Tuesday, November 30, 2021

कोरोना लसीकरण प्रमाणपत्राशिवाय प्रवाशांची वाहतूक करु नये...

सातारा दि. 30 (जिमाका) :   सार्वजनिक, खाजगी वाहनातून प्रवास करण्यासाठी 18 वर्षावरील सर्व वाहन चालक-मालक व प्रवासी यांनी त्यांचे कोविड लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे. तरी सातारा  जिल्ह्यातील सर्व खाजगी, सार्वजनिक प्रवासी वाहन सेवा (ऑटोरिक्षा,टॅक्सी,बस,जीप टाईप वाहने इत्यादी) पुरविणाऱ्या सर्व वाहन चालक-मालक यांनी  कोरोना लसीकरण प्रमाणपत्राशिवाय प्रवाशांची वाहतूक करु  नये, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी केले आहे.
सार्वजनिक वाहनातून पुरविणाऱ्या वाहन मालकांनी कोविड अनुरुप वर्तनाचे पालन न केल्यास कसूर करणाऱ्या व्यक्तींना 500/- रुपये इतका दंड व सेवापुरवठादार यांना 500/- रुपये इतका दंड आकारण्यात येईल. तसेच बसेसच्याबाबतीत कसूरीच्या प्रत्येक प्रसंगी 10 हजार  रुपये इतका दंड आकारण्यात येईल. वारंवार कर्तव्यात कसूर होत असेल तर कोविड-19 ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत मालक, एजन्सीचे  लायसन्स काढून घेण्यात येईल किंवा तिचे परिचालन किमान दोन दिवस बंद करण्यात येईल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी  विनोद चव्हाण यांनी  कळविले आहे.
0 0 0 0

सातारा जिल्ह्यात 17 बाधीत,38 डिस्चार्ज

सातारा दि (जिमाका)
 जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
 जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 17 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 0 जणांचा मृत्यू झाला आहे तर 
38 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 5 खंडाळा 0 खटाव 2 कोरेगांव 0 माण 0 महाबळेश्वर 1  पाटण 1 फलटण 2 सातारा 5 वाई 0 व इतर 0 आणि नंतरचे वाढीव 1 असे  आज अखेर एकूण 17 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... 
आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 38 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

Monday, November 29, 2021

डॉ अतुलबाबा म्हणाले होते...आम्ही कराड पालिकेची निवडणूक विक्रम पावसकर यांच्या नेतृत्वात लढू...मी कार्यकर्ता म्हणून काम करेन...या वक्तव्याचा अर्थ जिल्हा बँकेच्या निकालानंतर स्पष्ट झाला आहे !

वेध माझा ऑनलाइन
कराड
काही दिवसांपूर्वी येथील विश्रामगृह येथे भाजपा ची पत्रकार परिषद पार पडली त्यामध्ये नेते डॉ अतुल भोसले म्हणाले होते की होणारी पालिका निवडणुक आम्ही शेखर चरेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या नेतृत्वात लढू आणि आपण मात्र कार्यकर्ते म्हणून या निवडणुकीत काम करू...या त्यांच्या बोलण्याचा अर्थ त्यावेळी कोणालाच कळला नाही मात्र जिल्हा बँकेची निवडणूक झाली आणि त्यांच्या "या' बोलण्याचा अर्थ उघड झाला...! 

गेल्या काही दिवसांपूर्वी येथील भाजपा ची पत्रकार परिषद पार पडली त्यावेळी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी शहरात होणाऱ्या पालिका निवडणुकीत पक्षचिन्हवरच आम्ही सर्व जागा लढवणार आहोत असे जाहीर केले त्यावेळी बोलताना भाजपा चे राज्याचे पदाधिकारी डॉ अतुल भोसले म्हणाले ही निवडणूक चरेगावकर यांचे मार्गदर्शनाखाली व विक्रम पावसकर यांच्या नेतृत्वाखाली होईल मात्र आपण या निवडणुकीत एक कार्यकर्ता म्हणून सहभागी असू...ते असे का बोलले हा प्रश्न त्यावेळी फारसा कोणाला पडला नाही...ते प्रत्येकाला आदराने नेहमीच बोलताना दिसतात, समोरच्या व्यक्तीला मोठेपणा देतात तशा अर्थाने ते चरेगावकर व पावसकर यांचे नाव घेऊन बोलले असावेत असे त्यावेळी वाटले... याच पत्रकार परिषदेतून नामदार बाळासाहेब आम्हाला सन्माननीय आहेत असेही ते म्हणाले होते त्यानंतर झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निकालाने त्यांच्या बोलण्यामागचे सगळे इरादे स्पष्ट झाले आणि त्यातून होणाऱ्या पालिका निवडणुकीतून भोसले गटाने शहरात आपली फळी आणखी मजबूत करणारी गणिते आखली असल्याचे उघडही झाले
 
केवळ भाजपाच्या माध्यमातून आपण फारसे शहरात मजबूत होऊ शकत नाही शहरात भाजपाचा दुसरा गट म्हणजे पावसकर गट देखील कार्यरत आहे त्यामुळे आपली ताकद राजकीय तडजोडीतूनच शहरात वाढवण्याचे त्यांचे गणित दिसते आहे आणि तसे झाल्यास या निवडणुकीतून त्यांना भाजपा च्या माध्यमातून अधिक पुढे पुढे करता येणार नाही स्थानिक गट किंवा इथल्या एखाद्या ताकदी बरोबर आपल्या गटाचे जुळवून घ्यायचं झालं तर त्यांचेच विरोधक म्हणून या निवडणुकीत त्यांना समोरासमोर येता येणार नाही उमेदवार निवडीबाबत देखील आपले कार्यकर्ते काहीजण भाजपा मधून तर काही तडजोड झालेल्या गटातूनदेखील त्यांना उभे करता येणार आहेत  दोन्ही बाजूने आपले लोक त्यांना पालिकेत निवडून आणून देत आपली ताकद शहरात आणखी वाढवता येणार आहे झालेल्या विधानसभेसाठी त्यांना शहरातून म्हणावे असे मतदान मिळाले नाही त्यासाठी त्यांना येथील स्थानिक नेत्यांवर अवलंबून रहावे लागले त्यांचा स्वतःचा असा गट शहरात नाही त्यामुळे केवळ काही मतात ते हारले मात्र ग्रामीण मतात ते मजबूत आहेत भविष्यात तडजोड झालेल्या शहरातील एखाद्या गटातून व दुसरीकडे  पक्षाच्या माध्यमातून पालिकेत त्यांचे विश्वासू सरकारी निवडून गेले तर त्यांना ही बेरीज नक्कीच फायदेशीर ठरणार आहे आणि महत्वाचे म्हणजे शहरातील पुढाऱ्यांवर त्यांना अवलंबून रहावे लागणार नाही शिवाय भाजपाच्या शहरातील दुसऱ्या गटाला ते यातून आपला शह देऊ शकतात भाजपाच्या या गटाशी त्यांचे फारसे सख्य नाही याची चर्चा शहरात नेहमीच असते एकूणच त्यांच्या या बेरजेच्या राजकारणाचे गणित व अर्थ पत्रकार परिषदेतील त्यांच्या बोलण्यामागे होता हे आता स्पष्ट झाले आहे म्हणूनच झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून नामदार पाटील यांना मदत करत भोसलेंनी पालिका निवडणुकीसह भविष्यातील एकूणच राजकारणाच्या गणिताची मुळे आणखीनच घट्ट केली आहेत 

डॉ अतुलबाबा यांनी शहरातील राजकारणात आपली राजकीय एन्ट्री धक्कादायक पद्धतीने केल्याचा इतिहास आहे ही दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे... त्यावेळी निवडून येऊन नगरसेवक अल्ताफ शिकलगार,रामभाऊ कोळी यांनी अचानकपणे आम्ही डॉ अतुलबाबांचे नेतृत्व मानतो असे एका पत्रकार परिषदेतून सांगून शहराच्या राजकारणात खळबळ माजवून दिली होती त्यातूनच दक्षिणचे  आमदार होण्यासाठी अतुलबाबा आपली पाऊले टाकत होते त्याकरिता शहरातून आपला मजबूत गट निर्माण करणे त्यांना गरजेचे होते त्यासाठी शहरात एन्ट्री करणेही त्यांना त्यावेळी महत्वाचेही होते होते तेच त्यांनी केले राजकारणात प्रत्येकाला आपला गट किंवा पक्ष मोठा करण्याचा अधिकार आहे आणि त्यानुसार ते आजही प्रयत्नशील दिसतात मात्र केवळ भाजपा म्हणून त्यांना कराड दक्षिण व शहरामध्ये मजबूत होणे फारसे शक्य नाही त्यांना स्वतःची ताकद तयार करावी लागेल त्यासाठी राजकीय तडजोडीदेखील त्यांना केल्याचं पाहिजेत त्यांना त्या महत्वाच्या आहेत कारण विरोधकांची ताकद व पक्षांतर्गत विरोध याला पार करून त्यांना दक्षिणेत मजबूत व्हायचं आहे त्यांनी आपली ग्रामीण राजकीय ताकद जबरदस्त मजबूत केली आहे तश्याच प्रकारची फळी शहरातून तयार झाल्यास त्यांना आमदारकी दूर नाही...याचाच सारासार विचार करून सध्या त्यांच्या नामदार गटाबरोबर होणाऱ्या "कोंप्रमाईज'च्या हालचाली यशस्वी होताना दिसतायत त्याकरिता नामदार गट देखील पुढाकार घेताना दिसतोय त्यांनी एकमेकाला कृष्णा कारखाना तसेच जिल्हा बँकेत मदत करत भविष्यातील आपल्या राजकीय एकत्रिकरणाचे संकेतही दिले आहेत ही कराड शहर व दक्षिणेत होणाऱ्या नवीन राजकारणाच्या नांदीची चाहूलच  असल्याचे मानलं जातंय नामदार पाटील जिल्हा बँकेवर निवडून गेले त्यावेळी भोसलेंनी त्यांचा सत्कार केला त्यावेळी बोलताना डॉ सुरेश भोसले यांनी यापुढे आम्ही नामदार पाटील यांना सर्व सहकार्य करणार आहोत असे राजकीय वचनदेखील जाहीर भाषणातून दिले आहे...एकूणच या सगळ्या बेरजेच्या राजकारणाचे गणित मांडूनच पालिका निवडणुकीत पावसकर नेतृत्व करतील... मी फक्त कार्यकर्ता म्हणून काम करेन असे भोसले म्हणाले असावेत का ? याचीच चर्चा आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्याकरिता आता नव्याने आदेश ; 30 नोव्हेम्बर पासून होणार लागू...

वेध माझा ऑनलाइन
सातारा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्याकरिता जिल्हा प्रशासनातर्फे नव्याने आदेश पारित केले आहेत ते आदेश 30 नोव्हेंबर पासून लागू राहणार आहेत.... जारी केलेले नियम पुढीलप्रमाणे आहेत... 

१. अनुरूप पालन :

राज्य शासनाने व केंद्र सरकारने वेळोवेळी निर्धारित केलेल्या कोविड अनुरूप वर्तनाचे सेवा प्रदाते, परिवास्तूंचे मालक, परवानाधारक, आयोजक, इत्यादींसह सर्वांनी तसेच सर्व अभ्यागत, सेवा घेणारे ग्राहक, अतिथी, इत्यादींनी काटेकोर पालन केले पाहिजे. कोविड अनुरूप वर्तनाची तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे तसेच त्याचे उल्लंघन केल्यास करावयाचे दंड, कोविड अनुरूप वर्तनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि यात यापुढे नमूद केलेल्या दंडानुसार असेल .

२. संपूर्ण लसीकरण :

 तिकीट असलेल्या किंवा तिकीट नसलेल्या कोणत्याही कार्यक्रमाच्या समारंभाच्या किंवा प्रयोगाच्या आयोजनाशी संबंधित असलेल्या सर्व व्यक्ती तसेच सर्व सेवा प्रदाते व सहभागी होणाऱ्या व्यक्ती अभ्यागत, पाहुणे, ग्राहक यांचे, यात यापुढे दिलेल्या व्याख्येनुसार, संपूर्ण लसीकरण केलेले असावे.

जेथे जनतेतील कोणत्याही व्यक्तींना येण्याचा आणि सेवा घेण्याचा हक्क आहे असे कोणतेही दुकान, आस्थापना, मॉल, समारंभ, संमेलन इत्यादी ठिकाणी , संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींद्वारे व्यवस्थापन केले पाहिजे आणि अशा ठिकाणी येणारे सर्व अभ्यागत, ग्राहक यांचे संपूर्ण लसीकरण झालेले असावे. लसीकरण झालेले असेल तरच सुविधा पुरविण्यात याव्यात. 

 सर्व सार्वजनिक परिवहन सेवांमध्ये, संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच परवानगी असेल.

राज्य शासनाने तयार केलेला युनिव्हर्सल पास हा संपूर्ण लसीकरण झाल्याच्या स्थितीचा वैध पुरावा असेल. अन्यथा, छायाचित्र असलेले वैध ओळखपत्र असलेले कोबिन प्रमाणपत्र देखील त्यासाठी वैध पुरावा मानले जाईल. १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या नागरिकांसाठी, इतर शासकीय संस्थेने किंवा शाळेने दिलेले छायाचित्र ओळखपत्र आणि वैद्यकीय कारणांमुळे ज्या व्यक्ती , लस घेऊ शकत नाहीत त्या व्यक्तींसाठी, प्रमाणित वैद्यकीय व्यावसायिकाकडील प्रमाणपत्र प्रवेशासाठी कागदोपत्री पुरावा म्हणून वापरता येईल.

जेथे सर्वसामान्य जनतेतील कोणतीही व्यक्ती भेट देत नाही अशी कार्यालये व इतर आस्थापना तसेच खाजगी परिवहन सेवा यांच्यासाठी संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी त्या खुल्या असण्याची शर्त नसली तरी, त्यांना देखील संपूर्ण लसीकरण करणे आवश्यक आहे.

जेथे सर्वसामान्य जनतेतील कोणतीही व्यक्ति कामानिमित्त भेट देते अशा शासकीय, निमशासकीय, खाजगी  कार्यालय यांच्यासाठी संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तिंनाच परवानगी असेल.  

३. प्रवास :

कोणत्याही आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थानावरून राज्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांचे, या बाबतीतील भारत सरकारच्या निदेशांद्वारे विनियमन करण्यात येईल. राज्यात येणाऱ्या सर्व देशांतर्गत प्रवाशांचे, एकतर यात यापुढे व्याख्या केल्यानुसार संपूर्ण लसीकरण केले जाईल किंवा 72 तासांसाठी वैध असलेले आरटी-पीसीआर चाचणी प्रमाणपत्र ते बाळगतील.

४.  कार्यक्रम, समारंभ,व उपस्थितीवरील निर्बंध :

चित्रपट गृह, नाट्यगृह, मंगलकार्यालय, सभागृह, इत्यादी बंदिस्त/बंद जागेत घेण्यात येणा-या कोणत्याही कार्यक्रमाच्या/समारंभाच्या/उपक्रमाच्या बाबतीत, जागेच्या क्षमतेच्या 50 टक्के लोकांना परवानगी दिली जाईल.

 संपूर्ण खुल्या असलेल्या  जागांच्या बाबतीत, कोणत्याही समारंभासाठी किंवा संमेलनांसाठी तेथील जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के लोकांना परवानगी दिली जाईल. संमेलनाच्या किंवा समारंभाच्या अशा ठिकाणांच्या बाबतीतील क्षमता, औपचारिकपणे आधीच निश्चित केलेली नसेल तर संबंधित जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास अशी क्षमता ठरविण्याचा  अधिकार असेल .

जर वरील नियमांनुसार कोणत्याही संमेलनासाठी  उपस्थित असलेल्या एकूण लोकांची संख्या 1 हजारांपेक्षा अधिक असेल तर, अशा बाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला  त्याची माहिती द्यावी लागेल आणि स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अशा कोणत्याही संमेलनाचे निरीक्षक म्हणून पर्यवेक्षण करण्यासाठी त्यांचे प्रतिनिधी पाठविल. आणि तेथे वर नमूद केलेल्या नियमांचे काटेकोरपणे अनुपालन केले जात असल्याची खात्री करतील. कोविड -19 च्या प्रसाराचा धोका लक्षात घेता, तेथे कोविड अनुरूप वर्तनाचे उल्लंघन होत असलेचे दिसून आले तर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या उक्त प्रतिनिधीला कार्यक्रम पूर्णत:  किंवा अंशत: बंद करण्याचे आदेश देण्याचा प्राधिकार असेल.

 नेहमी योग्य पद्धतीने मास्क परिधान करा. नाक व तोंड नेहमी मास्कने झाकलेले असले पाहिजे. (रुमालाला , मास्क समजले जाणार नाहि)
जेथे जेथे शक्य असेल तेथे, नेहमी सामाजिक अंतर  राखा.
साबणाने किंवा सॅनिटायझरने वारंवार व स्वच्छपणे हात स्वच्छ धुवा.
साबणाने हात न धुता किंवा सॅनिटायझर न वापरता, नाक/डोळे/तोंड यांना स्पर्श करणे टाळा.
योग्य श्वसन स्वच्छता राखा.
पृष्ठभाग नियमितपणे आणि वारंवार स्वच्छ व निर्जंतुक करा
खोकताना किंवा शिंकताना, टिश्यू पेपरचा वापर करून तोंड व नाक झाका आणि वापरलेले टिश्यू पेपर नष्ट करा. जर एखाद्याकडे टिश्यू पेपर नसेल तर त्याने स्वतःचा हात नव्हे तर, हाताचा वाकवलेला कोपर नाका तोडांवर ठेवून खोकावे व शिंकावे.
सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.
सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळा आणि सुरक्षित अंतर राखा.
कोणालाही शारीरिक स्पर्श न करता नमस्कार करा.

कोविड-19 विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी आवश्यक असलेले अन्य कोणतेही तर्कसंगत वर्तन.
 या नियमांनुसार पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला, असा कसूर केल्याच्या प्रत्येक प्रसंगी , रुपये 500/- इतका दंड करण्यात येईल.
 संस्थेच्या किंवा आस्थापनेच्या कोणत्याही ( जागेत जर एखाद्या व्यक्तीने कसूर केल्याचे दिसून आले तर, त्या व्यक्तीवर दंड लादण्याव्यतिरिक्त, अशा संस्थांना किंवा आस्थापनांना सुद्धा रुपये 10,000/- इतका दंड करण्यात येईल. जर कोणतीही संस्था किंवा आस्थापना तिचे अभ्यागत, ग्राहक, इत्यादींमध्ये कोविड अनुरूप वर्तन विषयक शिस्त निर्माण करण्याची सुनिश्चित करण्यात नियमितपणे कसूर करीत असल्याचे दिसून आले तर, एक आपत्ती म्हणून कोविड-१९ ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत, अशी संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल.
एखाद्या संस्थेने किंवा आस्थापनेने स्वत: च कोविड अनुरूप वर्तनाचे किंवा प्रमाण कार्यचालन कार्यपद्धतीचे पालन करण्यात कसूर केली तर, ती, प्रत्येक प्रसंगी, रूपये 50,000/- इतक्या दंडास पात्र असेल. वारंवार कसूर केल्यास, एक आपत्ती म्हणून कोविड-19 ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत ती संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल .
 कोणत्याही टॅक्सीमध्ये किंवा खाजगी वाहतूक करणा-या चारचाकी वाहनात किंवा कोणत्याही बसमध्ये, कोविड अनुरूप वर्तनात कसूर केली जात असल्याचे आढळून आले तर, कोविड अनुरूप वर्तनात कसूर करणाऱ्या व्यक्तींना, रूपये 500/- इतका दंड करण्यात येईल, तसेच सेवा पुरविणारे वाहनचालक, मदतनीस, किंवा वाहक यांना देखील रूपये 500/- इतका दंड करण्यात येईल. बसेसच्या बाबतीत, मालक परिवहन एजन्सीस, कसुरीच्या प्रत्येक प्रसंगी, रुपये 10,000/- इतका दंड करण्यात येईल. वारंवार कसूर केल्यास, एक आपत्ती म्हणून कोविड-19 ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत मालक एजन्सीचे लायसन काढून घेण्यात येईल किंवा तिचे परिचालन बंद करण्यात येईल.

कोविड अनुरूप वर्तणुकी संबंधीच्या वर नमूद केलेल्या नियमांचे, अनिवार्यपणे पालन करण्यात येईल आणि त्यांचे उल्लंघन केल्यास, वर नमूद केल्यानुसार दंड व शास्ती करण्यात येईल तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ नुसार कोणत्याही आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे, उल्लंघन करणान्यांवर इतर कोणताही दंड किंवा शास्ती लादता येईल. कोविड अनुरूप वर्तनाचे नियम/धोरणे, वरील प्रमाणे असतील आणि त्यामध्ये विशेषरित्या नमूद न केलेले कोविड अनुरूप वर्तनाशी संबंधित असणारे इतर कोणतेही विषय/मुद्दे, या कार्यालयाकडून काढणेत आलेल्या व अंमलात असलेल्या  प्रचलित आदेशांनुसार असतील .

कंटेंटमेंट झोन बाबत संबंधित उपविभागीय अधिकारी हे ज्या ज्या वेळी स्वतंत्र आदेश काढूनहा झोन जाहीर करतील व सदर क्षेत्रामध्ये जे निर्बंध लागू करतील ते आदेश त्या क्षेत्रास लागू राहतील.
या आदेशाची अंमलबजावणी पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय दंडाधिकारी, तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी नगरपालिका,नगरपरिषद नगरपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था व सर्व संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी करावी. अंमलबजावणी करण्यास संबंधीतांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा अन्वये दंडनीय कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे 

आज सातारा जिल्ह्यात 14 बाधीत,6 डिस्चार्ज...

सातारा दि (जिमाका)
 जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
 जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 14 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 0 जणांचा मृत्यू झाला आहे तर 
6 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 2 खंडाळा 1 खटाव 2 कोरेगांव 0 माण 1 महाबळेश्वर 0  पाटण 0 फलटण 2 सातारा 5 वाई 0 व इतर 1 आणि नंतरचे वाढीव 0 असे  आज अखेर एकूण 14 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... 
आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 6 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

सातारा जिल्ह्यात मुसळधारची शक्यता! ; यलो अलर्ट जारी...

कराड
वेध माझा ऑनलाइन
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात सर्वत्र ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. तसेच अरबी समुद्रात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात अवकाळी पाऊस कोसळला आहे. अवेळी पडणाऱ्या या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार होतं आहे. याचा जबरदस्त फटका रब्बी पिकांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
दरम्यान कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे.

हवामान खात्याने पुण्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने पुण्यासह, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे, औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि सध्या दक्षिण अंदमान समुद्रात निर्माण होत असलेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार होत आहे. त्यामुळे तीन डिसेंबर पर्यंत राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.




राज्यात निर्बंध लावायचे की नाही...उद्धव ठाकरे पंतप्रधानांशी बोलून ठरवणार...


वेध माझा ऑनलाइन
जगातील अनेक देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा फैलाव होत असल्याने अनेक देशात निर्बंध लावण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ओमिक्रॉनवर चर्चा करण्यात आली. यावेळी राज्यात निर्बंध लावावे की लावू नये? नवी नियमावली काय असेल? यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली. तसेच या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा करावी असंही ठरलं. त्यामुळे ओमिक्रॉनचा फैलाव रोखण्यासाठी काय नियमावली असावी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लवकरच पंतप्रधानांशी बोलणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. तब्बल तासभर ही बैठक सुरू होती. नव्या व्हेरियंटबाबत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. या बाबतची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. यावेळी सर्वच मंत्र्यांनी नव्या नियमावलीबाबत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी चर्चा करण्याची सूचना केली. मुख्यमंत्र्यांनीही ही सूचना मान्य केली असून ते लवकरच मोदींशी या विषयावर चर्चा करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
दुबईने 13 देशातील येणाऱ्या विमानांबाबत आणि प्रवाशांबाबत जी नियमावली केली आहे. तशाच प्रकरे महाराष्ट्रामध्ये देखील नियमावली असावी याबाबतही आजच्या बैठकीत चर्चा झाली. ही नियमावली तपासून योग्य तो निर्णय घेतला जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

दरम्यान, या बैठकीत शाळा सुरू करण्याबाबत चर्चा झाली नाही. या बाबतचा निर्णय आरोग्य विभागाने घेण्याच्या सूचना करण्यात आल्या. देशातील कोरोनाची परिस्थिती, ओमिक्रॉनचा संभाव्य धोका आणि बदलते हवामान याचा विचार करूनच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, राज्य सरकारने येत्या 1 डिसेंबरपासून राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. शाळा सुरू होण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी असतानाच ओमिक्रॉनच्या धोक्याची चाहूल लागल्याने आता शाळा सुरू करण्याबाबतच्या निर्णयाचा फेरविचार होणार आहे. येत्या दोन दिवसात हा निर्णय होणार असल्याने त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Sunday, November 28, 2021

कोविडच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा - केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला निर्देश...

मुंबई दि 28: कोविडच्या दोन्ही लाटांचा आपण चांगला मुकाबला केला आहे, मात्र आता या विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे आव्हान चिंता वाढवणारे असून याची घातकता लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीत संसर्ग वाढू नये म्ह्णून मुंबईसह सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने अतिशय काळजी घ्यावी. परत एकदा संसर्गाचा वाढ झाली तर लॉकडाऊनसारखे पाऊल परवडणारे नाही, त्यामुळे परत लॉकडाऊन लागू द्यायचा नाही या निर्धाराने  नियमित मास्क वापरणे, अनावश्यक गर्दी न करणे, सुरक्षित अंतर पाळणे अशी काही बंधने पाळावीत लागतील असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लसीचे दोन्ही डोस प्रत्येकाने घेणे, विशेषतः विमानतळावरून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत प्रवाशांची काटेकोर चाचणी करणे यादृष्टीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले. यासंदर्भात केंद्राकडून येणाऱ्या सूचनांची वाट न पाहता युद्धपातळीवर जे जे गरजेचे वाटते ते निर्णय घेऊन आवश्यक पाऊले लगेच टाकावीत असेही त्यांनी स्पष्ट केले. 

आपल्या सर्वांमधीलच बेसावधपणा वाढला आहे. "कुछ नही होता यार" असा पवित्रा मोठ्या संकटात टाकू शकतो असे सावधगिरीचे बोल सांगून मुख्यमंत्री म्हणाले की मास्क न वापरणे आणि नियम तोडून अनावश्यक गर्दी करणे यावर काटेकोर कारवाई झालीच पाहिजे असे पहा. 

करोना विषाणूच्या ओमायक्रॉन या नव्या उत्परिवर्तित प्रकारामूळे संसर्गाचा धोका वाढणार असून त्याला प्रतिबंध घालण्यासाठी कुठल्या उपाययोजना करता येतील याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, राज्याच्या टास्क फोर्सचे डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी, डॉ राहुल पंडित, डॉ अजित देसाई, डॉ खुस्राव्ह बजान, डॉ केदार तोरस्कर, डॉ झहीर अविराणी , डॉ वसंत नागवेकर, डॉ नितीन कर्णिक, मुख्य सचिव सीताराम कुंटे, प्रधान सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदींची उपस्थिती होती.

राज्य सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली, यामध्ये प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांचा देखील सिंहाचा वाटा आहे त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठकीच्या प्रारंभी सर्व अधिकाऱ्यांना धन्यवाद दिले. 

ऑक्सिजन, औषध उपलब्धता तपासा, अग्निसुरक्षा ऑडिट पूर्ण करा 

कोविडशी अव्याहतपणे लढत असल्याबद्धल मुख्यमंत्र्यांनी प्रशासनातील सर्वांचे कौतुक केले. ते म्हणाले की, नवा व्हेरिएंट हा उंबरठा ओलांडून आला आहे का हे काळजीपूर्वक पाहावे लागेल. दोन्ही लाटांमध्ये आपल्याला कुठं कमी पडलो ते कळत होते. ऑक्सिजनचा साठा वाढविण्यासाठी धावपळ करावी लागली होती.  त्यामुळे आता या नव्या विषाणू प्रकारामुळे शहरे असो किंवा दुर्गम भागातली रुग्णालये असोत, आपल्याला ऑक्सिजन निर्मिती, ऑक्सिजन साठा, आगीच्या घटना घडू नयेत म्ह्णून अग्निसुरक्षा तसेच स्थापत्य विषयक ऑडिट, औषधांची उपलब्धता हे सर्व प्रत्येक जिल्हा प्रशासनाने जातीने पाहावे. 

