस्य तसेच कोरोना यौध्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. आबासाहेब पवार, अशोकराव पाटील, शंकरराव खबाले यांची भाषणे झाली. सरपंच वैशाली माळी, माजी सरपंच रामचंद्र पाटील, दिलीप शिंदे, अशोकराव पाटील-पोतलेकर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष निलेश पाटील, मानसिंग पाटील, लता पाटील, सुनिल पाटील, धनाजी शिंदे, विजय पाटील, अनिल माळी यांनी स्वागत केले. अंकुश नांगरे यांनी प्रास्ताविक व दिलीप शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. संतोष पवार यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment