Friday, December 22, 2023

कोल्हापूर शहरात कोविड 19 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ; महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क ;

वेध माझा ऑनलाइन। कोल्हापूर शहरात कोविड 19 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. रुग्ण सापडल्यानंतर महापालिकेची आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. सार्वजनिक ठिकाणी बाहेर पडताना मास्क वापरण्याचं महापालिकेचे नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे. गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी जाण टाळावं तसेच पन्नास वर्षावरील नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं महापालिकेच्या आरोग्य विभागानं आवाहन केलं आहे.
 दरम्यान, मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संबंधित रुग्ण हा काल (20 डिसेंबर) कोल्हापूर शहरात दाखल झाला होता. त्याने कोठून कुठवर प्रवास केला याबाबत माहिती मिळालेली नाही. दोन दिवसांपूर्वीच सिंधुदुर्गमध्येही कोरोना रुग्ण आढळून आला होता.


No comments:

Post a Comment