मास्क आवश्यकच, अनावश्यक गर्दी होऊ देऊ नका

महाराष्ट्रातील जनता समजूतदार आहे. यापूर्वीही सरकारच्या सर्व सूचनांचे पालन त्यांनी केले आहे. कोविडचे रुग्ण कमी झाल्यामुळे लोकांमध्ये बेसावधपणा आला आहे. या विषाणूशी कसे लढायचे , कोणते उपचार करावेत हा नंतरचा भाग झाला पण मुळात हा संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर मास्क अनिवार्य आहेच असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आता लग्नसराईचे दिवस आहेत. मित्र- आप्तेष्ट परदेशातून देखील येतील त्यामुळे आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे. 

परदेशातून आलेल्या व्यक्तींवर लक्ष ठेवणे गरजेचे 

परदेशातून लोक मोठ्या प्रमाणावर मुंबईत व इतर ठिकाणी येणे सुरू झाले आहे . त्यापैकी अनेक जण देशांत इतरत्र उतरून देशांतर्गत विमान सेवेने , रस्ते व रेल्वेमार्गे येतात. त्यांच्यात कुणी विषाणूचा वाहक असेल तर इतरांना मोठा धोका होऊ शकतो त्यामुळे अशा प्रवाशांची तपासणी करणे, त्यांच्याकडे लक्ष ठेवणे अत्यावश्यक आहे , त्यादृष्टीने लगेच युद्ध पातळीवर कामाला लागा असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

चाचण्या वाढवा, आवश्यक किटस पुरवा

यावेळी मुख्यमंत्र्यांनी मधल्या काळात कमी झालेल्या चाचण्यांवर चिंता व्यक्त केली व चाचण्या वाढविण्याचे निर्देश दिले. विषाणूच्या नव्या प्रकाराला ओळखणारे किटस राज्यातील प्रयोगशाळांना मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. 

लसीकरण करून घ्याच

छोट्या छोट्या गोष्टींनी या विषाणूला प्रतिबंध होऊ शकतो हे लक्षात ठेवा असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, दोन्ही डोससह लसीकरण करून घेणे अतिशय आवश्यक असून प्रत्येकाने ही काळजी घेतलीच पाहिजे

का आहे ओमायक्रॉन घातक?

टास्क फोर्सच्या डॉ शशांक जोशी यांनी बैठकीत या विषाणूविषयी माहिती दिली:

कोविडच्या या नव्या विषाणूने दक्षिण आफ्रिकेतील यापूर्वीच्या डेल्टा व्हेरिएंट प्रकाराची जागा घेतली असून त्याचा संसर्ग कितीतरी अधिक आहे

डेल्टा ची जागा ओमायक्रॉनने अवघ्या दोन आठवड्यात घेतली यावरून त्याची घातकता लक्षात येते 

दुसऱ्या लाट्स कारणीभूत असलेल्या डेल्टाचे दोन म्युटेशन होते. बेटा प्रकाराचे तीन म्युटेशन होते पण ओमायक्रॉन या प्रकाराचे पन्नासहून अधिक म्युटेशन आहेत. 

हा व्हेरिएंट सध्याच्या औषधांना, लसीला दाद देतो किंवा नाही ते डॉक्टर्स आणि तज्ञ जाणून घेत आहेत पण घाबरून न जाता आपण काळजी घेण्याची गरज आहे कारण याचा संसर्गाचा वेग पूर्वीच्या डेल्टापेक्षा कितीतरी जास्त आहे 

डबल मास्क घालणे योग्य राहील. सर्जिकल 3 प्लाय मास्क आणि एन 95 प्रकारातील एक मास्क घालणे उचित ठरेल 

खाताना किंवा जेवताना जेव्हा मास्क काढलेला असेल तेच अधिक संधानात बाळगणे गरजेचे

आवश्यक गर्दी टाळा, आवश्यक असेल तरच प्रवास करा 

ज्यांनी लस घेतली नाही त्यांनी ती त्वरित घ्यावी

ओमायक्रॉनला रोखण्याचा एकच मार्ग आहे - दुहेरी मास्क घाला, मोकळ्या हवेत राहा, आणि लसींचे दोन्ही डोस घ्या 

बैठकीच्या प्रारंभी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी ही बैठक बोलविण्यामागे संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचे सांगितले. डॉ प्रदीप व्यास यांनी सादरीकरण करून युरोप तसेच दक्षिण आफ्रिकेत वेगाने पसरणाऱ्या विषाणूविषयी माहिती दिली. यावेळी टास्क फोर्सच्या डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी व डॉ राहुल पंडित यांनी देखील यासंदर्भात काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन केले.

आज सातारा जिल्ह्यात 17 बाधीत,38 डिस्चार्ज

सातारा दि (जिमाका)
 जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
 जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 17 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 0 जणांचा मृत्यू झाला आहे तर 
38 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 2 खंडाळा 2 खटाव 2 कोरेगांव 1 माण 1 महाबळेश्वर 0  पाटण 0 फलटण 2 सातारा 6 वाई 0 व इतर 1 आणि नंतरचे वाढीव 0 असे  आज अखेर एकूण 17 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... 
आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 38 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

Saturday, November 27, 2021

कोविड नियमांचे उल्लंघन करणा-या व्यक्ती व संस्थांना होणार दंड- सार्वजनिक कार्यक्रम व प्रवासाबाबत राज्य शासनाची मार्गदर्शक तत्वे जारी

मुंबई,दि.२७ :- राज्यात कोविड १९ या आजाराचे रूग्ण कमी झाल्यामुळे राज्य शासनाने आर्थिक, सामाजिक, मनोरंजन व सांस्कृतिक क्षेत्रावरील निर्बंध पूर्णतः लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी शिथिल केले आहेत.राज्य शासन तसेच केंद्र शासनाकडून वेळोवळी देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन सेवा देणारे,मालक,परवानाधारक तसेच आयोजक यासह सर्व सेवा घेणारे, ग्राहक, अतिथी अभ्यागत यांनी  करावयाचे आहे. आज जारी केलेल्या या मार्गदर्शक तत्वात संपूर्ण लसीकरणाची आवश्यकता, कार्यक्रमावरील निर्बंधाची व्याख्या, कोविड अनुरूप वर्तन, स्थानिक प्रशासनाचे अधिकार, कोविड वर्तणूकविषयक नियम व दंड याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

             संपूर्ण लसीकरणाची आवश्यकता :

        तिकोट असलेल्या किंवा तिकीट नसलेल्या कोणत्याही कार्यक्रमाच्या समारंभाच्या किंवा प्रयोगाच्या आयोजनाशी संबंधित असलेल्या सर्व व्यक्ती तसेच सर्व सेवा देणारे व सहभागी होणाऱ्या व्यक्ती (जसे की, खेळाडू, अभिनेते  इत्यादी) अभ्यागत, पाहुणे, ग्राहक यांनी संपूर्ण लसीकरण केलेले असावे,कोणतेही दुकान,आस्थापना, मॉल, समारंभ, संमेलन (मेळावे) इत्यादी ठिकाणी, संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींद्वारे व्यवस्थापन केले पाहिजे आणि अशा ठिकाणी येणारे सर्व अभ्यागत, ग्राहक यांचे संपूर्ण लसीकरण झालेले असावे. सर्व सार्वजनिक परिवहन सेवांमध्ये संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच परवानगी असेल.

         राज्य शासनाने तयार केलेला युनिव्हर्सल पास (https://epassmsdma.mahait.org किंवा telegram-MahaGovUniversalPass Bot) हा संपूर्ण लसीकरण झाल्याच्या स्थितीचा वैध पुरावा असेल.अन्यथा, छायाचित्र असलेले वैध ओळखपत्र असलेले 'कोविन प्रमाणपत्र देखील' त्यासाठी वैध पुरावा मानले जाईल.१८ वर्षापेक्षा कमी वयाच्या नागरिकांसाठी इतर शासकीय संस्थेने किंवा शाळेने दिलेले छायाचित्र ओळखपत्र आणि वैद्यकोय कारणांमुळे ज्या व्यक्ती लस घेऊ शकत नाहीत त्या व्यक्तींसाठी, प्रमाणित वैद्यकीय व्यावसायोकांकडील प्रमाणपत्र प्रवेशासाठी कागदोपत्री पुरावा म्हणून वापरता येईल.जेथे सर्वसामान्य जनतेतील कोणतीही व्यक्ती भेट देत नाही अशी कार्यालये व इतर आस्थापना तसेच खाजगी परिवहन सेवा यांच्यासाठी संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तीसाठी त्या खुल्या असण्याची शर्त नसली तरी, त्यांना देखील संपूर्ण लसीकरण करणे आवश्यक आहे.

 महाराष्ट्र राज्यात प्रवास 

        महाराष्ट्र राज्यात प्रवास करताना कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्थानावरून राज्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांना केंद्र सरकारची मार्गदर्शक तत्वे त्यांना लागू राहतील. राज्यात येणाऱ्या सर्व देशांतर्गत प्रवाशांचे एकतर यात यापुढे व्याख्या केल्यानुसार संपूर्ण लसीकरण केले जाईल किंवा ७२ तासांसाठी वैध असलेली आरटी-पीसीआर चाचणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

 कोणताही कार्यक्रम, समारंभामधील उपस्थितीवरील निर्बंध

            कोणताही कार्यक्रम,समारंभ इत्यादींमधील उपस्थितीवरील निर्बंधामध्ये चित्रपट गृह, नाट्यगृह, मंगलकार्यालय सभागृह, बंदिस्त बंद जागेत घेण्यात येणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमाच्या अथवा समारंभाच्या उपक्रमाच्या बाबतीत, जागेच्या क्षमतेच्या ५० टक्के लोकांना परवानगी दिली जाईल.संपूर्ण संमेलनांसाठी तेथील जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के लोकांना परवानगी दिली जाईल.संमेलनाच्या किंवा समारंभाच्या अशा ठिकाणांच्या बाबतीतील क्षमता,औपचारिकपणे आधीच निश्चित केलेली नसेल तर (स्टेडियम प्रमाणे) संबंधित जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास अशो क्षमता ठरवण्याचा अधिकार असेल.

         कोणत्याही संमेलनासाठी (मेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या एकूण  लोकांची संख्या १ हजारांपेक्षा अधिक असेल तर अशा बाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला त्याची माहिती द्यावी लागेल आणि स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, अशा कोणत्याही संमेलनाचे (मेळाव्याचे निरीक्षक म्हणून पर्यवेक्षण करण्यासाठी त्यांचे प्रतिनिधी पाठवील आणि तेथे  स्थानिक प्रशासन काटेकोरपणे अनुपालन केले जात असल्याची खात्री करतील.कोविड अनुरूप वर्तनाचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले तर स्थानिक प्रशासनाला सदर कार्यक्रम पूर्णतः किंवा  अंशत: बंद करण्याचे अधिकार आहेत.

 जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांचे अधिकार

           कोणत्याही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास जर योग्य वाटल्यास कोणत्याही क्षणी, त्यांच्या संबंधित अधिकारक्षेत्रासाठी यात नमूद केलेले निर्बंध व शर्ती वाढविता येतील.परंतु कमी करता येऊ शकणार नाहीत, मात्र,जाहीर नोटोसीद्वारे ४८ तासांची पूर्व सूचना दिल्याशिवाय तसे करता येणार नाही. या आदेशाच्या दिनांकास, अंमलात असलेले जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने लादलेले कोणतेही निर्बंध जर ते पुढे चालू ठेवण्यासाठी जाहीर नोटीस देऊन पुन्हा जारी केले नसतील तर ते ४८ तासांनंतर अंमलात असल्याचे बंद होतील.

 संपूर्ण लसीकरणाची व्याख्या : 

           संपूर्ण लसीकरणाची व्याख्या पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे.लसीच्या दोन्हीही मात्रा (डोस) घेतल्या आहेत आणि दुसरी मात्रा (डोस) घेतल्यानंतर १४ दिवस झालेले आहेत अशी कोणतीही व्यक्ती असा आहे. ज्यामुळे त्याला किंवा तिला लस घेण्यास मुभा नाही आणि त्या व्यक्तीकडे तशा अर्थाचे मान्यताप्राप्त डॉक्टराकडील प्रमाणपत्र आहे अशी कोणतीही व्यक्ती  असा आहे. किंवा कोणतीही १८ वर्षापेक्षा कमी वयाची व्यक्तो, असा आहे..

 कोविड अनुरूप वर्तनविषयक नियम 

        कोविड अनुरूप वर्तनविषयक नियम पुढीलप्रमाणे आहेत.कोविड १९ विषाणूचा प्रसार होण्यास प्रतिबंध करण्यासाठी आणि त्यामुळे त्याच्या प्रसाराची साखळी खंडित करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने व संस्थेने पालन करण्याची गरज असलेले दैनदिन सामान्य वर्तन अशी कोविड अनुरूप वर्तन (CAB) या संज्ञेची व्याख्या करता येऊ शकेल. कोविड अनुरूप वर्तनाचे प्रत्येकाने सदैव पालन केले पाहिजे,सर्व संस्थांनी त्यांचे सर्व कर्मचारी, त्यांच्या परिसरांत भेट देणारे अभ्यागत,ग्राहक किंवा संस्थेच्या कोणत्याही कार्यक्रमात, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी होणारी कोणीतीही व्यक्ती,त्याचे पालन करतील आणि त्यांच्या परिसरांमध्ये किंवा व्यवसायाशी संबंधित व्यवहार करताना किंवा कार्य करताना त्यांची अंमलबजावणी करण्याकरिता संस्था  जबाबदार असतील. सर्व कर्मचान्यांनी कांविड अनुरूप वर्तनाचे पालन करण्यासाठी हॅन्ड सॅनिटायझर, साबण व पाणी, तापमापक (thermal scanner), इत्यादी गोष्टी उपलब्ध करण्यासाठी देखील जबाबदार आहेत.

       नेहमी योग्य पद्धतीने मास्क परिधान करा. नाक व तोंड नेहमी मास्कने झाकलेले असले पाहिजे. (रुमालाला, मास्क समजले जाणार नाही आणि रूमाल वापरणारी व्यक्ती, दंडास पात्र असेल.) जेथे जेथे शक्य असेल तेथे, नेहमी सामाजिक अंतर (६ फूट अंतर) राखा.साबणाने किंवा सॅनिटायझरने वारंवार व स्वच्छपणे हात स्वच्छ धुवा.साबणाने हात न धुता किंवा सॅनिटायझर न वापरता, नाक/डोळे/तोंड यांना स्पर्श करणे टाळा.योग्य श्वसन स्वच्छता(आरोग्य) राखा.,पृष्ठभाग निर्वामितपणे आणि बाई सर स्वच्छ व निर्जंतुक करा.खोकताना किंवा शिकताना, टिश्यू पेपरचा वापर करून तोंड व नाक झाका आणि वापरलेले टिश्यू पेपर नष्ट करा. जर एखाद्याकडे टिश्यू पेपर नसेल तर, त्याने स्वतःचा हात नव्हे तर, हाताचा वाकवलेला कोपरा नाका तोडांवर ठेवून खोकावे व शिकावे,सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळा आणि सुरक्षित अंतर (६ फूट अंतर) राखा कोणालाही शारीरिक स्पर्श न करता, नमस्कार अथवा अभिवादन करा. कोविड-१९ विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी आवश्यक असलेले अन्य कोणतेही

 

 

 कोविड अनुरूप वर्तनविषयक नियमांचे पालन न करणा-या व्यक्ती व संस्थांना दंड :

           कोविड नियमांचे पालन न करणा-या व्यक्ती तसेच संस्था,आस्थापना या  दंडास पात्र असतील. कोविड़ अनुरूप वर्तनाचे पालन न करणान्या कोणत्याही व्यक्तीला असा कसूर केल्याच्या प्रत्येक प्रसंगी रुपये ५००/- इतका दंड करण्यात येईल.

           ज्यांनी आपले अभ्यागत, ग्राहक, इत्यादीवर कोविड अनुरूप वर्तन ठेवणे अपेक्षित आहे अशा संस्थेच्या किंवा आस्थापनेच्या कोणत्याही जागेत किंवा परिसरात  जर एखाद्या व्यक्तीने कसूर केल्याचे दिसून आले तर, त्या व्यक्तीवर दंड लादण्या व्यतिरिक्त, अशा संस्थाना किया आस्थापनांना सुद्धा रुपये १०,०००/- इतका दंड करण्यात येईल.

          जर कोणतीही संस्था किंचा आस्थापना तिचे अभ्यागत, ग्राहक, इत्यादीमध्ये कोविड अनुरूप वर्तन विषयक शिस्त निर्माण करण्याची सुनिश्चित करण्यात नियमितपणे कसूर करीत असल्याचे दिसून आले तर, एक आपत्ती म्हणून कोविड १९ ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत, अशी संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल.

         जर एखाद्या संस्थेने किंवा आस्थापनेने स्वतःच कोविड अनुरूप वर्तनाचे पालन करण्यात कसूर केली तर ती प्रत्येक प्रसंगी रूपये ५०,०००/- इतक्या दंडास पात्र असेल. वारंवार कसूर केल्यास, एक आपत्ती म्हणून कोविड-१९ ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत ती संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल.

        जर कोणत्याही टॅक्सीमध्ये किंवा खाजगी वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनात किंवा कोणत्याही बसमध्ये, कोबिड अनुरूप वर्तनात कसूर केली जात असल्याचे आढळून आले तर, कोविड अनुरूप वर्तनात कसूर करणाऱ्या व्यक्तींना, रूपये ५००/- इतका दंड करण्यात येईल,

        तसेच सेवा पुरविणारे चाहनचालक, मदतनीस, किंवा वाहक यांना देखील रूपये ५००/- इतका दंड करण्यात येईल. बसेसच्या बाबतीत, मालक परिवहन एजन्सीस, कसुरीच्या प्रत्येक प्रसंगी, रुपये १०,०००/- इतका दंड करण्यात येईल.

          वारंवार कसूर केल्यास एक आपत्ती म्हणून कोविड-१९ ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत मालक एजन्सीचे लायसन काढून घेण्यात येईल किंवा तिचे परिचालन बंद करण्यात येईल.

         कोविड अनुरूप वर्तणुकी संबंधीच्या वर नमूद केलेल्या नियमांचे, अनिवार्यपणे पालन करण्यात येईल आणि त्यांचे उल्लंघन केल्यास वर नमूद केल्यानुसार दंड व शास्ती करण्यात येईल तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ नुसार कोणत्याही आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे उल्लंघन करणा-यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारच्या सार्वजनिक ठिकाणी कोविड वर्तणूकीसंदर्भातील मार्गदर्शक सूचना शासनाने जारी केलेल्या आहेत.                                                                       ******

आज सातारा जिल्ह्यात 25 बाधीत,9 डिस्चार्ज...

सातारा दि (जिमाका)
 जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
 जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 25 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 0 जणांचा मृत्यू झाला आहे तर 
9 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 3 खंडाळा 3 खटाव 1 कोरेगांव 3 माण 2 महाबळेश्वर 0  पाटण 0 फलटण 4 सातारा 5 वाई 0 व इतर 1 आणि नंतरचे वाढीव 3 असे  आज अखेर एकूण 25 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... 
आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 9 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

आता कोरोनाचे नवे संकट ; नवा कोरोना विषाणू आला आढळून ; राज्य शासनाने केली नवीन नियमावली जारी...

वेध माझा ऑनलाइन
दक्षिण आफ्रिकेत नवा कोरोना विषाणू आढळल्याने जगापुढे आता नवे संकट उभे राहिले आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूच्या वेरिएंटसंदर्भात भारत देशातील राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचनाही आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्यानंतर राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. तसेच नवीन नियमावलीही जारी केलेली आहे. ती म्हणजे लसीचे दोन डोस घेतल्याशिवाय आता महाराष्ट्रातील लोकांना सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करता येणार नाही. राज्य सरकारच्या या निर्णयानुसार, लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींना आता सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करण्यास परवानगी असणार आहे. म्हणजेच लसीचे दोन डोस घेतल्याशिवाय आता महाराष्ट्रातील लोकांना सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करता येणार नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महत्वपूर्ण बैठक घेतल्यानंतर नव्या कोरोनाच्या व्हेरिएंट विषाणूसंदर्भात देशातील सर्वच राज्यातील सरकारने खबरदारी घ्यावी, अशा सूचना दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींच्या सूचनेनंतर महाराष्ट्र सरकारने तत्काळ महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने याबाबत नवी नियमावली जारी केली आहे.

 राज्य सरकारची नवीन नियमावली पुढीलप्रमाणे –

1) मुंबईतील लोकल ट्रेनप्रमाणे एसटी, बससेवा, टॅक्सी, रिक्षा या वाहतुकीने प्रवास करायचा असेल तर दोन डोस घेतलेल्या व्यक्तींनाच परवानगी दिली जाणार आहे.
2) कोरोनाचे नियम न पाळणार्‍यांविरुद्ध दंडाची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे.
3) रिक्षा, टॅक्सीत बसलेल्या प्रवाशाने मास्कचा वापर केला नसेल तर प्रवाशाला 500 रुपये आणि रिक्षा-टॅक्सी चालकालाही 500 रुपये दंड आकारला जाणार आहे.
4) दुकानात आलेल्या ग्राहकाने मास्क घातला नसेल तर ग्राहकाला 500, तर संबंधित दुकानदाराला 10 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.
5) मॉल्समध्ये ग्राहकांच्या चेहऱ्यावर मास्क नसेल तर मॉल्सच्या मालकाला तब्बल 50 हजार रुपयांचा फटका बसणार आहे.
6) राजकीय सभांना, जाहीर कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे.
7) नियम न न पाळणाऱ्या आयोजकांवर 50 हजार दंड आकारण्याबरोबर कार्यक्रम बंद करण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आला आहे.

सध्या राजकारणात कोणीही कोणाशी जुळवून घेतय...माझे इतके- इतके नगरसेवक म्हणत ऐनवेळी सत्तेत पण बसतय...पक्षचिन्ह आणि विचारधारेच्या राजकारणाची कराड शहराला आता गरज...शहरात चर्चा


वेध माझा ऑनलाइन
कराड
 शहराच्या राजकारणाची एकूणच झालेली विचित्र अवस्था पाहता  यावर्षीची होणारी निवडणूक आता पक्षीय विचारधारेशी बांधील असणे अपेक्षित असल्याने ही निवडणुक पक्षचिन्हावर होण्याबाबत मागणी होत आहे...  माझे इतके-इतके नगरसेवक असे म्हणत ऐनवेळी सत्तेत सामील होण्याचे संधीसाधू राजकारण या पक्षचिन्हाच्या फॉर्म्युल्यामुळे हद्दपार होणार असल्याने व सध्या इथल्या राजकारणात कोणी-कोणाशीही जुळवून घेताना दिसतय त्यामुळे  शहराचे भविष्य काय ? याबाबतची चिंताही यानिमित्ताने दूर होणार आहे 

येथील पालिका निवडणूक काही महिन्यावर येऊन ठेपली आहे.राज्याच्या राजकारणाचा परिणाम नेहमीच स्थानीक राजकारणावर दिसून येतो. त्यानुसार त्या त्या ठिकाणी घडामोडी घडतात..त्याचेच प्रत्यंतर झालेल्या पदवीधर निवडणूकित दिसून आले. अपवाद वगळता ग्रामपंचायत निवडणूका याच धर्तीवर पार पडल्या व  निकालदेखील त्याच प्रमाणात दिसून आले.काही महिन्याने कराड नगरपरिषदेची निवडणुक होईल.येथील परिस्थीती पहिली तर, स्वच्छ सर्वेक्षणच्या नावाखाली येथे इतर कामाना तितकेसे महत्व दिले गेले नाही ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे अनेक मूलभूत प्रश्न प्रलंबीतच आहेत.त्यामुळे येथील काही लोकप्रतिनिधींनी आपल्या वॉर्डामधील इतर कामे होण्यासाठीचे प्रयत्न ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सुरू ठेवली आहेत असे दिसते. त्यापैकी काहींच्या बाबतीत "वेळ निघून गेल्याचे" प्रत्यंतर येण्याची शक्यता आहे, तर काहीजण सातत्याने लोकांची कामे करत जनतेच्या मनातील आपली जागा "अभाधित" ठेवण्यात यशस्वी होतील अशीही शक्यता आहे.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे.भाजपाचे संख्याबळ अधिक असूनदेखील ते विरोधात आहेत. असे असताना महाविकास आघाडीची संकल्पना पदवीधर व स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत लोकांना फारशी रुचनार नाही अशी अनेकांची धारणा होती मात्र ती सपशेल फोल ठरली. झालेल्या पदवीधर निवडणुकीत याच महाविकास आघाडीला सुशिक्षित मततदारांनी अक्षरशः डोक्यावर घेत आपला कौल दिला. ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र भावकीचे गणित दिसून आले, तेथील राजकारणात पारंपरिक विरोध व जुळवाजुळवीचे राजकारण असे स्वरूप पहायला मिळाले मात्र शहरातून महाविकास आघाडी पसंतीस उतरल्याने दिसुन आले, म्हणजेच ग्रामीण व शहरी भागात राजकारणाचे गणित वेगवेगळे घडत असल्याचे जाणवले.त्यामुळे शहरी राजकारणात पक्षीय राजकारणाचा फॉर्म्युला महाविकास आघाडी म्हणून यशस्वी झाला हे सिद्ध झाले.  
कराड शहरातील लोकांनादेखील पालिका निवडणूक पक्षचिन्हावरच हवी आहे.दरम्यान यापूर्वीच्या झालेल्या येथील काही निवडणुकीच्या माध्यमातून आपला केवळ वापरच झाला... अशी इथल्या दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची भावना झाल्याचे समजते, म्हणूनच एकमेकांच्या विरोधात उभे राहून दोघांचेही नुकसान करून घेण्याच्या मानसिकतेत काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते आता दिसत नाहीत असेही समजते त्यामुळे कदाचित दोन्ही काँग्रेस महाविकास आघाडीचा फॉर्म्युला घेऊन निवडणुकीत उतरतील का ? असा प्रश्न आहेच आता ताकही फुंकून पीत कराड पालिका निवडणुकीसाठी पुढची वाटचाल करताना दोन्ही काँग्रेसची भूमिका दिसेल हेही तितकेच खरे आहे. शहराच्या राजकारणात सोयीपुरता आमचाही वापर झाला अशी चर्चा भाजपाचे नेतेदेखील करताना दिसत आहेत.दुसरीकडे नुकत्याच झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत येथील भाजपाच्या भोसलें गटाने राष्ट्रवादीच्या उत्तरच्या आमदारांना मदत करत कराड शहराच्या राजकारणाची समीकरणे बदलण्यासाठी प्रयत्न केला असला तरी सहकारात व ग्रामीण राजकारणात चाललेला हा फॉर्म्युला शहराच्या राजकारणात कितपत चालेल ? हा प्रश्नच आहे...   कोणाची  तरी जिरवायची म्हणून ठराविक मर्यादेपुरते केलेले असले राजकारण शहरात फारसे चाललेले नाही असा आजपर्यंतचा  इतिहास आहे...

दरम्यान,शहराच्या राजकारणात लोकशाही आघाडी,जनशक्ती आघाडी,आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे नेतृत्व मानणारे नगरसेवक, व भाजपाचे नगरसेवक असे चार गट कार्यरत आहेत. दरम्यान जनशक्ती आघाडीमध्ये उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांना मानणारे नगरसेवक,जाधव समर्थक नगरसेवक, आणि यादव समर्थक नगरसेवक असे मिळून सत्तारूढ म्हणून कार्यरत आहेत. नगराध्यक्षपद भाजपकडे आहे. भाजपाने मागील निवडणूक पक्षचिन्हावरच लढली आहे.नगराध्यक्षपदासाठी त्यांना पक्षचिन्हाचा फायदाच झाला आहे.याहीवेळी पुन्हा पूर्ण ताकदीने भाजपा पक्षचिन्हावरच लढणार आहे.काँग्रेसची देखील पक्ष चिन्हावरच लढण्याची मानसिकता आहे असे समजते तर,राष्ट्रवादी पक्ष म्हणूनच लढेल असे संकेत जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी साताऱ्यात दिले आहेत मात्र येथील राष्ट्रवादीचा मानला जाणारा पालिकेतील गट लोकशाही आघाडी म्हणून लढेल असे आघाडीच्या नेत्यांकडून सांगण्यात आले आहे पण पक्ष म्हणून लढण्याची वेळ आल्यास त्यांची भूमिका काय असणार हेही पहावे लागणार आहे कदाचित ऐनवेळी दोन्ही काँग्रेस महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढतील का ? असाही प्रश्न आहेच...

दरम्यान या निवडणुकीतील राजकीय पक्ष   जनतेचा विश्वास गमावून बसलेल्या  शहरातील काही "पुढार्यांना' या निवडणुकीत "एकट" पाडतील...अशी शक्यता आहे... संधीसाधू राजकारणाला दूर ठेवणे हा यामागचा हेतू असल्याचे सांगितले जात आहे...आणि,माझे इतके-इतके नगरसेवक असे म्हणत ऐनवेळी सत्तेसाठी आवश्यक असणारी नगरसेवकांची बेरीज घडवून आणत सत्तेत सामील होण्यासाठी केले जाणारे राजकारणही त्यामुळे थांबेल... त्यामुळे शहराला आता ही निवडणुक पक्षचिन्हावर हवी आहे... त्यानंतर जनतेने निवडुन दिलेल्या "पक्ष' विचारधारेचे राजकारण शहरात होण्यास मदत होईल आणि राजकारणाच्या नावाखाली सुरू असलेले थोतांडही संपुष्टात येईल अशी यानिमित्ताने चर्चा आहे

Friday, November 26, 2021

कोविड-१९ ने मृत्यू झालेल्या नातेवाईकांस मिळणार पन्नास हजार रूपये -मंत्री विजय वडेट्टीवार यांची घोषणा...

 मुंबई, दि.२६:- मा.सर्वोच्च न्यायालयाने  दिनांक ४ ऑक्टो २०२१ रोजी दिलेल्या निर्णयानुसार कोविड-१९ या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकटतम नातेवाईकांस ५०,०००/- रूपये (रु. पन्नास हजार )  इतका सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन , मदत व पुनर्वसन मंत्री  विजय वडेट्टीवार यांनी दिली.

        राज्य शासनाने  मदतीची रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होण्याकरिता ही योजना  तयार   केली आहे. त्यानुसार लाभार्थ्यांना मदतीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात  जमा  होणार आहे. महाराष्ट्र राज्यात जी व्यक्ती कोव्हिड १९ या आजारामुळे निधन पावली आहे तसेच जर त्या व्यक्तीने कोव्हिड १९ चे निदान झाल्यामुळे जरी आत्महत्या केली असेल तरी त्या मृत व्यक्तीच्या निकट नातेवाईकास रु. ५०,०००/- (रु. पन्नास हजार ) इतके सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती मदत्त निधीमधून देण्यात  येणार आहेत.हे सानुग्रह सहाय्य देण्याकरिता कोव्हिड -१९ मृत्यू प्रकरणे निर्धारित करण्यासाठी पडताळणी करण्यात येईल.पडताळणीसाठी विविध मुद्दे शासन निर्णयात सविस्तरपणे देण्यात आलेले आहेत. ही मदत मिळण्यासाठी कोव्हिड १९ या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेईवाईकाने राज्य शासनाने या करिता विकसित केलेल्या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जदार स्वत: किंवा सेतू केंद्रात किंवा ग्रामपंचायतीत CSC-SPV मधून अर्ज करु शकेल.

        या कामासाठी नव्याने वेब पोर्टल पुढील आठवडयातच विकसित करण्यात येणार आहे. त्या वेब पोर्टल वर ऑनलाईन अर्ज कसा करावा तसेच संपूर्ण या योजनेची तपशीलवार कार्यपध्दती याची माहिती असेल. हे वेब पोर्टल कार्यन्वीत झाल्यानंतर सर्व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणे याबाबत  आपल्या स्तरावर   याबाबतची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी तसेच याबाबत  प्रसिध्दी करावी.जिल्हा तसेच तालुका व गाव पातळीवर देतील आणि सर्व संबंधितांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन  स्थानिक प्रशासनाने करावे.याबाबतचा महसूल व वन विभागाचा शासन निर्णय क्रमांक २०२१११२६१६१२२१०५१९  दिनांक २६ नोव्हेंबर २०२१ रोजी निर्गमीत केलेला आहे. यामध्ये याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे.हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.                                                               
******

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या निर्बंधात आणखी शिथिलता...

सातारा दि. 26 (जिमाका) : सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या निर्बंधामध्ये शिथीलता देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी निर्गमित केले असून हे आदेश 27 नोव्हेंबर  पासून पुढील आदेश होईपर्यंत लागू राहतील.

  उपहारगृहे : 

खुली अथवा बंदिस्त उपहारगृहे आसन व्यवस्थेच्या 50 टक्के क्षमतेने खालील अटींच्या पूर्ततेच्या अधीन राहून सुरु करण्याची मुभा देण्यात येत आहे.  उपहारगृह, बारमध्ये प्रवेश करताना, प्रतिक्षा कक्षात अथवा जेवण मिळेपर्यंतच्या कालावधीत मास्कचा वापर अनिवार्य राहिल . व याबाबतच्या स्पष्ट सूचना उपहारगृह आस्थापनांनी उपहारगृहात लावणे आवश्यक राहिल. उपहारगृह, बारमध्ये काम करणारे आचारी, वाढपे, व्यवस्थापक व स्वच्छता कर्मचाऱ्यांसह सर्व कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक राहिल व ज्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाच्या दोन मात्रा आणि दुसरी मात्रा घेतल्यानंतर 14 दिवस पुर्ण झाले आहे असेच कर्मचारी व व्यवस्थापक उपहारगृह, बारमध्ये काम करू शकतील तसेच या सर्व कर्मचारी व व्यवस्थापनाने उपहारगृहात मास्कचा वापर करणे अनिवार्य राहिल.  वातानुकुलित उपहारगृह, बार असल्यास, वायुवीजनासाठी खिडक्या असल्यास कमीत कमी दोन खिडक्या किंवा दरवाजा उघडा ठेवून आतील हवा खेळती राहण्यासाठी पंखे लावणे आवश्यक राहिल.  प्रसाधनगृहातही उच्च क्षमतेचा एक्झॉस्ट फॅन असणे आवश्यक राहिल.  उपहारगृह, बारमध्ये विहित शारिरीक अंतराचे पालन होईल यानुसारच आसन व्यवस्था सुरू करण्यात यावी.  सातारा जिल्हयातील सर्व उपहारगृहे व भोजनगृहे सर्व दिवस रात्री 12.00 वा पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. 

   दुकाने :

सातारा जिल्हयातील सर्व व्यापारी दुकाने सर्व दिवस रात्री 10.00 वा. पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. दुकानात काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांचे कोविंड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा झाल्यानंतर 14 दिवसाचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक राहिल. 

  शॉपिंग मॉल्स 

सातारा जिल्ह्यातील सर्व शॉपिंग मॉल्स सर्व दिवस रात्री 10 वा. पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. तथापि, शॉपिंग मॉलमध्ये काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मचारी आणि प्रवेश करणाऱ्या सर्व नागरिकांचेही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा झाल्यानंतर 14 दिवसाचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक राहील. व तसे लसीकरण प्रमाणपत्र व त्यासमवेत फोटोसहित ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखविणे आवश्यक राहील.

 वय वर्ष 18 खालील वयोगटातील मुलांचे लसीकरण अदयाप सुरु न झाल्याने वय वर्षे 18 खालील वयागटातील मुला-मुलींना मॉल मध्ये प्रवेश करताना वयाचा पुरवा म्हणून आधारकार्ड, आयकर विभागाने निर्गमित केलेले पॅनकार्ड किंवा वयाचा उल्लेख असलेले शाळा किंवा महाविदयालयाचे वैध ओळखपत्र प्रवेशव्दारावर दाखविणे आवश्यक राहील. 

  जिम्नॅशिअम, योगसेंटर, सलून स्पा: 

वातानुकुलित तसेच विनावातानुकूलित 
जिम्नॅशिअम, योगसेंटर, सलून स्पा 50 टक्के क्षमतेने सर्व दिवस रात्री 10.00 वा. पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. तथापि, उक्त संस्था वातानुकूलीत असल्यास, वायुविजनासाठी फॅन व वातानुकूलनासह खिडकी अथवा दरवाजा उघडा ठेवणे आवश्यक राहील. 

  *इनडोअर स्पोर्टस :* इनडोअर स्पोटर्स 

असलेल्या ठिकाणी खेळाडूंचे व तेथील कर्मचारी व व्यवस्थापन यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा झाल्यानंतर 14 दिवस झालेले असणे आवश्यक राहील. तसेच या ठिकाणी हवा खेळती राहण्यासाठी योग्य वायुविजन व्यवस्था असणे आवश्यक राहील. या ठिकाणी खेळाडूना बॅडमिंटन, टेबलटेनिस, स्क्वॅश, पॅरलल बार, मलखांब अशाच खेळांसाठी केवळ दोन खेळाडू या मर्यादेत सुरु करण्याची मुभा देण्यात येत आहे. 

  *कार्यालय / औद्योगिक / सेवाविषयक 

आस्थापना :* सर्व शासकीय- निमशासकीय आस्थापनांचे कर्मचारी, बँक कर्मचारी, रेल्वे व म्युनिसिपल कर्मचारी व व्यवस्थापन यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण प्राथम्याने पुर्ण करण्यात यावे.  ज्या खाजगी व औद्योगिक आस्थापनांच्या कर्मचा-यांचे व व्यवस्थापनांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पुर्ण झालेले असेल त्या आस्थापना पुर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. सर्व आस्थापनांनी गर्दी टाळण्यासाठी शक्यतो विविध सत्रात कर्मचाऱ्यांना बोलावून कामाचे व्यवस्थापन करावे ज्या आस्थापना वरील कर्मचाऱ्यांना घरून काम करणे शक्य आहे अशा सर्व आस्थापनांच्या व्यवस्थापनांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा द्यावी . कार्यालयात काम करणे आवश्यक असल्यास कर्मचा-यांचा गर्दीच्या वेळी प्रवास टाळणे शक्य होईल अशा प्रकारे कार्यालयीन वेळेचे व्यवस्थापन करण्यात यावे.  शासकीय - निमशासकीय कार्यालये नियमित वेळेत पुर्ण क्षमतेने चालू ठेवणेस परवानगी असेल. तसेच खाजगी कार्यालयाना वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी कार्यालये 24 तास सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. मात्र अशा सत्र व्यवस्थापनांतर्गत कार्यालयांना एका सत्रात कार्यालयातील एकूण कर्मचारी संख्येच्या 25 टक्के उपस्थिती मर्यादित करणे आवश्यक राहील. 

सातारा जिल्हयातील सर्व मैदाने, उद्याने स्थानिक प्राधिकरणाने विहित केल्यानुसार त्यांच्या नियमित वेळेत सुरु राहतील. 

  *विवाह सोहळे :* 

विवाह सोहळा आयोजन करणेकामी संबंधित तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील.  खुल्या प्रांगणातील, लॉन वरील किंवा बंदिस्त मंगल कार्यालयातील विवाह सोहळे संबंधित प्रांगण, लॉन, मंगल कार्यालय, हॉटेल मधील आसन व्यवस्थेच्या 50 टक्के क्षमतेने व कोविंड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे संपर्ण पालन होईल या अटीवर मंगल कार्यालयाच्या प्रयोजनार्थ सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे.  खुल्या प्रांगण, लॉन मध्ये होणाऱ्या विवाह सोहळ्यास उपस्थितांची संख्या प्रांगण किंवा लॉन क्षमतेच्या 50 टक्के परंतु जास्तीत जास्त 200 व्यक्ती या मर्यादेत असेल.  बंदिस्त मंगल कार्यालय, हॉटेलमध्ये उपस्थितांची संख्या क्षमतेच्या 50 टक्के परंतु जास्तीत जास्त 100 व्यक्ती या मर्यादित असेल.  मात्र कोणत्याही परिस्थीतीत कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन केले जात आहे याची खातरजमा करण्यासाठी व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे व आवश्यकतेनुसार सक्षम प्राधिका-याला तपासणीसाठी उपलब्ध करून देणे आवश्यक राहील. या निर्बंधाचे उल्लंघन करणाऱ्यांवर तसेच संबंधित हॉटेल, कार्यालयांवर दंडनीय कारवाई तसेच संबंधित हॉटेल, मंगल कार्यालयाचा परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल. तसेच मंगल कार्यालय, हॉटेल,  लॉन व्यवस्थापन, भोजन व्यवस्थापन , बँडपथक, भटजी, फोटोग्राफर्स अशा विवाह व्यवस्थेशी संबंधीत सर्व संलग्न संस्था यामधील व्यवस्थापक व कर्मचारी यांचेही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पुर्ण होऊन दुसरी मात्रा घेतल्यानंतर 14 दिवस पूर्ण होणे अनिवार्य राहील व त्यानुसार ओळखपत्रासह लसीकरण प्रमाणपत्र सोबत असणे आवश्यक राहील. तसेच या कार्यालयाच्या  दि.20/10/2021 आदेशाअन्वये दिलेल्या अटी व शर्तीनुसार सातारा जिल्हयातील बंदिस्त सभागृहे व मोकळया जागेमध्ये होणारे इतर सांस्कृतिक कार्यक्रम चालु ठेवणेस परवानगी असेल.

  *सिनेमागृहे , मल्टिप्लेक्स व नाटयगृहे :*

 या कार्यालयाच्या  दि.20/10/2021 व आदेशाअन्वये दिलेल्या अटी व शर्ती पालन करण्याच्या अटीनुसार सातारा जिल्हयातील सिनेमागृहे, मल्टिप्लेक्स व नाटयगृहे चालु ठेवणेस परवानगी असेल.

  *धार्मिक स्थळे :* 

 या कार्यालयाच्या   दि. 30/09/2021 मधील अटी व शर्तीचे पालन करण्याच्या अटीनुसार सातारा जिल्हयात धार्मिक स्थळे व प्रार्थना स्थळे चालू ठेवणेस परवानगी असेल. 

  *आंतरराज्य प्रवास :*

 ज्या नागरिकांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाले आहे त्या नागरिकांना, बाहेरच्या राज्यातून सातारा जिल्हयात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणीची आवश्यकता नसेल. अन्य प्रवाशांसाठी ७२ तास पूर्वीची आरटीपीसीआर चाचणी निगेटीव्ह किंवा १४ दिवस विलगीकरण आवश्यक राहिल.   

  कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गर्दी व्यवस्थापन करण्याबाबत केंद्र शासनाने तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केले आहे. यास्तव गर्दी, जमाव टाळण्यासाठी वाढदिवस, राजकीय, धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणूक प्रचार सभा, रॅली, मोर्चे, क्रिडा स्पर्धा इ. वरील निर्बंध कायम राहतील.   

  सातारा जिल्हयातील सर्व नागरिकांना कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना जसे की, मास्कचा वापर, हातांची स्वच्छता, शारिरीक अंतराचे पालन, इतरत्र थुंकण्यास प्रतिबंध, इ. सर्व निर्बंधांचे पालन करणे अनिवार्य राहिल.   

सर्व दुकाने, कार्यालये, औद्योगिक आस्थापना, उपहारगृहे, बार व मॉल मालक,  व्यवस्थापनाने त्यांचे आस्थापनेवर कार्यरत असलेल्या व्यवस्थापक तसेच कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन मात्रा पुर्ण होऊन 14 दिवस झाल्याची खातरजमा करावी व या कर्मचाऱ्यांची यादी (लसीकरण माहिती , प्रमाणपत्रासह) तयार ठेवावी व सक्षम प्राधिकाऱ्यांनी तपासणीसाठी मागणी केल्यास त्यांना उपलब्ध करुन दयावी. 

  दुकाने, उपहारगृहे, बार, मॉल्सचे, कार्यालये,औद्योगिक यांचे नियतकालीक निर्जतूकीकरण व सॅनीटायझेशन करण्याची जबाबदारी संबंधीत मालकाची व व्यवस्थापनाची असेल. तसेच, यामध्ये कर्मचारी तसेच ग्राहकांचे तापमान घेण्यासाठी इन्फ्रारेड, कॉन्टॅक्टलेस थर्मामिटर याची व्यवस्था करण्यात यावी, तसेच यामध्ये मास्क डिस्पेंसर व बायोमेडीकल वेस्ट (वापरलेले मास्क व टिशु पेपर्स इत्यादीची विल्हेवाट) जमा करण्याची व विहित कार्यपध्दतीने विल्हेवाटीसाठी देण्याची जबाबदारी संबंधीत आस्थापनांची असेल. 

  *अंत्यविधी व दशक्रिया विधी -

जास्तीत जास्त 50 नातेवाईक/नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यविधी व दशक्रिया विधी करणेस परवानगी असेल.
 9
  *जलतरण तलाव -*

 सातारा जिल्हयात कोविड -19 अनुषंगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाचे पालन करणेचे अटीवर जलतरण तलाव सुरु करणेस परवानगी देणेत येत आहे.

  *ग्रंथालय :* 

या कार्यालयाच्या  दि.28/10/2021 अन्वये दिलेल्या अटी व शर्तीनुसार सातारा जिल्हयातील ग्रंथालय चालु ठेवणेस परवानगी असेल. 

CONTAINMENT ZONE बाबत संबंधित INCIDENT COMMANDER तथा उपविभागीय अधिकारी हे ज्या ज्या वेळी स्वतंत्र आदेश काढून CONTAINMENT ZONE जाहीर करतील व सदर क्षेत्रामध्ये जे निर्बंध लागू करतील ते आदेश CONTAINMENT ZONE क्षेत्रास लागू राहतील. 

या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधीतांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60, व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय / कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 
  *0000*

आज सातारा जिल्ह्यात 22 बाधीत,18 डिस्चार्ज...

सातारा दि (जिमाका)
 जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
 जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 22नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 0 जणांचा मृत्यू झाला आहे तर 
18 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 5 खंडाळा 2 खटाव 4 कोरेगांव 1 माण 0 महाबळेश्वर 0  पाटण 0 फलटण 1 सातारा 9 वाई 0 व इतर 0 आणि नंतरचे वाढीव 0 असे  आज अखेर एकूण 22 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... 
आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 18 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

Thursday, November 25, 2021

जुन्या मैत्रीला पुन्हा उजाळा - कराड येथील निवासस्थानी जशराजबाबा व अतुलबाबा यांची गळाभेट... अतुलबाबांनी केले नामदार बाळासाहेब पाटील यांचे अभिनंदन...

वेध माझा ऑनलाइन
कराड
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली.या निवडणुकीत कराड सोसायटी मतदार संघातून राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांनी विजयश्री खेचून आणल्याबद्दल कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन मा.श्री अतुल भोसले(बाबा) हे नामदार बाळासाहेब पाटील यांचे अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या कराड येथील निवासस्थानी आले असता, त्यांनी सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे संचालक, युवा नेते जशराज पाटील(बाबा) यांची अगत्यपूर्वक भेट घेतली व त्‍यांचेही अभिनंदन केले. 


जशराजबाबा व अतुलबाबा यांची मैत्री सर्वश्रुत आहे, आजच्या भेटीने जुन्या मैत्रीला पुन्हा उजाळा मिळाल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.

जुन्या मैत्रीला पुन्हा उजाळा - कराड येथील निवासस्थानी जशराजबाबा व अतुलबाबा यांची गळाभेट... अतुलबाबांनी केले नामदार बाळासाहेब पाटील यांचे अभिनंदन...

वेध माझा ऑनलाइन
कराड
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली.या निवडणुकीत कराड सोसायटी मतदार संघातून राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांनी विजयश्री खेचून आणल्याबद्दल कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन मा.श्री अतुल भोसले(बाबा) हे नामदार बाळासाहेब पाटील यांचे अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या कराड येथील निवासस्थानी आले असता, त्यांनी सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे संचालक, युवा नेते जशराज पाटील(बाबा) यांची अगत्यपूर्वक भेट घेतली व त्‍यांचेही अभिनंदन केले. 


जशराजबाबा व अतुलबाबा यांची मैत्री सर्वश्रुत आहे, आजच्या भेटीने जुन्या मैत्रीला पुन्हा उजाळा मिळाल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.

राज्यातील सर्व शाळा 1 डिसेंबर पासून सुरू होणार ; शिक्षणमंत्री ना. वर्षा गायकवाड यांची घोषणा...

वेध माझा ऑनलाइन
राज्यातील शाळा कधी सुरु होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान राज्यातील शाळा सुरु होण्याबाबत आज शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनी नुकतीच घोषणा केली आहे. राज्यातील सर्व शाळा या एक डिसेंबरपासून सुरु होणार असल्याचे वर्ष गायकवाड यांनी सांगितले. याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला असून पहिली ते दहावीचे वर्ग सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, कोरोना संक्रमणामुळे आणि लॉकडाऊनमुळे गेली दीड वर्षाहून अधिक काळ शाळा बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. आज शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनी शाळा पुन्हा सुरु करणार असल्याबाबत घोषणा केली. त्यामुळे आता शाळा न पाहिलेल्या चिमुकल्यांना आता शाळेत जाता येणार आहे.

आज सातारा जिल्ह्यात 27 बाधीत ;26 डिस्चार्ज

सातारा दि (जिमाका)
 जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
 जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 27 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 3 जणांचा मृत्यू झाला आहे तर 
26 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 1 कराड 2 खंडाळा 2 खटाव 3 कोरेगांव 0 माण 3 महाबळेश्वर 0  पाटण 0 फलटण 4 सातारा 11 वाई 0 व इतर 1 आणि नंतरचे वाढीव 0 असे  आज अखेर एकूण 27 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... 
आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 26 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

Wednesday, November 24, 2021

जिल्ह्यातील नगरपंचायतींच्या निवडणूका जाहीर ; कराड पालिकेचे काय ...? चौकाचौकात चर्चा सुरू ; यादव,जाधव,जयवंत पाटील यांच्यासह लोकशाही गटाच्या भुमिकेबाबत चर्चा सुरू ; भाजपा,काँग्रेस पक्षाच्या भूमिकेकडेही लोकांचे लक्ष...

वेध माझा ऑनलाइन
कराड
जिल्ह्यातील नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत त्यामुळे आता कराड पालिकेच्या निवडणुकीचे काय ? याही चर्चा शहराच्या चौकाचौकात जोर धरू लागल्यात काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या येथील पालिका निवडणुकीत जाधव,यादव, जयवन्त पाटील यांच्यासह लोकशाही आघाडी गटाची भूमिका काय असेल, या बरोबरच शहरातील काँग्रेस आणि भाजपाची पक्ष म्हणून  भूमिका काय असणार याही विषयी लोक आता तर्क लावू लागले आहेत लोकांना या निवडणुकीबाबत मोठी उत्सुकता आहे

पालिकेत सध्या लोकशाही आघाडी,जनशक्ती आघाडी,भाजपा,व आ पृथ्वीराज चव्हाण यांचे नेतृत्व मानणारे सदस्य आहेत नगराध्यक्षा भाजपा च्या आहेत दरम्यान,जनशक्ती आघाडीत जाधव गट जयवन्त पाटील गट व  यादव याना मानणाऱ्या नगरसेवकांचा गट असे तीन गट आहेत मात्र होणाऱ्या येथील पालिका  निवडणुकीचे चित्र यावेळी वेगळेच असेल अशी शक्यता गेल्या पाच वर्षाच्या राजकारणाचा विचार केल्यास निर्माण झाली आहे...  

या निवडणुकीत यादव गट एकला चलो रे ची भूमिका घेईल असे समजते किंवा एखाद्या येथील राजकीय गटाबरोबरही हात मिळवणी करू शकतो अशीही चर्चा आहे... यापूर्वी हे लोक लोकशाही गटाशी जवळीक करून होते नंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्याजवळ जाऊन बसले भाजपाच्या सत्ताकाळात भाजपा नेत्यांच्या आजूबाजूलाही ते  दिसत होते सध्या सहकारमंत्र्यांच्या लोकशाही गटाशी जवळीक करताना ते दिसत आहेत अशी चर्चा असली तरी त्यांचे जमेल की नाही हे लोकशाही गटाच्या भूमिकेवर सर्वस्वी अवलंबून आहे  जिकडे आम्ही तिकडे गुलाल... असा यादव गटाचा विश्वास नेहमीच दिसला आहे दरम्यान, कोणाशी नाही जमले तर एकला चलो अशी भूमिका हा गट घेईल का ? हे पहावे लागणार आहे...

जाधव गटाने कित्येक महिने अगोदरच आपली भूमिका पृथ्वीराज चव्हाण गटाबरोबरच असल्याचे शहराला दाखवून देत स्पष्टपणे आपली दिशा व  भूमिका उघड केली आहे झालेल्या विधानसभा निवडणुकीत या गटाने शहरात पृथ्वीराज चव्हाण यांची पाठराखण करत शहरातून त्यांना लीड देण्यात पुढाकार घेतला होता या पाच वर्षात जनशक्ती च्या पालिकेबाबतच्या बहुतांशी इव्हेंट मधून जाधव गटाचा सहभाग पहिल्यापासूनच फारसा दिसलेला नाही हे शहरानेही अधोरेखित केले आहे जाधव कुटुंबावर कराडकरांचे प्रेम व निष्ठा असल्याचे वारंवार दिसून येते त्याचा या निवडणुकीत सकारात्मक परिणाम दिसून येईल असा विश्वास जाणकार व्यक्त करताना दिसत आहेत

उपनगराध्यक्ष जयवंत पाटील हे देखील जनशक्ती आघाडीचे नेते असूनही कित्येक महिन्यापासून पार्टीतील यादव गटापासून फारकत घेऊन बाजूला आहेत त्यांची ही या निवडणुकीत भूमिका काय?हे शहराला जाणून घ्यायच आहे त्यांनी मधल्या काळात आ पृथ्वीराज चव्हाण यांची एका कामानिमित्त भेट घेतली असता त्याची शहरात मोठी चर्चाही झाली होती जयवंतदादा आणि काँग्रेस त्यांची ताकद एकत्र यावी म्हणून काँग्रेस नेते शिवराज मोरे अनेक दिवसांपासून प्रयत्नात असल्याचे समजते नुकत्याच झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जयवन्तदादा नामदार बाळासाहेब पाटील यांच्या समर्थनार्थ भोसलेंच्या पहिल्या फळीतल्या नेत्यांबरोबर दिसले त्यामुळे त्यांची भूमिका या निवडणुकीत नेमकी काय असणार हेही कळणे तितकेच महत्वाचे आहे

लोकशाही गटाने ताक फुंकत आपली पाऊले उचलायला सुरू केल्याचे दिसतय त्यासाठी त्यांना त्यांचे पहिले अनुभव गाठीशी आहेतच त्यामुळे सत्ता असताना गर्दी करणार्यापेक्ष्या निष्ठवंतांच्या भावनांना महत्व देताना हा गट सध्यातरी दिसतोय आणि म्हणून पक्ष पातळीवर असो किंवा आघाडी म्हणून असो...या निवडणुकीत उतरताना या आघाडीच्या योग्य निर्णयाकडे सम्पूर्ण शहराचे लक्ष आहे कारण त्या निर्णयावरच लोकभावनेला हवा असलेला करेक्ट कार्यक्रम होण्यासाठी शहराची त्यांना मदत होणार आहे !

दुसरीकडे भाजपाने पक्षचिन्हवर ही निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे मात्र सुरेश भोसले यांनी नुकतेच आपण यापुढे नामदार पाटील यांना राजकीय मदत करणार आहोत असे जिल्हा बँकेत नामदार पाटील निवडून गेल्यानंतर त्यांच्या झालेल्या सत्कार सोहळ्यात जाहीर केले आहे त्याचा अर्थ अद्याप स्पष्ट झालेला नाही त्यामुळे भाजपा म्हणून भोसले गट कोणती भूमिका घेणार हा प्रश्न या निवडणुकीसाठी  आहेच... दुसरीकडे भाजपाचे निष्ठावन्त मात्र पक्षचिन्ह घेऊन आपला किल्ला लढवताना या निवडणुकीत दिसतील यात शंका नाही...!

काँग्रेसचे प्रदेशचे नेते नाना पटोले यांनी नुकतेच काँग्रेस पक्षदेखील चिन्हावर स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुका लढणार आहे असे जाहीर केलय आणि कराडात देखील लोक भावना तशीच आहे अस कळतय...असे सांगत पृथ्वीराजबाबा यांनीही काही दिवसांपूर्वी याविषयी दुजोरा देणारे वक्तव्य केले होते...  मात्र तशी कोणतीही अधिकृत घोषणा शहराच्या निवडणुकीसाठी  झालेली नाही... कदाचित ऐनवेळी नामदार पाटील व पृथ्वीराजबाबा हे दोघे एकत्र येऊन ही निवडणूक महाआघाडी म्हणून  लढतील का ? असा प्रश्नही जाणकाराना आहेच कारण संधीसाधू राजकारण हद्दपार करण्यासाठी हे पाऊल उचलले जाईल अशीही शक्यता आहे...! एकूणच ही निवडणूक आतापर्यंत झालेल्या निवडणुकीपेक्षा नक्कीच वेगळी असेल या निवडणुकीत कोणाला निवडून आणायचे यापेक्षा कोणाला पाडायचे याचे गणित मांडून समीकरणे आखली जाण्याची शक्यता आहे  गेल्या पाच वर्षाच्या आपसात केलेल्या कुरघोड्याचे कारण यासाठी कारणीभूत मानल जातंय आणि या पाच वर्षात झालेल्या इतर निवडणुकांचे संदर्भदेखील त्याला कारणीभूत आहेत अशीही चर्चा आहे

सातारा जिल्ह्यातील लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा व दहिवडी या सहा नगरपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

सातारा 
सातारा जिल्ह्यातील लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा व दहिवडी या सहा नगरपंचायतींचा निवडणुकीचा बिगुल वाजला असून दि. 1 डिसेंबर ते दि. 22 डिसेंबर यादरम्यान निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

जिल्ह्यातील या सहा नगरपंचायतींसाठी 29 नोव्हेंबर 2021 रोजी अंतिम मतदार याद्या प्रभाग निहाय प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. दि. 1 डिसेंबर ते दि. 7 डिसेंबर दुपारी दोन वाजेपर्यंत वेबसाईटवर अर्ज भरण्यासाठी चा कालावधी आहे. दि.1 डिसेंबर ते दि. 7 डिसेंबर या दरम्यानच अर्ज इच्छुकांचे स्वीकारले जातील. दिनांक दि. 4 डिसेंबर आणि दि. 5 डिसेंबर या दोन दिवशी सुट्टीचा कालावधी असल्याने या दिवशी अर्ज स्विकारले जाणार नाहीत. दि. 8 डिसेंबर रोजी सकाळी दि. 11 वाजल्यापासून अर्जाची छाननी करण्यात येणार असून वैद्य अर्जाच्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध याच दिवशी केली जाईल.
अर्ज माघारी घेण्याचा दिवस दि.13 डिसेंबर सोमवार असून दुपारी तीन वाजेपर्यंत कालावधी राहणार आहे. दि. 21 डिसेंबर मंगळवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या कालावधीत मतदान असणार आहे तर दि. 22 डिसेंबर बुधवारी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
लोणंद नगरपंचायत चा कार्यकाल 3 मे 2021 रोजी संपलेला आहे. तर उर्वरित कोरेगाव पाटण वडूज खंडाळा व दहिवडी या पाच नगरपंचायतींचा कालावधी 18 डिसेंबर 2021 रोजी संपत आहे.

आज सातारा जिल्ह्यात 23 बाधीत,तर 51डिस्चार्ज...

सातारा दि (जिमाका)
 जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
 जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 23 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 0 जणांचा मृत्यू झाला आहे तर 
51 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 2 खंडाळा 1खटाव 2 कोरेगांव 1 माण 3 महाबळेश्वर 0  पाटण 0 फलटण 3 सातारा 9 वाई 2 व इतर 0 आणि नंतरचे वाढीव 0 असे  आज अखेर एकूण 23 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... 
आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 51 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशनच्या वतीने आज देशव्यापी हॉकर्स बंदची हाक ; बंदला कराड शहर चारचाकी हातगाडा, हाॅकर्स संघटनेच्या वतीने पाठिंबा जाहीर ; याबाबतचे निवेदन तहसीलदार मुख्याधिकारी यांना सादर...

वेध माझा ऑनलाइन
कराड
हाॅकर्ससाठी केलेले नियम आणि त्याबाबतची अमलबजावणी अजूनही का झाली नाही, ती लवकर व्हावी यासाठी नॅशनल फेडरेशन व महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशनच्या वतीने आज देशव्यापी हॉकर्स बंद  पुकारला आहे. या बंदला कराड शहर चारचाकी हातगाडा, हाॅकर्स संघटनेच्या वतीने पाठिंबा दिला आहे तसेच याबाबतचे निवेदन तहसीलदार व मुख्याधिकारी यांना दिले आहे.

 निवेदनात म्हटले आहे...  नगरपालिकांकडून हाॅकर्स साठी असलेल्या नियमांची पूर्तता झाली नाही, ती व्हावी.तसेच पथविक्रेते उपजीविका संरक्षण आणि विनिमयन कायद्याचीही अंमलबजावणी व्हावी. पथविक्रेता योजना  सरकारने त्वरित घोषित करावी तसेच पथविक्रेत्यांना विक्री प्रमाणपत्र मिळावे, कोणत्याही पथक विक्रेत्यास पथविक्रेत्यास पथविक्रेते कायद्याचे पालन न करता विस्थापित करू नये असे निवेदनात म्हटले आहे
सदर निवेदन संघटनेचे अध्यक्ष जावेद नायकवडी, उपाध्यक्ष सतीश तावरे व सचिव हरीष बल्लाळ, खजिनदार गजानन कुंभार,संघटक श्री मुल्ला यांनी दिले.

पहिली ते चौथी शाळा सुरू करण्याबाबत राजेश टोपेंनी दिले संकेत...

वेध माझा ऑनलाइन
राज्यात पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला असून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत संकेत दिले आहेत. शहरी आणि ग्रामीण भागात १ ली ते ४ थी साठी शाळा सुरू करण्यासाठी शाळा प्रशासनाकडून सध्या होमवर्क सुरू आहे. शाळा सुरू करण्याबाबत टास्कफोर्सचा हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे येणाऱ्या कॅबिनेटमध्ये शाळा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबतचा निर्णय घेतील,असे राजेश टोपे यांनी म्हंटल आहे.

पहिली ते चौथी यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना ते बऱ्यापैकी जाऊन संसर्गित होणार नाहीत याची काळजी घेत त्यांना आपण शाळेमध्ये येऊन दिलं पाहिजे. शाळा सुरू करण्याबाबत शाळा व्यवस्थापनाला तयारी करण्यासाठीच्या चर्चा पूर्ण झाल्या आहेत. तसेच पालकांचेही काऊंसिलिंग करण्याची तयारी आहे. त्यामुळे येत्या दिवसांमध्ये शाळा सुरू होण्यासाठी शक्य होईल. यासंदर्भातील अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आणि कॅबिनेटला आहे. असे राजेश टोपे यांनी म्हंटल.
राज्यात नाट्यगृह, सिनेमागृहांना ५० टक्के परवानगीने सुरू टेवण्याचे निर्देश दिल आहेत. सध्या कोरोना रूग्णांची आकडेवारी पाहता अशीच स्थिती राहिली तसेच येत्या दिवसात आणखी सुधारणा झाली की हे नियमही शिथिल करण्यात येतील असे राजेश टोपे म्हणाले.

Tuesday, November 23, 2021

आज सातारा जिल्ह्यात 18 बाधीत,71 डिस्चार्ज

सातारा दि (जिमाका)
 जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
 जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 18 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे तर 71 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 2 खंडाळा 0 खटाव 0 कोरेगांव 2 माण 0 महाबळेश्वर 1  पाटण 0 फलटण 5 सातारा 3 वाई 1 व इतर 1 आणि नंतरचे वाढीव 3 असे आज अखेर एकूण 18 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... 
आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 71 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

Monday, November 22, 2021

शशिकांत शिंदे यांच्या पराभवानंतर कार्यकर्ते आक्रमक ; साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक...


वेध माझा ऑनलाइन
कराड
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचा जिल्हा बँकेत पराभव झाल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले असून कार्यकर्त्यांकडून  साताऱ्यातील राष्ट्रवादी कार्यालयावर दगडफेक करण्यात आल्याचे वृत्त आहे

 यावेळी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच शिंदे यांचा पराभव केला असा आरोप कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकनिष्ठ नेते आहेत शिंदेनी सातारा जिल्यात राष्ट्रवादी काँग्रेस वाढवली तरी त्यांच्यासारखा एकनिष्ठ नेता डावलला गेला संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्याचे काम शशिकांत शिंदे यांनी केलं तरी राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच जाणीवपूर्वक शिंदेंचा पराभव केला  असा आरोप यावेळी त्यांच्या संतप्त कार्यकर्त्यांनी केला आहे.साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचे वृत्त आले आहे

शंभूराज देसाई,शशिकांत शिंदे पराभूत -; सत्यजित पाटणकर विजयी. तर,प्रभाकर घार्गे तुरुंगातून निवडणूक लढवून विजयी...


वेध माझा ऑनलाइन
कराड
नुकत्याच पार पडलेल्या सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत झालेल्या लढतीत राज्याचे गृहराज्यमंत्री शभुराज देसाई पराभूत झाले आहेत सत्यजित पाटणकर यांनी त्यांचा 14 मतांनी पराभव केला आहे तर जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे हेदेखील 1 मताने पराभूत झाले आहेत ज्ञानदेव रांजणे यांनी त्यांचा पराभव केला आहे

 प्रभाकर घार्गे यांनी चक्क तुरुंगातून ही निवडणूक लढवत विजय संपादन करून राष्ट्रवादीला मोठा दणका दिला आहे या एकूणच निकालाने त्या त्या तालुक्यांची राजकीय गणिते काही अंशी बदलण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत

भोसले गटाच्या साथीने सहकारमंत्री विजयी ; तालुक्यात आता नवीन राजकारणाची नांदी...

वेध माझा ऑनलाइन
कराड
नुकत्याच पार पडलेल्या सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत झालेल्या लढतीत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी प्रतिस्पर्धी उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचा 8 मतांनी पराभव केला आहे. भोसले गटाला जवळ करुन  लढवलेल्या या निवडणुकीत सहकारमंत्र्यांनी उंडाळकरांचा पराभव केल्याने यापुढील राजकारणाची तालुक्याची समीकरणे आता झटपट बदलणार हे निश्चित झाले आहे दरम्यान या विजयामुळे सहकारमंत्र्यांचा जिल्हा बॅंकेत पुढच्या दाराने जाण्याचा मनसुबा पूर्ण झाला आहे.

आज सातारा जिल्ह्यात 26 बाधीत,15 डिस्चार्ज

सातारा दि (जिमाका)
 जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
 जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 26 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 0 जणांचा मृत्यू झाला आहे तर 
15 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 1 कराड 2 खंडाळा 0 खटाव 0 कोरेगांव 0 माण 2 महाबळेश्वर 0  पाटण 1 फलटण 6 सातारा 8 वाई 0 व इतर 2 आणि नंतरचे वाढीव 4 असे  आज अखेर एकूण 26 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... 
आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 15 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

Sunday, November 21, 2021

आज सातारा जिल्ह्यात 28 बाधीत ; 15 डिस्चार्ज

सातारा दि (जिमाका)
 जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
 जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 28 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 0 जणांचा मृत्यू झाला आहे तर 
15 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 3 खंडाळा 0 खटाव 5 कोरेगांव 1 माण 3 महाबळेश्वर 0  पाटण 0 फलटण 6 सातारा 7 वाई 1 व इतर 1 आणि नंतरचे वाढीव 1 असे  आज अखेर एकूण 28 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... 
आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 15 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

भोसले बसले "पाटलांच्या' मांडीला मांडी लावून ; पण मतदान कोणत्या "पाटलांना' केले...? भागात जोरदार चर्चा...दोन्ही "पाटलांचा' दावा... भोसले आमचेच ..

वेध माझा ऑनलाइन
कराड
आज सातारा जिल्हा बँकेची निवडणूक पार पडली त्यामधील सोसायटी गटाच्या झालेल्या लढती बाबत याठिकाणी काय होणार अशी... गेली महिनाभर चर्चा होती या गटात नामदार बाळासाहेब पाटील यांच्याविरुद्ध काँग्रेसचे माजी आमदार दिवंगत विलास्काका पाटील उंडाळकर यांचे चिरंजीव उदयदादा पाटील हे निवडणूक लढवत आहेत येथील शिवाजी हायस्कुल येथे ही निवडणूक आज पार पडली या निवडणुकीत शंभर टक्के मतदान झाले असल्याने ही निवडणूक काटेकी टक्कर ठरणार असल्याचे तज्ञांचे मत आहे दरम्यान या निवडणुकीत भोसले गटाचे मतदान निर्णायक ठरेल असे खुद्द भोसलेचे म्हणणे आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आज दिवसभर भोसले गटाचे मावळे नामदार बाळासाहेब पाटील गटाच्या मांडीला मांडी लावून बसलेले दिसले तरीदेखील त्यांचे मतदान कोणाला होणार याची चर्चा मात्र रंगलेली दिसली

गेली अनेक दिवस जिल्हा बँकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे राज्याचे सहकार मंत्री नामदार बाळासाहेब पाटील हे या निवडणुकीत उतरले आहेत दिवंगत आमदार विलास्काका पाटील उंडाळकर यांचे चिरंजीव ऍड उदय दादा पाटील यांचे विरोधात सहकार मंत्र्यांनी या निवडणुकीत दंड थोपटले आहेत गेली महिनाभर या निवडणुकीच्या निमित्ताने हाय होलटेज चर्चा सुरू आहे दिवंगत नेते विलास्काका पाटील यांचे पन्नास हुन अधिक वर्षे प्राबल्य राहिलेला हाच सोसायटी मतदार संघ आहे त्यांच्या निधनानंतर होणाऱ्या या निवडणुकीसाठी त्यांचे चिरंजीव ऍड उदयदादा पाटील यांची त्याठिकाणी बिनविरोध वर्णी लागावी अशी काका प्रेमींची इच्छा होती मात्र तसे होऊ शकले नाही जिल्ह्याचे पालकमंत्री ना बाळासाहेब पाटील यांनी त्याच मतदार संघातूंन आपण उभे राहणार असल्याचे जाहीर केले

एकूण 140 इतके मतदान या मतदारसंघात आहे त्यामध्ये कराड उत्तर व दक्षिण मतदारसंघाचा भाग येतो त्यामध्ये प्रामुख्याने कृष्णेच्या भोसले गटाचे मतदान यावेळी महत्वाचे व निवडणुकीला निर्णायक ठरवणारे आहे असे खुद्द भोसले सांगतात त्यामुळे भोसले गट या निवडणुकीत कोण विजयी होणार हे ठरवणार आहे !

डॉ अतुल भोसले हे कराड उत्तर मधून  बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात उभे असताना 40 हजाराने पडले होते त्यानंतर त्यांनी मतदारसंघ बदलला ते दक्षिण मध्ये आले दरम्यान त्यांनी काका व पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात त्यावेळी दक्षिणेत येऊन निवडणूक लढवली होती त्यानंतर नुकत्याच झालेल्या निवडणुकीत देखील ते पृथ्वीराज चव्हाण यांचे विरोधात उभे होते पराभूत होऊनही यावेळी त्यांची मते खूपच वाढलेली दिसली मात्र या झालेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून अतुलबाबाना रोखण्यासाठी उदयदादाना उभे केले गेले दिवंगत काका गटाची मते डायरेक्ट बाबाना मिळणे शक्य नव्हते कारण काका बाबा गटाचे पूर्वीपासूनचे विल्या-भोपळ्याचे सख्य सम्पूर्ण राज्याला माहीत होते काका गटाची मते भोसलेना डाव्हर्ट होऊ नये याची काळजी घेतली गेली तरी निम्मी मते दोन्ही बाबांना डिस्ट्रिब्युट झाली आणि उरलेली निम्मी उदय दादांनी घेतली पर्यायाने पृथ्वीराजबाबा आमदार झाले अतुलबाबा थोडक्यात पडले... दरम्यान त्याचवेळी भविष्यात उदय दादा व अतुलबाबा यांच्यापैकी एकजण दक्षिण मतदार संघाला आमदार म्हणून मिळणार हेही नक्की झाले नुकत्याच झालेल्या कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत उदय दादांनी अविनाश मोहिते गटाची पाठराखण करत भोसलेना विरोध केला तर भोसलेना इस्लामपूर व कराड दक्षिण मधून छुपी मदत राष्ट्रवादीने केल्याची चर्चा झाली ही निवडणूक भोसले जिंकले... त्यानंतर खऱ्या अर्थाने नामदार पाटील व भोसले यांच्या राजकीय जवळीकीची चर्चा उत्तर-दक्षिण मतदार संघात होऊ लागली दरम्यान  काही कालावधीने आता जिल्हा बँक निवडणूक होत आहे त्यामधून भोसले कोणाला मदत करणार हे अद्याप गुपितच राहिले असले तरी आज मतदानादरम्यान त्यांचे पहिल्या फळीतले सर्व कार्यकर्ते नामदार पाटील गटाच्या मांडीला मांडी लावून बसलेले दिसले... खरतर दक्षिणेत ग्रामपंचायत असेल किंवा एखाद्या गण किंवा गटाची निवडणूक होत असेल तर काका व भोसले गट एकमेकांच्या हातात हात घालून अनेक ठिकाणी एकत्रित दिसला आहे, आणि आजही दिसतो... कृष्णेच्या निवडणुकीतही असेच चित्र अनेकवेळा पहायला मिळते... ते गणित यापुढे सुरू राहण्यासाठी काका व भोसले गट स्थानिक पातळीवर प्रयत्नशील राहीलच ! असे जाणकारांचे म्हणणे आहे उत्तरेतील पाटलांची मदत काही अंशी त्यांना दक्षिणेत होईल हेही खरे...पण आत्तापर्यंतचा इतिहास पाहता काका आणि भोसले यांचे एकत्र समीकरण दक्षिणेत यापुढे विस्कटेल असे आतातरी वाटत नाही... आणि म्हणून आज या निवडणुकीच्या निमित्ताने भोसलेंनी आपले मावळे नामदार पाटील यांच्या बरोबर उघड केले असले तरी स्वतःची भूमिका उदय दादांच्या विरोधात घेतली नाही... हेही तितकेच खरे ! त्यामुळे आज भोसले कोणत्या पाटलांजवळ बसले हे सर्वांनी पाहिले तरी त्यांनी कोणत्या पाटलांना मतदान केले ? हे अद्याप गुलदस्त्यातच  आहे आणि ते कळण्यासाठी निकालाच्या दिवसाची वाट पहावी लागणार आहे हे मात्र निश्चित ! 

Saturday, November 20, 2021

कराड
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा व विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या सल्याने आम्ही मतदान करत आहोत असे स्पष्ट करत आमच्या मतदानातून काय निकाल निष्पन्न होतोय ते लवकरच कळेल असे स्पष्ट मत डॉ अतुल भोसले यांनी आज व्यक्त केले
सोसायटी गटातून ना बाळासाहेब पाटील व उदय दादा पाटील केल्यानंतरयांची थेट लढत होत आहे या गटात Vमतदान  ते पत्रकारांशी बोलले 
ना बाळासाहेब पाटील गटाच्या कार्यकर्त्यांबरोबर ते बोलताना दिसले

आज सातारा जिल्ह्यात 20 बाधीत,50 डिस्चार्ज

सातारा दि (जिमाका)
 जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
 जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 20 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 0 जणांचा मृत्यू झाला आहे तर 
50 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 0 खंडाळा 1 खटाव 3 कोरेगांव 2 माण 1 महाबळेश्वर 0  पाटण 0 फलटण 7 सातारा 3  वाई 0 व इतर 2 आणि नंतरचे वाढीव 1 असे  आज अखेर एकूण 20 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... 
आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 50 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

महाराष्ट्राला सर्वाधिक स्वच्छ सर्वेक्षणाचे राष्ट्रीय पुरस्कार- महाराष्ट्रातील तीन नगरपालिकांचा राष्ट्रपतीच्यां हस्ते सन्मान-

वेध माझा ऑनलाइन
नवी दिल्ली, 20 : महाराष्ट्राला सर्वाधिक स्वच्छ सर्वेक्षण वर्ष 2021 चे राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत.  सांगली जिल्ह्यांतील विटा नगरपालिकेला देशात प्रथम क्रमाकांचा तर पुणे जिल्ह्यातील लोणावळा आणि सासवड ने दुसरा व तीसरा क्रमांक प्राप्त करून देशात स्वच्छ सर्वेक्षणाचे सलग तीन पुरस्कार पटकावून महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. या तीन नगरपालिकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आलेले आहे.  यासह महाराष्ट्राने स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशात दुसरा क्रमांक मिळविला आहे.  

आज विज्ञान भवन येथे केंद्रीय गृहनिर्माण तथा  नगरविकास मंत्रालयाच्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण-2021 चे राष्ट्रीय पुरस्कार  वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय गृहनिर्माण तथा नगरविकास मंत्री हरदिप सिंग पुरी, केंद्रिय गृहनिर्माण तथा नगरविकास राज्यमंत्री कौशल किशोर, छत्तीसगड़ राज्याचे मुख्यमंत्री, मनीपुर राज्याचे मुख्यमंत्री तसेच केंद्रीय गृहनिर्माण तथा नगरविकास सचिव दुर्गा प्रसाद मिश्रा हे मंचावर उपस्थित होते. 

राष्ट्रीय स्तवरावरील उत्कृष्ट कामगिरी करणा-या शहरांना, नगरपालिकांना, लष्करी छावण्यांना राष्ट्रपती यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.  तर इतर पुरस्कार केंद्रीय मंत्री श्री पुरी यांच्या हस्ते वितरीत करूण गौरविण्यात आले.  तसेच  केंद्रीय राज्य मंत्री श्री कौशल यांच्याहस्तेही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 
आज झालेल्या पुरस्कार वितरणामध्ये एकूण पुरस्काराच्या 40 टक्के पुरस्कार महाराष्ट्राला मिळालेले आहेत.   वन स्टार मानांकनामध्ये देशभरातील एकूण 147 शहरांचा समावेश  आहे. यामध्ये  राज्यातील 55 शहरे आहेत. थ्री स्टार मानांकनामध्ये देशभरातील एकूण 143 शहरे आहेत त्यात महाराष्ट्रातील 64 शहरांचा समावेश आहे. फाईव स्टार मानांकनामध्ये देशभरातील 9 शहरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यामध्ये राज्यातील नवी मुंबई या शहराचा समावेश आहे. नवी मुंबई महानगरपालिकेला 6 कोटी रूपयांचा धनादेश बक्ष‍िस स्वरूपात प्रदान करण्यात आला. दहा लाख लोकसंख्यावरील शहरांमध्ये देशभरातील एकूण  48 शहारांची निवड करण्यात आली होती त्यात राज्यातील 10 शहरांचा समावेश आहे. एक ते दहा लाख लोकसंख्या असणाऱ्‍या 100 शहरांमध्ये  राज्यातील 27 शहरांचा समावेश आहे. एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्‍या 100 शहरांमध्ये राज्यातील 56 शहरे आहेत तसेच यामध्ये पहिले वीस शहरे ही महाराष्ट्राचीच आहेत. या एकूण स्वच्छ सर्वेक्षणाच्या कामगीरी साठी राज्याला देशातील दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार केंद्रिय मंत्री श्री पुरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार राज्याचे नगर विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी स्वीकारला त्यांच्यासोबत राज्य स्वच्छ मीशन (नागरी)चे अभियान संचालक अनिल मुळे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.


पुरस्कार प्राप्त शहरे, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत यांची यादी सोबत जोडलेली आहे.

*• अमृत -"स्वच्छ शहर" पुरस्कार* 


१) नवीमुंबई २) पुणे ३) बृहन्मुंबई ४ ) पनवेल

अनु. क्र नगरपरिषद/ नगरपंचायत अनु. क्र नगरपरिषद/ नगरपंचायत
विटा नगरपरिषद १० तिवसा नगरपंचायत
लोणावळा नगरपरिषद ११ पन्हाळा नगरपरिषद
सासवड  नगरपरिषद १२ मुरगुड नगरपरिषद
*४ कराड नगरपरिषद* १३ धानोरा नगरपंचायत
हिंगोली नगरपरिषद १४ भद्रावती नगरपरिषद
देवळाली - प्रवरा नगरपरिषद १५ मूल नगरपरिषद
खोपोली नगरपरिषद १६ दोंडाईचा - वरवाडे नगरपरिषद
कामठी नगरपरिषद १७ खानापूर नगरपंचायत
*९ पांचगणी-गिरीस्थान नगरपरिषद*

*• नॉनअमृत -"स्वच्छ शहर" पुरस्कार*


   *ब) "कचरामुक्त शहरांचे  स्टार मानांकन "*

*• अमृत -"कचरामुक्त शहरांचे प्रमाण‍ित 3 स्टार मानांकन " पुरस्कार* 
अनु. क्र नगरपरिषद/ नगरपंचायत अनु. क्र नगरपरिषद/ नगरपंचायत
लातूर महानगरपालिका अहमदनगर 
महानगरपालिका
कुळगांव-बदलापुर  नगरपरिषद धुळे 
महानगरपालिका
नवी मुंबईमहानगरपालिका जळगांव 
महानगरपालिका
पनवेल महानगरपालिका १० पुणे
 महानगरपालिका
ठाणे 
महानगरपालिका *११ सातारा नगरपरिषद*
चंद्रपूर
 महानगरपालिका

*• नॉनअमृत -"कचरामुक्त शहरांचे प्रमाणित 3 स्टार मानांकन "  पुरस्कार*

अनु. क्र नगरपरिषद/ नगरपंचायत अनु. क्र नगरपरिषद/ नगरपंचायत
शेंदूरजनाघाट नगरपरिषद ३० सेलू नगरपंचायत
तिवसा नगरपंचायत ३१ उमरेड नगरपरिषद
घनसांवगी नगरपंचायत ३२ बोधवड नगरपरिषद
हिंगोली नगरपरिषद ३३ देवळाली - प्रवरा नगरपरिषद
जाफराबाद नगरपंचायत ३४ एरंडोल नगरपरिषद
मानवत नगरपरिषद ३५ शिर्डी नगरपंचायत
नायगाव नगरपंचायत ३६ शिरपूर - वरवाडे नगरपरिषद
पाथरी नगरपरिषद ३७ सिन्नर नगरपरिषद
सेलू नगरपरिषद ३८ यावल नगरपरिषद
१० सिल्लोड नगरपरिषद ३९ आष्टा नगरपरिषद
११ कर्जत नगरपरिषद ४० गडहिंग्लज नगरपरिषद
१२ खेड नगरपरिषद ४१ इंदापूर नगरपरिषद
१३ खोपोली नगरपरिषद ४२ जेजूरी नगरपरिषद
१४ मुरबाड नगरपंचायत ४३ जुन्नर नगरपरिषद
१५ शहापूर नगरपंचायत *४४ कराड नगरपरिषद*
१६ बल्लारपूर नगरपरिषद ४५ कुरूंदवाड नगरपरिषद
१७ भामरागड नगरपंचायत ४६ लोणावळा नगरपरिषद
१८ ब्रम्हपुरी नगरपरिषद *४७ महाबळेश्वर- गिरीस्थान नगरपरिषद*
१९ देसाईगंज नगरपरिषद *४८ मलकापूर नगरपरिषद*
२० धानोरा नगरपंचायत ४९ मंगळवेढा नगरपरिषद
२१ कामठी नगरपरिषद ५० मुरगुड नगरपरिषद
२२ काटोल नगरपरिषद *५१ पांचगणी-गिरीस्थान नगरपरिषद*
२३ खापा नगरपरिषद ५२ पन्हाळा नगरपरिषद
२४ कोरपना नगरपंचायत *५३ रहिमतपूर नगरपरिषद*
२५ महादुला नगरपंचायत ५४ सासवड  नगरपरिषद
२६ मौदा नगरपंचायत ५५ शिरूर  नगरपरिषद
२७ मोवाड नगरपरिषद ५६ वडगांव नगरपरिषद
२८ नरखेड नगरपरिषद ५७ विटा नगरपरिषद
२९ सावली नगरपंचायत *५८ वाई नगरपरिषद*

00000